Jump to content

"नारायणराव घोरपडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बाबासाहेब घोरपडे ऊर्फ नारायणराव घोरपडे (जन्म : करकंब, इ.स. १८७०; मृ...
(काही फरक नाही)

२२:०६, १८ मे २०१५ ची आवृत्ती

बाबासाहेब घोरपडे ऊर्फ नारायणराव घोरपडे (जन्म : करकंब, इ.स. १८७०; मृत्यू : इ.स. १९४३) यांचे पाळण्यातले नाव गोपाळ जोशी करकंबकर. इचलकरंजीचे संस्थानिक आबासाहेब घोरपडे हे निपुत्रिक होते. संस्थानाच्या गादीला वारसा म्हणून त्यांनी पंधरा मुलांमधून देखण्या व चुणचुणीत गोपाळ जोशीची निवड केली आणि त्याला दत्तक घेतले आणि गोपाळ जोशी हे नारायणराव (बाबासाहेब) घोरपडे झाले.

घोरपडे घराण्याच्या परंपरेनुसार बाबासाहेब घोरपडे रीतसर शिक्षण घेतले. आधी कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजात व नंतर मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजातून त्यांनी इंग्रजी, इतिहास व अर्थशास्त्र हे विषय घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले. लहान वयांतच त्यांनी पौराणिक आणि ऐतिहासिक ग्रंथांच्या वाचनाची आवड होती. कॉलेजात्गेल्यानंतर त्यांचे वाचन अधिक प्रगल्भ झाले.

विद्यार्थिदशेत असताना बाबासाहेब घोरपड्यांना न्यायमूर्ती रानडे यांच्या विचारांचे आकर्षण वाटू लागले होते. लोकमान्य टिळकंचाही त्यांच्यावर प्रभाव होता. इचलकरंजीच्या संस्थानिकपदाची सूत्रे हाती पडल्यावर झाल्यावर त्यांनी आपल्या प्रजजनांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सार्वजनिक उन्‍नतीकडे लक्ष दिले. बाबासाहेबांना सर्व प्रकारच्या कलावंतांना


(अपूर्ण)