"अर्चना जोगळेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q4785559
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''अर्चना जोगळेकर''' ही एक [[मराठी अभिनेत्री]] आहे. अभिनयासोबतच ती एक उत्तम कथ्थक नृत्त्यांगनाही आहे. [[आशा जोगळेकर]] या तिच्या मातोश्री.
'''अर्चना जोगळेकर''' (सासरच्या अर्चना पटवर्धन) ह्या एक [[मराठी अभिनेत्री]] आहेत. अभिनयासोबतच ्त्या एक उत्तम कथ्थक नृत्त्यांगनाही आहे. [[आशा जोगळेकर]] या त्यांच्या मातोश्री.

रेखीव चेहरा, सुडौल बांधा, बोलके डोळे आणि नृत्यातील सहजपणा हे त्यांचे विशेष गुण असून त्यामुळे त्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये उत्तम स्थान मिळविले आहे.

==इतिहास==
आशा जोगळेकर यांनी कथ्थक या नृत्यप्रकाराचे शिक्षण देणार्‍या ’अर्चना नृत्यालय’ या संस्थेची स्थापना १५ ऑगस्ट १९६३ रोजी चंद्रपूर या गावी अवघ्या एका विद्यार्थिनीला घेऊन केली. पुढच्या ४० वर्षांमध्ये नृत्यालयाच्या अंधेरी आणि दादर या शाखांत विद्यार्थिनींची संख्या १५०वर गेली.

नृत्यालयाने २००३ साली एक शाखा अमेरिकेतील प्रिन्स्टन (न्यू जर्सी) येथे काढली आणि तेथील काम आपली कन्या आणि अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांच्यावर सोपवली. त्यानंतर अर्चना जोगळेकर यांनी १९९५ साली नृत्यालयाची एक शाखा पुण्यातही काढली.

==नृत्यालयांची प्रगती==
’अर्चना नृत्यालया’तील अनेक विद्यार्थिनींना भारत सरकारची ’कल्चरल टॅलेंट’ ही शिष्यवृत्ती मिळाली. अनेक मुली नृत्यस्पर्धांत पारितोषिके मिळवतात. [[अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय]]ाच्या परीक्षांसाठी ’अर्चना नृत्यालय’ मुलींची तयारी करून घेते. अनेक मुली नृत्य अलंकार, नृत्य विशारद या परीक्षा देऊन आपली गुणवत्ता सिद्ध करतात.

==बाल कलाकार संगीत संमेलन==
’अर्चना नृत्यालया’तर्फे मुंबईत दरवर्षी अभिजात नृत्य, गायन वादन या कलांमध्ये उपजतच रस असलेल्या लहान मुलांमुलींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ’बाल कलाकार संगीत संमेलन’ आयोजित करण्यात येते.

==समाजकार==
एका वैद्यकीय प्रतिष्ठान ट्रस्टमार्फत अर्चना जोगळेकर या अनेक किडनी, हार्ट आणि कॅन्सरच्या रुग्णांना २००५ सालापासून आर्थिक मदत करत आल्या आहेत.

==पुरस्कार==
पुण्यातील सहज इव्हेन्टतर्फे अर्चना जोगळेकर पटवर्धन यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील सहभागासाठी ’गौरव पुण्याचा’ या सन्मानाने अलंकृत करण्यात आले आहे. (फेब्रुवारी २०१५)

रेखीव चेहरा, सुडौल बांधा, बोलके डोळे आणि नृत्यातील सहजपणा हे तिचे विशेष गुण असून त्यामुळे तिने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये उत्तम स्थान मिळविले आहे.

{{विस्तार}}
{{विस्तार}}

२२:४६, २१ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

अर्चना जोगळेकर (सासरच्या अर्चना पटवर्धन) ह्या एक मराठी अभिनेत्री आहेत. अभिनयासोबतच ्त्या एक उत्तम कथ्थक नृत्त्यांगनाही आहे. आशा जोगळेकर या त्यांच्या मातोश्री.

रेखीव चेहरा, सुडौल बांधा, बोलके डोळे आणि नृत्यातील सहजपणा हे त्यांचे विशेष गुण असून त्यामुळे त्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये उत्तम स्थान मिळविले आहे.

इतिहास

आशा जोगळेकर यांनी कथ्थक या नृत्यप्रकाराचे शिक्षण देणार्‍या ’अर्चना नृत्यालय’ या संस्थेची स्थापना १५ ऑगस्ट १९६३ रोजी चंद्रपूर या गावी अवघ्या एका विद्यार्थिनीला घेऊन केली. पुढच्या ४० वर्षांमध्ये नृत्यालयाच्या अंधेरी आणि दादर या शाखांत विद्यार्थिनींची संख्या १५०वर गेली.

नृत्यालयाने २००३ साली एक शाखा अमेरिकेतील प्रिन्स्टन (न्यू जर्सी) येथे काढली आणि तेथील काम आपली कन्या आणि अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांच्यावर सोपवली. त्यानंतर अर्चना जोगळेकर यांनी १९९५ साली नृत्यालयाची एक शाखा पुण्यातही काढली.

नृत्यालयांची प्रगती

’अर्चना नृत्यालया’तील अनेक विद्यार्थिनींना भारत सरकारची ’कल्चरल टॅलेंट’ ही शिष्यवृत्ती मिळाली. अनेक मुली नृत्यस्पर्धांत पारितोषिके मिळवतात. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांसाठी ’अर्चना नृत्यालय’ मुलींची तयारी करून घेते. अनेक मुली नृत्य अलंकार, नृत्य विशारद या परीक्षा देऊन आपली गुणवत्ता सिद्ध करतात.

बाल कलाकार संगीत संमेलन

’अर्चना नृत्यालया’तर्फे मुंबईत दरवर्षी अभिजात नृत्य, गायन वादन या कलांमध्ये उपजतच रस असलेल्या लहान मुलांमुलींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ’बाल कलाकार संगीत संमेलन’ आयोजित करण्यात येते.

समाजकार

एका वैद्यकीय प्रतिष्ठान ट्रस्टमार्फत अर्चना जोगळेकर या अनेक किडनी, हार्ट आणि कॅन्सरच्या रुग्णांना २००५ सालापासून आर्थिक मदत करत आल्या आहेत.

पुरस्कार

पुण्यातील सहज इव्हेन्टतर्फे अर्चना जोगळेकर पटवर्धन यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील सहभागासाठी ’गौरव पुण्याचा’ या सन्मानाने अलंकृत करण्यात आले आहे. (फेब्रुवारी २०१५)