"अब्दुल अझीझ रायबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
ए.ए. रायबा, पूर्ण नाव अब्दुल अझिझ रायबा(जन्म मुंबई : १० जुलै, इ.स.१९२२) हे एक मराठी चित्रकार आहेत. <br />
ए.ए. रायबा, पूर्ण नाव अब्दुल अझिझ रायबा (जन्म मुंबई : १० जुलै, इ.स.१९२२) हे एक मराठी चित्रकार आहेत. <br />
ते मूळचे कोकणी. वडील शिंपीकाम करीत. रायबा सुरुवातीला गुजराथी शाळेत गेले आणि नंतर मुंबईच्या अंजुमन-इ-इस्लाममध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. तिथे रायबांनी उर्दूवर प्रभुत्व मिळवले. ते पाहून त्यांच्या‌ शिक्षकांनी त्यांना 'लेखक हो' म्हणून सुचवले. त्यातून रायबांनी काही काव्यलेखन केले व अल्लामा इक्बाल यांचे लिखाण इंग्रजीत भाषांतरित करायला सुरुवात केली.

ओळ ११: ओळ ११:

जुनी मुंबई व आजूबाजूचा परिसर, त्यातील पोर्तुगीज इमारती, कोळीवाडे, त्यांचे रूप, समुद्र , जहाजे, कोळिणी, काश्मिरातील व्यक्ती, निसर्ग अशा अनेक गोष्टी रायबा चितारतात. परंतु चित्रकलेचे मूलभूत धडे जिथे गिरवले ते नूतन कलामंदिर व विशेषेकरून तेथील थिऑसॉफीचे तत्त्वज्ञान यांचा रायबांच्या व्यक्तिमत्त्वावर जो प्रभाव पडला, तो कायमचा. त्यांच्या चित्रांतून तो जाणवल्याशिवाय रहात नाही.

==ए.ए. रायबा यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान==
* दि बॉम्बे आर्ट सोसायटी'चा २०१५ सालचा रूुपधर' पुरस्कार
* 'ललित कला अकादमी' या सांस्कृतिक व कलाक्षेत्रातील नामवंत संस्थेतर्फे इ.स. १९५६ साली केलेल्या नामनिर्देशनांत सर्वोत्कृष्ट १० भारतीय चित्रकारांमध्ये रायबांचा समावेश करण्यात आला होता.

[[वर्ग: इ.स. १९२२ नधील जन्म]]
[[वर्ग: भारतीय कलाकार]]

२२:२४, १४ जून २०१५ ची आवृत्ती

ए.ए. रायबा, पूर्ण नाव अब्दुल अझिझ रायबा (जन्म मुंबई : १० जुलै, इ.स.१९२२) हे एक मराठी चित्रकार आहेत.
ते मूळचे कोकणी. वडील शिंपीकाम करीत. रायबा सुरुवातीला गुजराथी शाळेत गेले आणि नंतर मुंबईच्या अंजुमन-इ-इस्लाममध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. तिथे रायबांनी उर्दूवर प्रभुत्व मिळवले. ते पाहून त्यांच्या‌ शिक्षकांनी त्यांना 'लेखक हो' म्हणून सुचवले. त्यातून रायबांनी काही काव्यलेखन केले व अल्लामा इक्बाल यांचे लिखाण इंग्रजीत भाषांतरित करायला सुरुवात केली.

रायबा उर्दूबरोबर अरेबिक कॅलिग्राफीही शिकले. त्यांची कॅलिग्राफी पाहूनच त्यांच्या एका शिक्षकाच्या लक्षात आलेकी, ते उत्तम चित्रे काढू शकतात. त्यांनी दंडवती मठ यांच्याशी त्यांची भेट घडवून आणली. दंडवती मठ यांनी श्री. राव यांच्यासह थिऑसॉफी सोसायटीच्या ' ब्लाव्हिटस्‍की लॉज' मध्ये 'नूतन कलामंदिर' स्थापन केले होते. ’नूतन कलामंदिरा'त शिकून, रायबा जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्‌समध्ये आले.

जे.जे.मध्ये रायबा १९४२ ते ४६ या काळात शिकले. तिथे चार्लस जेरार्ड व जगन्नाथ अहिवासी हे दोन शिक्षक त्यांना लाभले. जगन्नाथ अहिवासी हे भारतीय चित्रशैलीपरंपरेचे शिक्षण देत. रायबांनी, भारतीय लघुचित्रांची पद्धती, तंत्र व शैली अहिवासींकडूनच शिकून आत्मसात केली. तर तैलरंग, त्यांची हाताळणी जेरार्ड यांच्याकडून. या दोन्ही गोष्टींचे मिश्रण रायबांच्या चित्रशैलीत दिसून येते.

शिक्षण झाल्यानंतर रायबांनी टाइम्स ऑफ इंडियाच्या वॉल्टर लँगहॅमर यांच्याशी संपर्क साधला. लँगहॅमर यांच्या सांगण्यावरूनच ते काश्मीरला गेले. तेथे पाच वर्षें राहिले. या पाच वर्षांच्या कालावधीचा परिणाम म्हणून त्यांच्यातील कवी चित्रांत उतरला तो कायमचाच.

मुंबईत आल्यावर उपजीविकचे साधन शोधताना रायबांनी चित्रकार एम.एफ. हुसेन यांच्या ओळखीने चित्रपट दिग्दर्शक के.आसिफ यांच्याकडे थोडे दिवस काम केले. नंतर हुसेन आरा यांच्यासोबत फर्निचर डिझाइनचेही काम केले.

जुनी मुंबई व आजूबाजूचा परिसर, त्यातील पोर्तुगीज इमारती, कोळीवाडे, त्यांचे रूप, समुद्र , जहाजे, कोळिणी, काश्मिरातील व्यक्ती, निसर्ग अशा अनेक गोष्टी रायबा चितारतात. परंतु चित्रकलेचे मूलभूत धडे जिथे गिरवले ते नूतन कलामंदिर व विशेषेकरून तेथील थिऑसॉफीचे तत्त्वज्ञान यांचा रायबांच्या व्यक्तिमत्त्वावर जो प्रभाव पडला, तो कायमचा. त्यांच्या चित्रांतून तो जाणवल्याशिवाय रहात नाही.

ए.ए. रायबा यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

  • दि बॉम्बे आर्ट सोसायटी'चा २०१५ सालचा रूुपधर' पुरस्कार
  • 'ललित कला अकादमी' या सांस्कृतिक व कलाक्षेत्रातील नामवंत संस्थेतर्फे इ.स. १९५६ साली केलेल्या नामनिर्देशनांत सर्वोत्कृष्ट १० भारतीय चित्रकारांमध्ये रायबांचा समावेश करण्यात आला होता.