"सतीश नाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: भारतात अनेक जणांचे नाव सतीश असते, नाईक हेही महाराष्ट्रातले अनेक... |
(काही फरक नाही)
|
१९:२३, ४ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती
भारतात अनेक जणांचे नाव सतीश असते, नाईक हेही महाराष्ट्रातले अनेकांचे आडनाव. त्यामुळे सतीश नाईक या नावाच्या अनेक व्यक्ती महाराष्ट्रात असतील यात काहीच शंका नाही. अशा काही विविध कारणांनी प्रसिद्धीस आलेल्या सतीश नाईक नावाच्या व्यक्ती :
- चित्रकार सतीश नाईक : एक प्रतिभावंत कलाकार. ’चिन्ह’ या कलाकौशल्यविषयक नियतकालिकाचे संपादक.
- लेखक सतीश नाईक : पाक शास्त्रावर लिखाण करणारे सतीश नाईक यांनी ’आली आली दिवाळी’, पक्वान्ने स्वादिष्ट करायचीत?’ ही पुस्तके लिहिली आहेत.
- नाटककार सतीश नाईक - यांना १९८१ साली नाट्यदर्पण पुरस्कार मिळाला होता.
- डॉ. सतीश नाईक : व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर लिहिणारे एक लेखक-डॉक्टर. यांचे ’तणावमुक्त होऊ या’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
- शिवसेनेचे सतीश नाईक : हे शिवसेना या राजकीय पक्षाचे कोकणातले एक कार्यकर्ते आहेत.
- सतीश (सदाशिव) नाईक : हे ’सत्यानंद महाराज बालब्रह्मचारी’ नावाने वावरणारे आणि काही गुन्ह्यांसाठी अटक झालेले एक कुप्रसिद्ध बाबा आहेत.