"बेबी शकुंतला" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''बेबी शकुंतला''' ([[१७ नोव्हेंबर]], [[इ.स. १९३२]] - [[१८ जानेवारी]], [[इ.स. २०१५]]) |
'''बेबी शकुंतला''' (जन्म : [[१७ नोव्हेंबर]], [[इ.स. १९३२]] - मृत्यू : कोल्हापूर, [[१८ जानेवारी]], [[इ.स. २०१५]]) या मराठी-हिंदी चित्रपटांत काम करणार्या आघाडीच्या अभिनेत्री होत्या. त्यांचे चित्रपटांत येण्यापूर्वीचे नाव '''शकुंतला महाजन''' आणि लग्नानंतरचे नाव '''उमादेवी खंडेराव नाडगौडा''' होते. महाजन कुटुंबातील त्या एकमेव कन्या होत्या. वडील छापखान्यात नोकरीला होते .प्रभात स्टुडियोचे मालक दामले हे त्यांच्या आईचे नातेवाईक होते. त्यांनी विचारणा केल्यामुळे (बेबी)शकुंतला सिनेमात आल्या. |
||
प्रभात फिल्म कंपनीच्या [[दहा वाजता]] या पहिल्या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेने त्यांच्या अभियनय कारकिर्दीस १९४२ मध्ये सुरुवात झाली़. त्यांनी आपल्या आयुष्यात ६० मराठी आणि ४० हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या होत्या. |
प्रभात फिल्म कंपनीच्या [[दहा वाजता]] या पहिल्या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेने त्यांच्या अभियनय कारकिर्दीस १९४२ मध्ये सुरुवात झाली़. त्यांनी आपल्या आयुष्यात ६० मराठी आणि ४० हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या होत्या. |
००:२२, २१ जानेवारी २०१५ ची आवृत्ती
बेबी शकुंतला (जन्म : १७ नोव्हेंबर, इ.स. १९३२ - मृत्यू : कोल्हापूर, १८ जानेवारी, इ.स. २०१५) या मराठी-हिंदी चित्रपटांत काम करणार्या आघाडीच्या अभिनेत्री होत्या. त्यांचे चित्रपटांत येण्यापूर्वीचे नाव शकुंतला महाजन आणि लग्नानंतरचे नाव उमादेवी खंडेराव नाडगौडा होते. महाजन कुटुंबातील त्या एकमेव कन्या होत्या. वडील छापखान्यात नोकरीला होते .प्रभात स्टुडियोचे मालक दामले हे त्यांच्या आईचे नातेवाईक होते. त्यांनी विचारणा केल्यामुळे (बेबी)शकुंतला सिनेमात आल्या.
प्रभात फिल्म कंपनीच्या दहा वाजता या पहिल्या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेने त्यांच्या अभियनय कारकिर्दीस १९४२ मध्ये सुरुवात झाली़. त्यांनी आपल्या आयुष्यात ६० मराठी आणि ४० हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या होत्या.
बेबी शकुंतला यांनी भालजी पेंढारकर, अनंत माने, दिनकर डी. पाटील, बिमल रॉय आणि बी.आर. चोप्रा यांच्यासारख्या नामवंत दिग्दशर्कांच्या हाताखाली काम केले आहे.
बेबी शकुंतला यांची भूमिका असलेले चित्रपट
- अखेर जमलं
- अबोली
- कमल के फूल (हिंदी)
- चिमणी पाखरे
- छत्रपती शिवाजी
- झमेला (हिंदी)
- तारामती
- दहा वाजता
- नन्हे-मुन्ने (हिंदी)
- परदेस (हिंदी)
- फ़रेब (हिंदी)
- भाग्यवान
- मायबहिणी
- मायाबाजार
- मी दारू सोडली
- रामशास्त्री
- लहरें (हिंदी)
- शारदा
- सपना (हिंदी)
- सौभाग्य