"रामगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: सांगली जिल्ह्यामध्ये रामगड (रामदुर्ग) नावाचा एक अतिशय छोटा किल... |
(काही फरक नाही)
|
०१:२६, २ जानेवारी २०१५ ची आवृत्ती
सांगली जिल्ह्यामध्ये रामगड (रामदुर्ग) नावाचा एक अतिशय छोटा किल्ला आहे. किल्ल्याची उंची जेमेतेम १५० फूट आहे.
जत हा सांगली जिल्ह्यातील पूर्वेकडील तालुका. याच तालुक्यात [[जत-कवठे महांकाळ रस्त्यावर जतपासून अवघ्या ५ किमी अंतरावर रामपूर नावाचे गाव आहे. या गावात एक छोटा, देखणा व अप्रसिद्ध किल्ला लपला आहे त्याचे नाव रामगड. रामपूर गावाच्या मागच्याच टेकडीवर हा छोटेखानी किल्ला आहे. ही टेकडी इतकी छोटी आहेत की टेकडी चढायला सुरुवात करेपर्यंत माणूस किल्ल्याच्या महादरवाज्यात येऊन पोहोचतो.
रामपूर गावाच्या मागे एक पाण्याची टाकी आहे तेथून अगदी पाचच मिनिटात गडाच्या ढासळलेल्या तटबंदीवरून किंवा प्रवेशद्वारातून गडात प्रवेश करता येतो. इथल्या स्थानिकांना या किल्ल्याबद्दल कोणतीही आस्था दिसत नाही हे किल्याच्या दुरवस्थेवरूनच लक्षात येते. किल्ल्यामध्ये बाभळीचे भयंकर रान माजले आहे त्यामुळे येथे चालताना खूप काळजी घ्यावी लागते.