चर्चा:नारायणराव घोरपडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांच्या विषयीच्या पानाचे शीर्षक बाबासाहेब घोरपडे असे आहे. खरेतर बाबासाहेब हे त्यांचे संबोधनात्मक नाव होते. त्यांच्या नावे इचलकरंजीत असलेल्या संस्थांची नावे सुद्धा नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह आणि नारायणराव बाबासाहेब एज्युकेशन सोसायटी अशीच आहेत. तेव्हा ह्या पानाचे नाव सुद्धा नारायणराव बाबासाहेब घोरपडे किंवा नारायणराव घोरपडे असे असले पाहिजे, असे वाटते. यावर चर्चा व्हावी, अशी विनंती.

ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १९:५७, १७ सप्टेंबर २०१७ (IST)


नारायणराव घोरपडे यांनी अनुवाद लेखन आणि स्फुट लेखन कोणत्या नावाने केले आहे ? बाकी वस्तुनिष्ठतेचा भाग म्हणून ज्ञानकोशांचा कल व्यक्तीपूजा टाळण्याकडे असतो याची आपणास कल्पना असेलच, आवश्यक उल्लेखापलिकडे बिरुदावल्या टाळलेल्या बऱ्या असो. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:३०, १७ सप्टेंबर २०१७ (IST)

नमस्कार, आपल्या सुचनेनुसार नारायणराव घोरपडे यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा शोध घेतला. त्याचे तपशील खालीलप्रमाणे

'नारायणराव घोरपडे यांनी लिहिलेली पुस्तके आणि लेखक म्हणून त्यांच्या नावाचे उल्लेख (जसे छापले आहेत तसे)

  1. ब्रिटनने हिंदुस्थानासाठी काय केले आहे? --- श्री. नारायणराव बाबासाहेब घोरपडे
  2. श्रीमंत नामदार नारायणराव बाबासाहेब यांनी तारीख २० जून १९०८ रोजीच्या कायदेकौन्सिलच्या बैठकीत केलेले भाषण आणि विचारलेले प्रश्न आणि त्यास मिळालेली उत्तरे
  3. प.लो.मिस व्हायओलेट क्लार्क यांच्या Leaves पुस्तकाचे भाषांतर --- नारायणराव बाबासाहेब घोरपडे

संदर्भ : आपटे वाचन मंदिर इचलकरंजी हे वाचनालय

वरील माहितीनुसार आता पानाचे नाव नारायणराव बाबासाहेब घोरपडे / नारायणराव घोरपडे व्हावे, असे वाटते. ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) २०:२४, २० सप्टेंबर २०१७ (IST)

Gnome-edit-redo.svgज्ञानदा गद्रे-फडके:
हे संदर्भ शोधून काढल्याबद्दल धन्यवाद.
एक-दोन दिवस इतर प्रतिसादांची वाट पाहून हा लेख नारायणराव घोरपडे या नावाकडे स्थानांतरित केला जाईल.
अभय नातू (चर्चा) २०:४४, २० सप्टेंबर २०१७ (IST)

धन्यवाद!