"राजाराम शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: राजाराम शिंदे (जन्म : ५ ऑक्टोबर १९३१) हे मराठी पत्रकार, नाट्यलेखक,... |
(काही फरक नाही)
|
१३:०६, २२ मे २०१५ ची आवृत्ती
राजाराम शिंदे (जन्म : ५ ऑक्टोबर १९३१) हे मराठी पत्रकार, नाट्यलेखक, नाट्यअभिनेते, नाट्यनिर्माते, दिग्दर्शक, नेपथ्यकार आणि सामाजिक व राजकीय कार्यकर्ते होते. व्यावसायिक रंगभूमीवर राजाराम शिंदे यांनी साठ सत्तर नाटकांतून लहान मोठ्या भूमिका केल्या. ते एक कल्पक नाट्यनिर्माते आणि यशस्वी वितरक होते. रंगकर्मींच्या आणि नाट्यसंस्थांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यास ते सदैव तत्पर असत.
संस्था स्थापना
- राजाराम शिंदे यांनी ’नाट्यमंदार’ ही नाट्यसंस्था स्थापन केली.
- रंगभूमीशी संबंधित सर्व घटकांसाठी गृहनिर्माण पतसंस्था निर्माण केल्या
राजाराम शिंदे यांचे राजकीय आणि सामाजिक कार्य
- १९७८मध्ये राजाराम शिंदे हे चिपळूण मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले होते. आमदार असताना त्यांनी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा २०-कलमी कार्यक्रम, रत्नागिरी जिल्ह्यात यशस्वीपणे राबवला होता.
- नट, नाटककार, निर्माते, दिग्दर्शक, नेपथ्यकार, संगीत दिग्दर्शक, बालरंगभूमी कार्यकर्ते यांच्या संघटना बांधल्या.
रामाराम शिंदे यांनी लिहिलेली नाटके
- कांचनगंगा
राजाराम शिंदे यांनी रंगभूमीवर आणलेली विविध नाटककारांची नाटके
- घनश्याम नयनी आला
- चांदणे शिंपीत जा
- फुलाला सुगंध मातीचा
- भोवरा
- मंदारमाला
- मेघमल्हार
- वरचा मजला रिकामा
- सागरा प्राण तळमळला
- सौजन्याची ऐशी तैशी
- ही श्रींची इच्छा
(अपूर्ण)