"कुप्रसिद्ध दहशतवादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
कोणतेही सबळ कारण नसताना किंवा चुकीच्या विचारसणीच्या प्रभावाने जी माणसे किंवा ज्यांचे गट जाळपोळ, लुटालूट, गोळीबार, बॉम्बस्फोट, खून, नरसंहार किंवा अपघात घडवून आणतात अशांना साधारणपणे दहशतवादी असे समजण्यात येते. काही कुप्रसिद्ध दहशतवाद्यांची ही जंत्री:
कोणतेही सबळ कारण नसताना किंवा चुकीच्या विचारसणीच्या प्रभावाने जी माणसे किंवा ज्यांचे गट जाळपोळ, लुटालूट, गोळीबार, बॉम्बस्फोट, खून, नरसंहार किंवा अपघात घडवून आणतात अशांना साधारणपणे दहशतवादी असे समजण्यात येते. काही कुप्रसिद्ध दहशतवाद्यांची ही जंत्री:


* [[अजमल कसाब|अजमल अमीर कसाब]] - [[२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला|मुंबईवरच्या २६/११ च्या हल्लेखोरांपैकी]] जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी. याला २१ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी फाशी देण्यात आली आहे.
* [[अजमल कसाब|अजमल अमीर कसाब]] - [[२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला|मुंबईवरच्या २६/११ च्या हल्लेखोरांपैकी]] जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी. याला २१ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी फाशी देण्यात आली.

* [[अनिस इब्राहिम]] - मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटाचा एक सूत्रधार
* [[अनिस इब्राहिम]] - मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटाचा एक सूत्रधार
* अन्वर हाजी - मुंबईत सेन्टॉर हॉटेलमध्ये स्फोट घडवणारा
* अन्वर हाजी - मुंबईत सेन्टॉर हॉटेलमध्ये स्फोट घडवणारा
* [[अफझल गुरू]] - भारताच्या संसदेवर हल्ला करून तीन पोलिसांचे बळी घेणारा. राष्ट्रपतींकडून फाशीची शिक्षा माफ करून घेण्याच्या प्रतीक्षेत अनेक वर्षे भारताच्या तुरुंगात.होता. शेवटी त्याला फाशी देण्यात आले.
* [[अफझल गुरू]] - भारताच्या संसदेवर हल्ला करून तीन पोलिसांचे बळी घेणारा. राष्ट्रपतींकडून फाशीची शिक्षा माफ करून घेण्याच्या प्रतीक्षेत अनेक वर्षे भारताच्या तुरुंगात.होता. शेवटी त्याला फाशी देण्यात आले.
* अबू बकर अल बगदादी - इस्लामिक स्टेट इन इराक अॅन्ड सीरिया (इसिस किंवा आयसिस) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या. इ.स. १९९९मध्ये जमात अल त्वाहिद अल जिहाद या नावाने स्थापन झालेली ही संघटना २००४मध्ये अल कायदाशी जोडली गेली. २००६मध्ये दहशतवाद्यांनी इराकमध्ये इस्लामिक स्टेट जाहीर केले. २०१४च्या फेब्रुवारीत कायदाशी फारकत घेऊन अबू बकर अल बगदादीने ’आयसिस खिलाफत’ घोषित केली आणि लीबिया, इजिप्त, अल्जेरिया व सौदी अरेबियामधील काही प्रदेशांवर दावा केला..
* अबू बकर अल बगदादी - इस्लामिक स्टेट इन इराक अॅन्ड सीरिया (इसिस किंवा आयसिस) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या. इ.स. १९९९मध्ये जमात अल त्वाहिद अल जिहाद या नावाने स्थापन झालेली ही संघटना २००४मध्ये अल कायदाशी जोडली गेली. २००६मध्ये दहशतवाद्यांनी इराकमध्ये इस्लामिक स्टेट जाहीर केले. २०१४च्या फेब्रुवारीत कायदाशी फारकत घेऊन अबू बकर अल बगदादीने ’आयसिस खिलाफत’ घोषित केली आणि लीबिया, इजिप्त, अल्जेरिया व सौदी अरेबियामधील काही प्रदेशांवर दावा केला.
* अबू बकर शेकाऊ - बोको हराम या दहशतवादी संघटनेचा प्रमुख. ’पाश्चात्‍य शिक्षण राक्षस आहे’ हा ’बोको हराम’ या शब्दसमूहाचा अर्थ. २००२मध्ये स्थापन झालेल्या या मुस्लिम मूलतत्त्ववादी संघटनेला अमेरिकेने २०१३मध्ये दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. इ.स. २००९ ते २०१४ या काळात बोको हरामने ५००० लोकांच्या हत्या केल्या आहेत. मुलींच्या शिक्षणाला या संघटनेचा विशेष विरोध आहे. सुमारे ५०० महिला आणि मुलांचे अपहरण या संघनेच्या लोकांनी केले आहे. त्यांमध्ये २७६ शालकरी मुलींचा समावेश आहे. बोको हरामचा भूतपूर्व म्होरक्या मोहम्मद युसुफ याचा २००९मध्ये खात्मा करण्यात आला, त्याच्या जागेवर सध्या (२०१५ साल) अबू बकर शेकाऊ आहे.
* अबू हमजा - मुंबईवर हल्ला करणार्‍यांना शस्त्रे चालवण्याचे व सागरी प्रशिक्षण देणारा
* अबू हमजा - मुंबईवर हल्ला करणार्‍यांना शस्त्रे चालवण्याचे व सागरी प्रशिक्षण देणारा
* अब्दुल करीम टुंडा - दिल्ली बॉम्बस्फोट
* अब्दुल करीम टुंडा - दिल्ली बॉम्बस्फोट

१५:२६, ५ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

कोणतेही सबळ कारण नसताना किंवा चुकीच्या विचारसणीच्या प्रभावाने जी माणसे किंवा ज्यांचे गट जाळपोळ, लुटालूट, गोळीबार, बॉम्बस्फोट, खून, नरसंहार किंवा अपघात घडवून आणतात अशांना साधारणपणे दहशतवादी असे समजण्यात येते. काही कुप्रसिद्ध दहशतवाद्यांची ही जंत्री:

  • अजमल अमीर कसाब - मुंबईवरच्या २६/११ च्या हल्लेखोरांपैकी जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी. याला २१ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी फाशी देण्यात आली.
  • अनिस इब्राहिम - मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटाचा एक सूत्रधार
  • अन्वर हाजी - मुंबईत सेन्टॉर हॉटेलमध्ये स्फोट घडवणारा
  • अफझल गुरू - भारताच्या संसदेवर हल्ला करून तीन पोलिसांचे बळी घेणारा. राष्ट्रपतींकडून फाशीची शिक्षा माफ करून घेण्याच्या प्रतीक्षेत अनेक वर्षे भारताच्या तुरुंगात.होता. शेवटी त्याला फाशी देण्यात आले.
  • अबू बकर अल बगदादी - इस्लामिक स्टेट इन इराक अॅन्ड सीरिया (इसिस किंवा आयसिस) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या. इ.स. १९९९मध्ये जमात अल त्वाहिद अल जिहाद या नावाने स्थापन झालेली ही संघटना २००४मध्ये अल कायदाशी जोडली गेली. २००६मध्ये दहशतवाद्यांनी इराकमध्ये इस्लामिक स्टेट जाहीर केले. २०१४च्या फेब्रुवारीत कायदाशी फारकत घेऊन अबू बकर अल बगदादीने ’आयसिस खिलाफत’ घोषित केली आणि लीबिया, इजिप्त, अल्जेरिया व सौदी अरेबियामधील काही प्रदेशांवर दावा केला.
  • अबू बकर शेकाऊ - बोको हराम या दहशतवादी संघटनेचा प्रमुख. ’पाश्चात्‍य शिक्षण राक्षस आहे’ हा ’बोको हराम’ या शब्दसमूहाचा अर्थ. २००२मध्ये स्थापन झालेल्या या मुस्लिम मूलतत्त्ववादी संघटनेला अमेरिकेने २०१३मध्ये दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. इ.स. २००९ ते २०१४ या काळात बोको हरामने ५००० लोकांच्या हत्या केल्या आहेत. मुलींच्या शिक्षणाला या संघटनेचा विशेष विरोध आहे. सुमारे ५०० महिला आणि मुलांचे अपहरण या संघनेच्या लोकांनी केले आहे. त्यांमध्ये २७६ शालकरी मुलींचा समावेश आहे. बोको हरामचा भूतपूर्व म्होरक्या मोहम्मद युसुफ याचा २००९मध्ये खात्मा करण्यात आला, त्याच्या जागेवर सध्या (२०१५ साल) अबू बकर शेकाऊ आहे.
  • अबू हमजा - मुंबईवर हल्ला करणार्‍यांना शस्त्रे चालवण्याचे व सागरी प्रशिक्षण देणारा
  • अब्दुल करीम टुंडा - दिल्ली बॉम्बस्फोट
  • अब्दुल सुभान - अहमदाबाद, दिल्ली, बेंगलोर स्फोट
  • अब्देल बसीत अल मेग्राही - पॅन अमेरिकन विमानात केलेल्या बॉम्बस्फोटाबद्दल जन्मठेप
  • अयमान अल जवाहिरी - ओसामा बिन लादेन आणि अब्दुल्ला आझम यांनी इ.स. १९८८ साली स्थापन केलेल्या अल कायदाचा ओसामानंतरचा म्होरक्या. ९/११नंतर अल कायदाचा जोर कमी झाला असला तरी अजूनही ही संघटना लहानमोठे दहहतवादी हल्ले करत आहे. मूलतत्त्ववादी वहाबी आणि जिहादी गटांना दहशतवादी कार्यांसाठी अयमान अल जवाहिरीची मदत चालूच आहे.
  • अली हसन सलामेह - यासर अराफत यांच्या सुरक्षापथकाचा प्रमुख, ब्लॅक सप्टेंबरचा सदस्य. इस्राईलच्या अकरा खेळाडूंचे अपहरण करून त्यांना ठार मारणारा. त्याला शेवटी ’मोसाद’ने २२-१-१९७९ ला ठार मारले.
  • अहमद उमर सईद शेख - काश्मीरमध्ये अटक, नंतर सुटका. डॅनियल पर्ल हत्याकांड प्रकरणात फाशीची शिक्षा. सध्या पाकिस्तानात तुरुंगात
  • आमीर रझा - स्लीपर सेलचा प्रमुख
  • इब्राहिम अझर
  • ओसामा बिन लादेन - अल कायदाचा प्रमुख, ९-११ चा सूत्रधार, १ मे २०११ च्या रात्री पाकिस्तानात अबोटाबाद येथे मारला गेला. अमेरिकेतील वर्ल्ड सेंटरवर वर केलेल्या ९/११ हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार.
  • खफा - मुंबईवरील हल्ल्यासाठीच्या प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात दहशवाद्यांना मदत करणारा लष्करे तोयबाचा प्रमुख दहशतवादी.
  • छोटा शकील - मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटाचा एक सूत्रधार
  • झरार शाह -
  • झाकी उर रहमान लख्वी -
  • टायगर मेमन - मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटाचा एक सूत्रधार
  • दाऊद इब्राहिम - भारतात घडणाऱ्या बहुतेक दहशतवादी घटनांमागचा सूत्रधार. हा कराचीत राहतो. मुंबईचा रहिवासी. याच्या मालकीची अनेक घरे मुंबईत आहेत. मुंबईतील स्फोट आणि २६/११च्या हल्ले याच्याच मार्गदर्शनाखाली यशस्वी होऊ शकले.
  • मसूद अझहर - मौलाना मसूद अजहर पहा.
  • महमंद डोसा -
  • मिर्झा सादाब बेग - उत्तर प्रदेशात स्फोट
  • मिस्त्री इब्राहिम -
  • मुश्ताक अहमद झरगर - मूळचा ब्रिटिश, काश्मीरमध्ये अटक, विमान अपहरणानंतर सुटका.
  • मुल्ला मोहम्मद ओमर - तालिबान या दहशतवादी संघटचा हल्लीचा (२०१५ सालचा) म्होरक्या. मूलत्तवादी मुसलमानांनी स्थापन केलेल्या तालिबानने इ.स. १९९६ ते २००१ या काळात अफगाणिस्तानातले सरकार चालवले. [[कंदाहार] ही त्यांची राजधानी होती. पाकिस्तान, सौदीअरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या तीन देशांनी या सरकारला मान्यता दिली होती. तालिबानच्या राजवटटीत इस्लामी शरिया (शरियत) या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. याच संघटनेची पाकिस्तानमधील शाखा म्हणजे ’तेहरिके तालिबान पाकिस्तान’. या संघटनेने पेशावरमधील शाळेवर हल्ला करून अनेक मुलांचा बळी घेतला.
  • मोहम्मद सज्जाद - उत्तर प्रदेशात स्फोट
  • मौलाना मसूद अजहर - जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेचा संस्थापक, काश्मीरमधील दहशतवाई कारवायांचा प्रमुख. भारतीय विमान अपहरणानंतर सुटका करावी लागली. त्यानंतर २००१ मध्ये कश्मीर विधानसभेवर व संसदेवर झालेल्या हल्ल्यांचा सूत्रधार.
  • राम गोपाल वर्मा - शाहीद अख्तर पहा.
  • रियाझ भटकल -
  • लमिन खलिफा फिमाह - पॅन अमेरिकन कंपनीच्या विमानात केलेल्या बॉम्बस्फोटाबद्दल जन्मठेप
  • शकीर -
  • (डॉ)शाहनवाझ - उत्तर प्रदेशात स्फोट
  • शाहीद अख्तर सैद ऊर्फ राम गोपाल वर्मा - अपहरण झालेल्या भारतीय विमानातील रूपेन कत्याल या प्रवाशाची विमानात हत्या करणारा.
  • सनी अहमद काझी -
  • सैद सलाहुद्दीन - हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य, काश्मीरमध्ये लष्करावर झालेल्या अनेक हल्ल्यांचा सूत्रधार.
  • हमद सादिक -
  • हाफिज सईद - मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा प्रमुख सूत्रधार व प्रमुख आरोपी (याला पकडण्यासाठी अमेरिकेने एक कोटी डॉलरचे बक्षीस ठेवले आहे.) लष्करे तैयबा या संघटनेचा संस्थापक आणि प्रमुख. १९९०मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेवर २००२मध्ये पाकिस्तानने बंदी घातली. तरी संघटनेच्या दहशतवादी कारवाया चालूच आहेत. भारताविरुद्ध वारंवार गरळ ओकणार्‍या हाफिज सईदचा पाकिस्तानत मुक्त वावर असून अधूनमधून पाकिस्तान सरकार त्याला नजरकैदेत ठेवते. त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे नाहीत असा पाकिस्तानचे म्हणणे आहे. भारताने दिलेले पुरावे अजून पाकिस्तानने गंभीरतापूर्वक मान्य केलेले नाहीत. लाहोरजवळच्या मुरिदके येथून लष्करे तैयबाची सूत्रे हालतात. ’जमात उद्‌ दवा’ हे लष्करे तैयबाचेच नवे रूप आहे.