"स.अ. शुक्ल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
स.अ. शुक्ल यांनी कुमुदबांधव या [[टोपणनावानुसार मराठी कवी|टोपणनावाने]]ही काही कविता केल्या आहेत. [[गीतकार]] म्हणूनही त्यांना लौकिक मिळाला. त्यांच्या अनेक गीतांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या. त्यांनी लिहिलेल्या चित्रपटकथा भक्तिरसाने भरलेल्या असत.

’चल रानात सजणा’ हे जी.एन्‌. जोशींनी गायलेले गीत हे मराठीतले पहिले भावगीत असावे. या गाण्यानंतरच मराठीत ’भावगीत’ हा गायन प्रकार सुरू झाला.
’चल रानात सजणा’ हे जी.एन्‌. जोशींनी गायलेली आणि स.अ. शुक्लांनी लिहिलेली कविता, हे मराठीतले पहिले भावगीत असावे. या गाण्यानंतरच मराठीत ’भावगीत’ हा गायन प्रकार सुरू झाला.

लिखित साहित्याबरोबर स.अ.शुक्ल यांना धर्मशास्त्र, ज्योतिष, तत्त्वज्ञान या विषयांतही रस होता खूप वाचावे आणि थोडे पण सकस लिहावे अशी त्यांची वृत्ती होती. कविवर्य स. अ. शुक्ल हे त्या काळी मोठे प्रस्थ होते. अनेक भावगीतांबरोबरच त्यांनी मराठी चित्रपटांमध्येही गाणी लिहिली. ते शीघ्र कवी होते व त्यामुळे निर्मात्यांना त्यांचे काम खूप आवडायचे. काव्य मागितले आणि लगेच मिळाले तर तो निर्माता तरी का नाही खूश होणार? त्यांचा ज्योतिषाचा अभ्यासही प्रचंड होता. ग. दि. माडगूळकर यांची कुंडली बघून हा पोरगा माझी जागा घेणार हे भविष्य त्यांनी वर्तवले होते आणि पुढे अगदी तसेच झाले.

ओळ ५६: ओळ ५६:
* सं. सौभाग्यलक्ष्मी (सामाजिक नाटक, १९२५)
* सं. सौभाग्यलक्ष्मी (सामाजिक नाटक, १९२५)
* स्वर्गावर स्वारी (नाटक, १९२८)
* स्वर्गावर स्वारी (नाटक, १९२८)

==संमेलनाध्यक्षपद==
स.अ. शुक्ल यांनी नाटके आणि इतर साहित्य लिहून मराठी भाषकांची जी सेवा केली त्याचे फळ म्हणून त्यांना, १९६७ साली पुण्यात भरलेल्या ४८व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन|मराठी नाट्यसंमेलनाचे]] अध्यक्षपद देण्यात आले.

{{DEFAULTSORT:शुक्ल, स.अ.}}
{{DEFAULTSORT:शुक्ल, स.अ.}}

२२:१४, २० मे २०१५ ची आवृत्ती

सदाशिव अनंत शुक्ल तथा कुमुदबांधव (२६ मे, इ.स. १९०२ - २७ जानेवारी, इ.स. १९६८) हे मराठीतले एक कवी, व ध्येयवादी नाटककार होते. त्यांनी कविता-नाटकांशिवाय लघुकथा, चित्रपटकथा, गाणी आणि लहान मुलांसाठी विविध प्रकारचे लेखन केले आहे. केवळ लेखनावर उपजीविका करणार्‍या महाराष्ट्रातील मोजक्या साहित्यिकांपैकी ते एक होते.

स.अ. शुक्ल यांनी कुमुदबांधव या टोपणनावानेही काही कविता केल्या आहेत. गीतकार म्हणूनही त्यांना लौकिक मिळाला. त्यांच्या अनेक गीतांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या. त्यांनी लिहिलेल्या चित्रपटकथा भक्तिरसाने भरलेल्या असत.

’चल रानात सजणा’ हे जी.एन्‌. जोशींनी गायलेली आणि स.अ. शुक्लांनी लिहिलेली कविता, हे मराठीतले पहिले भावगीत असावे. या गाण्यानंतरच मराठीत ’भावगीत’ हा गायन प्रकार सुरू झाला.

लिखित साहित्याबरोबर स.अ.शुक्ल यांना धर्मशास्त्र, ज्योतिष, तत्त्वज्ञान या विषयांतही रस होता खूप वाचावे आणि थोडे पण सकस लिहावे अशी त्यांची वृत्ती होती. कविवर्य स. अ. शुक्ल हे त्या काळी मोठे प्रस्थ होते. अनेक भावगीतांबरोबरच त्यांनी मराठी चित्रपटांमध्येही गाणी लिहिली. ते शीघ्र कवी होते व त्यामुळे निर्मात्यांना त्यांचे काम खूप आवडायचे. काव्य मागितले आणि लगेच मिळाले तर तो निर्माता तरी का नाही खूश होणार? त्यांचा ज्योतिषाचा अभ्यासही प्रचंड होता. ग. दि. माडगूळकर यांची कुंडली बघून हा पोरगा माझी जागा घेणार हे भविष्य त्यांनी वर्तवले होते आणि पुढे अगदी तसेच झाले.

स.अ. शुक्ल यानी रचलेली आणि ध्वनिमुद्रित झालेली गीते

  • एकटीच भटकत नदीकाठी (गायक आणि संगीत दिग्दर्शक जी. एन्‌. जोशी]]
  • कुठला मधु झंकार (गायिका श्यामा चित्तार. संगीत दिग्दर्शक यशवंत देव
  • कुणाला प्रेम मागावे (गायक मास्टर बसवराज)
  • चकाके कोर चंद्राची (गायक-गायिका - जी.एन्‌. जोशी, गंगूबाई हनगळ, संगीत जी.एन्‌. जोशी)
  • चल रानात सजणा (गायक आणि संगीत दिग्दर्शक जी. एन्‌. जोशी]]
  • जादुगारिणी सखे साजणी (गायक आणि संगीत दिग्दर्शक जी. एन्‌. जोशी]]
  • तू तिथे अन्‌ मी इथे हा (गायक-गायिका - जी.एन्‌. जोशी, गंगूबाई हनगळ, संगीत जी.एन्‌. जोशी)
  • दूर व्हा सजणा येऊ नका (गायक-गायिका मन्‍ना डे, आशा भोसले; संगीत स्नेहल भाटकर; चित्रपट - या मालक)
  • दे चरणि आसरा (गायक राम मराठे)
  • प्रीतिचा नव वसंत (गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर; संगीत स्नेहल भाटकर; चित्रपट - या मालक)
  • बोल हांसरे बोल प्यारे(गायिका निर्मला जाधव, संगीत शंकरराव सरनाईक, चित्रपट सौभाग्यलक्ष्मी)
  • ब्रिजलाला गडे पुरवी (गायिका हिराबाई बडोदेकर, संगीत केशवराव भॊळे-हिराबाई बडोदेकर, नाटक - सं. साध्वी मीराबाई; राग मिश्र पिलू)
  • लाविते ग सांजदिवा (गायिका आशा भोसले; संगीत स्नेहल भाटकर; चित्रपट - या मालक)
  • हले झुलत डुले पाळणा (गायिका लता मंगेशकर, संगीत स्नेहल भाटकर; चित्रपट - चिमुकला पाहुणा]]

नाट्यलेखन

स.अ. शुक्ल यांची काही नाटके जरी पौराणिक विषयांवर असली तरी त्यांतूनही त्यांनी प्रचलित सामाजिक जाणिवेला नवा अर्थ देण्याचा प्रयत्‍न केला.

स.अ. शुक्ल यांनी लिहिलेली नाटके, कथासंग्रह, कवितासंग्रह, बालवाङ्‌मय वगैरे

  • असत्याचे प्रयोग (१९५९)
  • आम्ही एकशेपाच (१९५९)
  • वीर अभिमन्यू (मुलांसाठी नाटिका)
  • चंदनबन
  • चंद्रावर मधुचंद्र (नाटक)
  • चार चांदण्या (एकांकिका संग्रह)
  • जंगल्या भिल्ल (मुलांसाठी नाटिका, १९४९)
  • जनता अमर आहे (नाटक, १९५८)
  • जयजयवंती (१९५५)
  • जयद्रथ वध (मुलांसाठी नाटिका)
  • झुणका भाकर (१९५१)
  • देव जागा आहे (१९५८)
  • नवलनगरची राजकन्या (मुलांसाठी नाटिका)
  • नवी राजवट (१९४९)
  • नाटक...नाटक भाग १ ते ३. (मुलांसाठी नाटिका, १९४९, १९५०, १९५१)
  • बनला बैरागी राजा (मुलांसाठी नाटिका, १९५२)
  • मंगला (१९५४)
  • सं. साध्वी मीराबाई (नाटक, १९३०)
  • रंगतरंग (नाटक, १९६२)
  • रुपेरी रसधारा (१९४६)
  • लोकसिंहासन (सामाजिक नाटक, १९४६)
  • शिकलेले शहाणे (नाटक)
  • शुक्लांची गाणी (१९५२)
  • सं. सत्याग्रही (नाटक, १९३०)
  • सम्राट कोण (नाटक)
  • सं. साक्षात्कार (नाटक, १९३०)
  • सिंहाचा छावा (नाटक, १९२७)
  • सं. सौभाग्यलक्ष्मी (सामाजिक नाटक, १९२५)
  • स्वर्गावर स्वारी (नाटक, १९२८)

संमेलनाध्यक्षपद

स.अ. शुक्ल यांनी नाटके आणि इतर साहित्य लिहून मराठी भाषकांची जी सेवा केली त्याचे फळ म्हणून त्यांना, १९६७ साली पुण्यात भरलेल्या ४८व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद देण्यात आले.