Jump to content

"दशभुज चिंतामणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: दशभुज चिंतामणी हे देऊळ पुणे शहरातील सहकारनगरात आहे. मूर्तीचा र...
(काही फरक नाही)

२०:५१, १७ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

दशभुज चिंतामणी हे देऊळ पुणे शहरातील सहकारनगरात आहे. मूर्तीचा रंग तांबडा असल्याने त्याला नर्मदेश्वर गणपती असेही म्हणतात. दा. सि. खळदकर यांना स्वप्नात झालेल्या साक्षात्कारामुळे या श्रीची प्रतिष्ठापना झाली असे सांगण्यात येते.

मूर्तीचे वजन अडीच मण असून, कपाळावर ॐकार आहे. मूर्तीला तीन डोळे व उजवी सोंड आहे. सोंडेवर रत्‍नकलश आहे. गणपतीच्या उजव्या हातात मोदक, डाव्या हातात दात आणि बाकीच्या आठही हातांत शस्त्रे आहेत. मूर्तीला नागउंदीर यांचे आसन आहे. देवघर कलापूर्ण असून समोर शमी वृक्ष आहे. या दशभुज चिंतामणीच्या देवघरातील भिंतींवर चित्रकार जयंत खरे यांनी काढलेली गणेश पुराणातली २५ तैलचित्रे आहेत.