"क्षमा वैद्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. क्षमा वैद्य या व्यवसायाने होमिओपॅथिक डॉक्टर असून मराठी संगी...
(काही फरक नाही)

२३:३७, २ जून २०१५ ची आवृत्ती

डॉ. क्षमा वैद्य या व्यवसायाने होमिओपॅथिक डॉक्टर असून मराठी संगीत रंगभूमीवरील एक कलावंत आहेत.

वैद्य यांचा जन्म पुण्यात झाला. शिक्षण नूतन मराठी विद्यालय व हुजुरपागा या शाळांत झाले. आजोबा कीर्तनकार होतेे आणि आईला संगीताची आवड होती. त्यामुळे क्षमा वैद्य यांनाही संगीत व अभिनयामध्ये रुची निर्माण झाली. शिशुवर्गात असल्यापासूनच त्यांचा रंगमंचावरील वावर सुरू झाला. शाळेत असताना केवळ गाणे आणि अभिनयच नाही, तर तबला, पेटी, बासरी, बुलबुलतरंग अशी वाद्येही त्या उत्साहाने वाजवत.

संगीताचे शिक्षण

डॉ. क्षमा वैद्य यांनी गांधर्व महाविद्यालयात त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे घेतले; तसेच भेंडीबाजार घराण्याचे पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्याकडे त्यांचे संगीत शिक्षण झाले. स्वरराज छोटा गंधर्व, संजय देशपांडे, विष्णुपंत वष्ट व बंधू डॉ. दिग्विजय वैद्य यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.

अभिनयाची कारकीर्द

शाळेच्या स्नेहसंमेलनात बसवण्यात आलेल्या ’संगीत जयजय गौरीशंकर' नाटकात क्षमा वैद्य यांनी शंकराची भूमिका केली होती. पुढे भरत नाट्य संशोधन मंदिर या संस्थेच्या ’संगीत शाकुंतल’ या नाटकात त्यांनी शकुंतलेची भूमिका केली. संस्थात्मक पातळीवरील हे त्यांचे पहिले संगीत नाटक होते. त्यानंतर त्यांनी ’भरत’ची अनेक नाटके केली.

संगीताची आराधना करतानाच क्षमा वैद्य यांनी होमिओपॅथी डॉक्टरची पदवी मिळवली. वैद्यकीय सेवा आणि नाटक या द्वंद्वात त्यांनी व्यवसायापेक्षा आवडीलाच प्राधान्य दिले. पूर्णवेळ नाटकालाच देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. संगीत नाटकांतील अभिनय व गाण्याने त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला.

डॉ. क्षमा वैद्य यांची भूमिका असलेली नाटके

  • कट्यार काळजात घुसली
  • प्रीतिसंगम
  • मानापमान
  • मृच्छकटिक
  • संशयकल्लोळ
  • सौभद्र
  • स्वयंवर
  • ययाती देवयानी

नाट्यसंस्था

एकीकडे उत्तम असे काम अभिनेत्री गायक म्हणून करत असतानाच क्षमा वैद्य यांना स्वतःचे वेगळे काहीतरी करण्याची ऊर्मी होती. त्यातूनच त्यांनी १९९५मध्ये गोविंदराव दाते यांच्या सहकार्याने 'शिवरंजनी नाट्यगंगा' ही स्वतःची संस्था निर्माण केली. संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन हा त्यांचा मुख्य उद्देश होता. त्यानुसार सर्व महत्त्वाच्या संगीत नाटकांना त्यांनी पुन्हा रंगमंचावर आणले. वेगळ्या पद्धतीने त्यांनी ही नाटके सादर केली.

पुरस्कार

  • महारा्ष्ट्र सरकारचा पुरस्कार
  • नाट्य परिषदेचा पुरस्कार
  • फाय फाउंडेशनचा पुरस्कार
  • पुणे महापालिकेचा बालगंधर्व पुरस्कार