"विलास सारंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर ! |
|||
ओळ ३: | ओळ ३: | ||
मराठीतली त्यांची काही पुस्तके त्यांनीच मूळ [[इंग्रजी]]त लिहिलेल्या पुस्तकांचे अनुवाद आहेत. त्यांची मराठीत अकरा व इंग्रजीत आठ पुस्तके आहेत आणि अनेक संपादित-निवडक संग्रहांत त्यांच्या इंग्रजी [[कथा]] आहेत. इंग्रजी लेखक काफ्काशी त्यांची तुलना होत असे. त्यांना मराठीतले काफ्का असे सुद्धा म्हणत. विलास सारंग १९६०पासून लिहीत होते. त्यांनी मराठीत लिहिले; व इंग्रजीमध्येही लिहिले. त्यांनी प्रथम मराठीत लिहून नंतर त्या लेखनाचे इंग्रजीकरण केले; प्रथम इंग्रजीत लिहून नंतर त्याचे मराठीकरणही केले. |
मराठीतली त्यांची काही पुस्तके त्यांनीच मूळ [[इंग्रजी]]त लिहिलेल्या पुस्तकांचे अनुवाद आहेत. त्यांची मराठीत अकरा व इंग्रजीत आठ पुस्तके आहेत आणि अनेक संपादित-निवडक संग्रहांत त्यांच्या इंग्रजी [[कथा]] आहेत. इंग्रजी लेखक काफ्काशी त्यांची तुलना होत असे. त्यांना मराठीतले काफ्का असे सुद्धा म्हणत. विलास सारंग १९६०पासून लिहीत होते. त्यांनी मराठीत लिहिले; व इंग्रजीमध्येही लिहिले. त्यांनी प्रथम मराठीत लिहून नंतर त्या लेखनाचे इंग्रजीकरण केले; प्रथम इंग्रजीत लिहून नंतर त्याचे मराठीकरणही केले. |
||
==विलास सावंत यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य== |
|||
विलास सावंत यांचे समीक्षालेखन हे साहित्यसंस्कृतीवरील भाष्य आहे. देशोदेशींच्या दर्जेदार साहित्याच्या वाचनातून आणि आधुनिक पाश्चात्त्य साहित्य विचारसरणीतून त्यांची साहित्यदृष्टी चिकित्सक बनलेली होती. सारंग हे आधुनिक परंपरेतील कवी आणि कथा -कादंबरीकार होते. त्यांच्या सर्जनशील लेखनातून कलादृष्टी आणि जीवनदृष्टी अभिव्यक्त झाली आहे. मराठी साहित्य आणि साहित्यव्यवहाराची त्यांनी परखडपणे चिकित्सा केली आहे. [[बाळ सीताराम मर्ढेकर]], [[रा. भा. पाटणकर]] आणि विलास सारंग यांच्या लेखनात मराठी भाषेविषयी तीव्रतम कळकळ दूसन येते. मराठी लेखकांनी सतत नव्या वाटा शोधत राहिल्या पाहिजेत, प्रेरणा आत्मसात केल्या पाहिजेत, तसेच समकालीन लेखक वाचून मधुकरवृत्ती जोपासली पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. |
|||
विलास सारंग यांनी आपले कोणतेही लेखन योजनाबद्धरीत्या केलेले नाही. ते तरुण असताना त्यांना सॅम्युअल बेकेटच्या नाटकांवर व्याख्यान देण्यासाठी मुंबई मराठी साहित्य संघाने बोलावले. तेथे त्यांची व्याख्याने झाली. त्यांचे हे भाषण मराठी `सत्यकथा’ मासिकात प्रकाशित झाले. त्यानंतर फ्रेन्झ काफ्का, ज्यां पोल सार्त्र, आल्बर्ट काम्यू यांच्यावर सुरुवातीला त्यांनी लेख लिहिले. त्यानंतर त्यांचे `सिसिफस आणि बेलाक्वा’ हे पुस्तक तयार झाले. पुढे `सत्यकथा’ मासिकात त्यांचे लेख समीक्षा प्रसिद्ध होत राहिले. सत्यकथा मासिकांबरोबर `अभिरुचि’, `अनुष्टुभ’, `नवभारत’ या नियतकालिकांतूनही त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले.यातील अनेक लेखांवर त्या त्या वेळी चर्चाही झालेली आहे. यातील काही लेख सुरुवातीला इंग्रजीत आणि नंतर अनुवाद स्वरूपात प्रकाशित झाले.सत्यकथेतील समीक्षांमुळे त्यांचा लेखनाचा हळूहळू मोठा ऐवज तयार झाला. त्यानंतर `अक्षरांचा श्रम केला’यामधील सर्व लेखांची सारंगांनी `एकूण साहित्य’, `कथा कादंबरी’, अनुवाद’ अशा चार विभागात मांडणी करून हे लेखन केले आहे. |
|||
विलास सारंग यांच्या सर्जनशील लेखनात आणि समीक्षालेखनात एक समांतर भाग दिसून येतो. तो म्हणजे त्यांनी ज्या साहित्य प्रकारात लेखन केले आहे त्याच प्रकाराविषयी समीक्षालेखन केले आहे. विल्यम वर्डसवर्थ, एस. टी. कोलरिज, मॅथ्यू अर्नोल्ड, टी. एस. एलियट, डब्ल्यू. एच.ऑडन, हे इंग्रजी लेखक आणि मराठीत [[बाळ सीताराम मर्ढेकर]], [[पु.शि. रेगे]], [[विंदा करंदीकर]] यांचे साहित्य वाचून ते झपाटून गेलेले होते. '`सिलेक्टेड रायटिंग्ज’ हे पेंग्विन प्रकाशनाने काढलेले टी. एस. एलियट यांचे पुस्तक वाचून त्यावेळी त्यांच्या अंगावर मूर्तिमंत रोमांच उभे राहत असत. मर्ढेकर, एलियट आणि बरेच इंग्रजी आणि अमेरिकन लेखकांचे साहित्य अभ्यासून त्यांनी सैद्धान्तिक समीक्षा, उपयोजित समीक्षा, सूक्ष्म विश्लेषण, साहित्याची ऐतिहासिक समीक्षा आणि '`लिहित्या लेखकांचं वाचन’ असे पुष्कळसे साहित्य त्यांनी वाचलेले होते. यातूनच साहित्यावर भाष्य करण्याची विचक्षण दृष्टी त्यांना मिळाली. |
|||
पुढे बऱ्याच वर्षानी त्यांची `रुद्र’ कादंबरी जेव्हा येशू पाटील यांनी प्रकाशित करण्याचे धाडस केले त्यावेळी डॉ. [[वसंत. पाटणकर]] आणि डॉ. [[हरिश्चंद्र थोरात]] या समीक्षकांनी तिची प्रगल्भ समीक्षा केली. आधुनिक जीवनाचे संदर्भ शाबूत ठेवून सारंगांनी मिथ्यकथा आणि आधुनिकता यांना परस्परांच्या संदर्भात सक्रिय करीत लोकविलक्षण विश्व निर्माण केले आहे. त्यासाठी त्यांना पुराणकथांचा आधार घ्यावा लागला आहे. विलास सारंग हे स्वायत्ततावादी समीक्षक होते, असे जे पाटणकर आणि अन्य साहित्यकांनी त्यांचे `कोसला’चे विवेचन पाहून जे म्हटले आहे ते खरेच वास्तववादी आहे. |
|||
==विलास सारंग यांनी लिहिलेली पुस्तके== |
==विलास सारंग यांनी लिहिलेली पुस्तके== |
०९:३७, १९ एप्रिल २०१५ ची आवृत्ती
विलास गोविंद सारंग (जन्म : इ.स. १९४२, कारवार; मृत्यू : मुंबई, १४ एप्रिल २०१५) हे नवतेचा आग्रह धरणारे एक मराठी लेखक होते. विलास सारंग यांचे शिक्षण मुंबईतल्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून झाले.
मराठीतली त्यांची काही पुस्तके त्यांनीच मूळ इंग्रजीत लिहिलेल्या पुस्तकांचे अनुवाद आहेत. त्यांची मराठीत अकरा व इंग्रजीत आठ पुस्तके आहेत आणि अनेक संपादित-निवडक संग्रहांत त्यांच्या इंग्रजी कथा आहेत. इंग्रजी लेखक काफ्काशी त्यांची तुलना होत असे. त्यांना मराठीतले काफ्का असे सुद्धा म्हणत. विलास सारंग १९६०पासून लिहीत होते. त्यांनी मराठीत लिहिले; व इंग्रजीमध्येही लिहिले. त्यांनी प्रथम मराठीत लिहून नंतर त्या लेखनाचे इंग्रजीकरण केले; प्रथम इंग्रजीत लिहून नंतर त्याचे मराठीकरणही केले.
विलास सावंत यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य
विलास सावंत यांचे समीक्षालेखन हे साहित्यसंस्कृतीवरील भाष्य आहे. देशोदेशींच्या दर्जेदार साहित्याच्या वाचनातून आणि आधुनिक पाश्चात्त्य साहित्य विचारसरणीतून त्यांची साहित्यदृष्टी चिकित्सक बनलेली होती. सारंग हे आधुनिक परंपरेतील कवी आणि कथा -कादंबरीकार होते. त्यांच्या सर्जनशील लेखनातून कलादृष्टी आणि जीवनदृष्टी अभिव्यक्त झाली आहे. मराठी साहित्य आणि साहित्यव्यवहाराची त्यांनी परखडपणे चिकित्सा केली आहे. बाळ सीताराम मर्ढेकर, रा. भा. पाटणकर आणि विलास सारंग यांच्या लेखनात मराठी भाषेविषयी तीव्रतम कळकळ दूसन येते. मराठी लेखकांनी सतत नव्या वाटा शोधत राहिल्या पाहिजेत, प्रेरणा आत्मसात केल्या पाहिजेत, तसेच समकालीन लेखक वाचून मधुकरवृत्ती जोपासली पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे.
विलास सारंग यांनी आपले कोणतेही लेखन योजनाबद्धरीत्या केलेले नाही. ते तरुण असताना त्यांना सॅम्युअल बेकेटच्या नाटकांवर व्याख्यान देण्यासाठी मुंबई मराठी साहित्य संघाने बोलावले. तेथे त्यांची व्याख्याने झाली. त्यांचे हे भाषण मराठी `सत्यकथा’ मासिकात प्रकाशित झाले. त्यानंतर फ्रेन्झ काफ्का, ज्यां पोल सार्त्र, आल्बर्ट काम्यू यांच्यावर सुरुवातीला त्यांनी लेख लिहिले. त्यानंतर त्यांचे `सिसिफस आणि बेलाक्वा’ हे पुस्तक तयार झाले. पुढे `सत्यकथा’ मासिकात त्यांचे लेख समीक्षा प्रसिद्ध होत राहिले. सत्यकथा मासिकांबरोबर `अभिरुचि’, `अनुष्टुभ’, `नवभारत’ या नियतकालिकांतूनही त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले.यातील अनेक लेखांवर त्या त्या वेळी चर्चाही झालेली आहे. यातील काही लेख सुरुवातीला इंग्रजीत आणि नंतर अनुवाद स्वरूपात प्रकाशित झाले.सत्यकथेतील समीक्षांमुळे त्यांचा लेखनाचा हळूहळू मोठा ऐवज तयार झाला. त्यानंतर `अक्षरांचा श्रम केला’यामधील सर्व लेखांची सारंगांनी `एकूण साहित्य’, `कथा कादंबरी’, अनुवाद’ अशा चार विभागात मांडणी करून हे लेखन केले आहे.
विलास सारंग यांच्या सर्जनशील लेखनात आणि समीक्षालेखनात एक समांतर भाग दिसून येतो. तो म्हणजे त्यांनी ज्या साहित्य प्रकारात लेखन केले आहे त्याच प्रकाराविषयी समीक्षालेखन केले आहे. विल्यम वर्डसवर्थ, एस. टी. कोलरिज, मॅथ्यू अर्नोल्ड, टी. एस. एलियट, डब्ल्यू. एच.ऑडन, हे इंग्रजी लेखक आणि मराठीत बाळ सीताराम मर्ढेकर, पु.शि. रेगे, विंदा करंदीकर यांचे साहित्य वाचून ते झपाटून गेलेले होते. '`सिलेक्टेड रायटिंग्ज’ हे पेंग्विन प्रकाशनाने काढलेले टी. एस. एलियट यांचे पुस्तक वाचून त्यावेळी त्यांच्या अंगावर मूर्तिमंत रोमांच उभे राहत असत. मर्ढेकर, एलियट आणि बरेच इंग्रजी आणि अमेरिकन लेखकांचे साहित्य अभ्यासून त्यांनी सैद्धान्तिक समीक्षा, उपयोजित समीक्षा, सूक्ष्म विश्लेषण, साहित्याची ऐतिहासिक समीक्षा आणि '`लिहित्या लेखकांचं वाचन’ असे पुष्कळसे साहित्य त्यांनी वाचलेले होते. यातूनच साहित्यावर भाष्य करण्याची विचक्षण दृष्टी त्यांना मिळाली.
पुढे बऱ्याच वर्षानी त्यांची `रुद्र’ कादंबरी जेव्हा येशू पाटील यांनी प्रकाशित करण्याचे धाडस केले त्यावेळी डॉ. वसंत. पाटणकर आणि डॉ. हरिश्चंद्र थोरात या समीक्षकांनी तिची प्रगल्भ समीक्षा केली. आधुनिक जीवनाचे संदर्भ शाबूत ठेवून सारंगांनी मिथ्यकथा आणि आधुनिकता यांना परस्परांच्या संदर्भात सक्रिय करीत लोकविलक्षण विश्व निर्माण केले आहे. त्यासाठी त्यांना पुराणकथांचा आधार घ्यावा लागला आहे. विलास सारंग हे स्वायत्ततावादी समीक्षक होते, असे जे पाटणकर आणि अन्य साहित्यकांनी त्यांचे `कोसला’चे विवेचन पाहून जे म्हटले आहे ते खरेच वास्तववादी आहे.
विलास सारंग यांनी लिहिलेली पुस्तके
- अमर्याद आहे बुद्ध (मूळ इंग्रजी)
- अक्षरांचा श्रम केला
- आतंक (कथासंग्रह)
- एन्कीच्या राज्यात (कादंबरी)
- कविता १९६९-१९८४
- घडत्या इतिहासाची वाळू'
- चिरंतनचा गंध
- तंदूरच्या ठिणग्या (मूळ इंग्रजी)
- भाषांतर आणि भाषा
- मॅनहोलमधला माणूस
- रुद्र (मूळ इंग्रजी)
- लिहित्या लेखकाचं वाचन (समीक्षा)
- वाङ्गमयीन संस्कृती व सामाजिक वास्तव
- सर्जनशोध आणि लिहिता लेखक
- सिसिफस आणि बेलाक्वा (समीक्षा)
- सोलेदाद
- Another Life (कवितासंग्रह)
- The Dhamma Man
- The Dinosaur Ship'(कादंबरी)
- Fair Tree Of The Void (कथासंग्रह)
- Indian English Poetry Since 1950 (परामर्श)
- In the Land of Enki (कादंबरी)
- Tandoor Cinders
- The Woman in Cages (कथासंग्रह)
(अपूर्ण)