Jump to content

"गो.बं. देगलूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १४: ओळ १४:
२०१४ साली सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर [[दुर्ग साहित्य संमेलन]] झाले. तिथे देगलूरकर संमेलनाध्यक्ष होते.
२०१४ साली सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर [[दुर्ग साहित्य संमेलन]] झाले. तिथे देगलूरकर संमेलनाध्यक्ष होते.

देगलूरकर यांनी मूर्तिविज्ञान या विषयावर बरीच पुस्तके लिहिली आहेत.
देगलूरकर यांनी मूर्तिविज्ञान या विषयावर बरीच पुस्तके लिहिली आहेत.

==गो.बं देगलूकरांची मूर्ती आणि मूर्तिशास्त्र विषयक विचार==
मूर्तिशास्त्र हा समाजाभिमुख विषय आहे; सर्वसामान्यांच्या जीवनाच्या विविध अंगांशी निगडित आहे. मूर्तीमागे सामाजिक घडामोडी असतात.. मूर्तिपूजक समाज लोकशाहीवादी असतो. जगातील सर्व सनातन धर्मीय हे एकेश्वरवादी आहेत. तसंच सर्वधर्मीय लोक मूर्तिपूजकच आहेत.

व्यक्त, अव्यक्त, व्यक्ताव्यक्त हे मूर्तीचे प्रकार शास्त्रात सांगितले आहेत. कोणत्याही प्रतीकाची कोणत्याही रूपात केली जाणारी आराधना ही मूर्तिपूजाच आहे.

आपल्याकडे तेहतीस कोटी देव आहेत, असे हिंदू मानतात. वास्तविक हे तेहतीस प्रकारचे देव आहेत.

==देगलूरकरांचे सूर्यपूजेसंबंधीचे विचार==
इराणमध्ये फार पूर्वीपासून सूर्याची पूजा-आराधना होत असे. तिथे मूर्तिभंजक आक्रमक आल्यावर त्यांनी भारताकडे धाव घेतली. भारतातही हिंदूंमध्ये सूर्यपूजा होत होतीच. श्रद्धासाधर्म्यामुळे दोन्ही समाजांना एकत्र येणे शक्य झाले. या सामाजिक सरमिसळीचे स्पष्ट प्रतिबिंब सूर्यप्रतिमांमध्ये दिसते. भारतातील हिंदू हे पूर्वी यंत्ररूपातील सूर्याला किंवा प्रत्यक्ष सूर्याला अर्घ्य अर्पण करून पूजा करीत असत. इराणी जनतेच्या संपर्कामुळे भारतात सूर्याची मानवी रूपातील मूर्ती घडवली जाऊ लागली. प्रारंभीच्या काळातील सूर्यमूर्तीच्या अंगावर विशिष्ट प्रकारचा मुकुट, मेखला, आखूड धोतर आणि गुडघ्यापर्यंत येणारे बूट असा वेश दिसतो. हा इराणमधील मूर्तीवरून घेतलेला आहे.

==गो.बं. देगलूकरांची काही पुस्तके==
==गो.बं. देगलूकरांची काही पुस्तके==

१८:२९, १२ जून २०१५ ची आवृत्ती

डॉ. गो.बं. देगलूरकर (जन्म : १०३४) हे मूर्तिशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यांनी मराठवाड्यातील अन्वा, निलंगा आणि औंढ्या नागनाथ येथील अनेक मंदिरांतील मूर्तींचा खास अभ्यास केला आहे.

जन्म आणि शिक्षण

गो.बं देगलूरकरांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्य़ातील हिप्परगा येथे परमभागवत देगलूरकर घराण्यात झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. पदवी परीक्षेसाठी त्यांनी इतिहास हा विषय घेतला होता. पण आधुनिक इतिहास आवडेना म्हणून ते पदव्युत्तर पदवीसाठी त्यांनी प्राचीन इतिहास व पुरातत्त्वशास्त्र असे विषय घेतले.

पीएच.डी.साठी ‘कल्चरल हिस्ट्री ऑफ मराठवाडा’ हा विषय त्यांनी निवडला. त्यांच्या ‘व्हायवा’साठी विद्यापीठाबाहेरील विद्वान जाणकार म्हणून प्रा. ग.ह. खरे आले होते. मराठवाडा हाच मराठी संस्कृतीचा स्रोत असल्याचं मत त्यांनी थिसिसमध्ये मांडले आणि ग ह. खरे यांनी ते मान्य केले.

नोकरी

एम. ए. झाल्यावर देगलूरकर उस्मानिया विद्यापीठात अध्यापन करू लागले. संशोध सुरू करण्याआधीच त्यांनी नागपूरला त्यांनी प्राध्यापकपद स्वीकारले. तिथे डॉ. शांताराम भालचंद्र देव हे विभागप्रमुख म्हणून रुजू झाले होते. त्यांनी मूर्तिशास्त्र शिकवण्याची जबाबदारी देगलूरकरांवर टाकली. डॉ. देवांमुळे, देगलूकरांमध्ये प्राचीन स्थापत्यशास्त्र, कला, मूर्तिशास्त्र या विषयांमध्ये संशोधन करण्याची इच्छा प्रबळ झाली.

पुरातत्त्वशास्त्राच्या प्रेमाखातर नागपूरला मिळणार्‍या पगारापेक्षा कमी पगारावर डॉ. देगलूरकर पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये रुजू झाले. कालांतराने ते डेक्कन कॉलेजचे कुलगुरु झाले..

२०१४ साली सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर दुर्ग साहित्य संमेलन झाले. तिथे देगलूरकर संमेलनाध्यक्ष होते.

देगलूरकर यांनी मूर्तिविज्ञान या विषयावर बरीच पुस्तके लिहिली आहेत.

गो.बं देगलूकरांची मूर्ती आणि मूर्तिशास्त्र विषयक विचार

मूर्तिशास्त्र हा समाजाभिमुख विषय आहे; सर्वसामान्यांच्या जीवनाच्या विविध अंगांशी निगडित आहे. मूर्तीमागे सामाजिक घडामोडी असतात.. मूर्तिपूजक समाज लोकशाहीवादी असतो. जगातील सर्व सनातन धर्मीय हे एकेश्वरवादी आहेत. तसंच सर्वधर्मीय लोक मूर्तिपूजकच आहेत.

व्यक्त, अव्यक्त, व्यक्ताव्यक्त हे मूर्तीचे प्रकार शास्त्रात सांगितले आहेत. कोणत्याही प्रतीकाची कोणत्याही रूपात केली जाणारी आराधना ही मूर्तिपूजाच आहे.

आपल्याकडे तेहतीस कोटी देव आहेत, असे हिंदू मानतात. वास्तविक हे तेहतीस प्रकारचे देव आहेत.

देगलूरकरांचे सूर्यपूजेसंबंधीचे विचार

इराणमध्ये फार पूर्वीपासून सूर्याची पूजा-आराधना होत असे. तिथे मूर्तिभंजक आक्रमक आल्यावर त्यांनी भारताकडे धाव घेतली. भारतातही हिंदूंमध्ये सूर्यपूजा होत होतीच. श्रद्धासाधर्म्यामुळे दोन्ही समाजांना एकत्र येणे शक्य झाले. या सामाजिक सरमिसळीचे स्पष्ट प्रतिबिंब सूर्यप्रतिमांमध्ये दिसते. भारतातील हिंदू हे पूर्वी यंत्ररूपातील सूर्याला किंवा प्रत्यक्ष सूर्याला अर्घ्य अर्पण करून पूजा करीत असत. इराणी जनतेच्या संपर्कामुळे भारतात सूर्याची मानवी रूपातील मूर्ती घडवली जाऊ लागली. प्रारंभीच्या काळातील सूर्यमूर्तीच्या अंगावर विशिष्ट प्रकारचा मुकुट, मेखला, आखूड धोतर आणि गुडघ्यापर्यंत येणारे बूट असा वेश दिसतो. हा इराणमधील मूर्तीवरून घेतलेला आहे.

गो.बं. देगलूकरांची काही पुस्तके

  • घारापुरी दर्शन
  • मार्कण्डादेव (मार्कंडी)
  • विष्णुमूर्ते नमस्तुभ्यम्
  • वेरूळ दर्शन
  • शिवमूर्तये नमः
  • सुरसुंदरी