Jump to content

"रंगत संगत प्रतिष्ठान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: रंगत संगत प्रतिष्ठान ही नाट्य, कला, विषयक उपक्रम करणारी पुण्यातल...
(काही फरक नाही)

१५:०९, २२ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

रंगत संगत प्रतिष्ठान ही नाट्य, कला, विषयक उपक्रम करणारी पुण्यातली सांस्कृतिक संस्था लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट प्रमोद आडकर यांनी ७ जून १९९२ रोजी स्थापन केली. ही संस्था दर महिन्याला विविध उपक्रम सतत सादर करत असते. नामांकित तसेच नवोदित, कलावतांना हक्काचे व्यासपीठ व संधी देण्याचे कार्य ही संस्था अनेक वर्षे करत आहे.

संस्थेचे उपक्रम

  • कवींना त्यांचे हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी, संस्थेतर्फे दर महिन्याला एक काव्य विषयक उपक्रम, मोठया कवी संमेलनाचे आयोजन आणि दर वर्षाला दोन दिवसांचा भव्य राज्यव्यापी काव्य महोत्सव आयोजित केला जातो.
  • संस्थेने, मराठीतील ज्येष्ठ शायर यवतमाळचे भाऊसाहेब पाटणकर यांना पुण्यात आणून त्यांचा ५,००० पुणेकरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ मोठया थाटात पार पाडला. हा सत्कार राजा गोसावी[ आणि ना.सं. इनामदार यांच्या हस्ते झाला.
  • अण्णा हजारे यांच्या "वाट ही संघर्षाची’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित केला. समारंभाला सुशीलकुमार शिंदे आणि आर.आर. पाटील उपस्थित होते.
  • नाटककार. वसंत कानेटकर यांच्या पंच्याहत्तरी निमित्त सत्कार सोहळा संस्थेने आयोजित केला..
  • महिला ज्योतिष शास्त्रज्ञ प्रतिभाताई शाहू मोडक यांचा त्यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त, डॉ. विजय भटकर, डॉ. के.एच. संचेती, श्री. मोहन धारिया यांच्या उपस्थितीत सत्कार घडवून आणला.
  • गझलकार रमण रणदिवे यांना रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे काव्य जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार समारंभाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष फ.मुं. शिंदे, उल्हास पवार, मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य उपस्थित होते.