Jump to content

"ज.के. उपाध्ये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: जयकृष्ण केशव उपाध्ये (जन्म : नागपूर, ३० मे, इ.स. १८८६; मृत्यू : नागपूर,...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: असभ्यता ?
ओळ १: ओळ १:
जयकृष्ण केशव उपाध्ये (जन्म : नागपूर, ३० मे, इ.स. १८८६; मृत्यू : नागपूर, १ सप्टेंबर, इ.स. १९३७) हे एक मराठी कवी होते. त्यांनी [[उमर खय्याम]] यांच्या फारसी [[रुबाई|रुबायांचे]] मराठी अनुवाद केले आहेत.

उपाध्ये यांचा बालपणापासूनच अध्यात्माकडे ओढा होता. वयाच्या २३व्या वर्षी वर्ढ्याजवळच्या हनुमानगड येथे जाऊन त्यांनी तीन वर्षे रामाचा जप केला होता. तीर्थयात्रा करीत त्यांनी बरेच देशभ्रमण केले. पत्‍नी आणि मुलीच्या अकाली मृत्यूमुळे त्यांना एकाकीपण आणि उदासीनता प्राप्त झाली होती. अशा वृत्तीमुळे लोक त्यांना ’बुवा’ म्हणून ओळखत.

==काव्यलेखन==
उपाध्ये यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी कविता करायला प्रारंभ केला. विषयांची विविधता आणि श्लेषयुक्त सफाईदार रचना हे त्यांच्या काव्याचे विशेष होते. त्यांच्या काव्यांत शृंगार, विनोद, विडंबन, स्वधर्मप्रेम व राष्ट्रभक्ती हे सर्व आढळते. ’श्रीरामराज्याभिषेक’, ’जगन्मोहिनी’, ’अहिल्याकृत रामस्तुती’, ’द्रौपदीचा धावा’ या त्यांच्या भक्तिपर कविता. पत्‍नी व मुलीच्या निधनाचे दुःख अत्यंत आर्त गीतातून व्यक्त करणारी ’आता मला न माझी’ ही कविताही त्यांचीच. ’चहाटळपणा’, ’कविते करिन तुला मी ठार’ ’चालचलाऊ गीता’, ’बावळट बाळू’ यांसारख्या विनोदी आणि विडंबनात्मक कविता त्यांनी लिहिल्या.

’वागीश्वरी’, ’विहंगम’ इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या उपाध्ये यांच्या काही कविता कोणत्याही पुस्तकांत समाविष्ट होऊ शकल्या नाहीत.

==ज.के. उपाध्ये यांची काव्याची पुस्तके==
* पोपटपंची (१९२९). हा इ.स. १९०९ ते १९२९ या कालखंडात लिहिलेल्या कवितांपैकी निवडक ४३ कवितांचा संग्रह आहे.

००:२३, २८ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

जयकृष्ण केशव उपाध्ये (जन्म : नागपूर, ३० मे, इ.स. १८८६; मृत्यू : नागपूर, १ सप्टेंबर, इ.स. १९३७) हे एक मराठी कवी होते. त्यांनी उमर खय्याम यांच्या फारसी रुबायांचे मराठी अनुवाद केले आहेत.

उपाध्ये यांचा बालपणापासूनच अध्यात्माकडे ओढा होता. वयाच्या २३व्या वर्षी वर्ढ्याजवळच्या हनुमानगड येथे जाऊन त्यांनी तीन वर्षे रामाचा जप केला होता. तीर्थयात्रा करीत त्यांनी बरेच देशभ्रमण केले. पत्‍नी आणि मुलीच्या अकाली मृत्यूमुळे त्यांना एकाकीपण आणि उदासीनता प्राप्त झाली होती. अशा वृत्तीमुळे लोक त्यांना ’बुवा’ म्हणून ओळखत.

काव्यलेखन

उपाध्ये यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी कविता करायला प्रारंभ केला. विषयांची विविधता आणि श्लेषयुक्त सफाईदार रचना हे त्यांच्या काव्याचे विशेष होते. त्यांच्या काव्यांत शृंगार, विनोद, विडंबन, स्वधर्मप्रेम व राष्ट्रभक्ती हे सर्व आढळते. ’श्रीरामराज्याभिषेक’, ’जगन्मोहिनी’, ’अहिल्याकृत रामस्तुती’, ’द्रौपदीचा धावा’ या त्यांच्या भक्तिपर कविता. पत्‍नी व मुलीच्या निधनाचे दुःख अत्यंत आर्त गीतातून व्यक्त करणारी ’आता मला न माझी’ ही कविताही त्यांचीच. ’चहाटळपणा’, ’कविते करिन तुला मी ठार’ ’चालचलाऊ गीता’, ’बावळट बाळू’ यांसारख्या विनोदी आणि विडंबनात्मक कविता त्यांनी लिहिल्या.

’वागीश्वरी’, ’विहंगम’ इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या उपाध्ये यांच्या काही कविता कोणत्याही पुस्तकांत समाविष्ट होऊ शकल्या नाहीत.

ज.के. उपाध्ये यांची काव्याची पुस्तके

  • पोपटपंची (१९२९). हा इ.स. १९०९ ते १९२९ या कालखंडात लिहिलेल्या कवितांपैकी निवडक ४३ कवितांचा संग्रह आहे.