Jump to content

"पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११: ओळ ११:
* युवराजनिधन-काव्य (१९०९)
* युवराजनिधन-काव्य (१९०९)
* समाधिशतावली
* समाधिशतावली

==इतिहासलेखन==
उत्तर कोंकणाचा प्राचीन इतिहास (१९२६) हा ग्रंथ पु.बा. जोशींनी डॉ. [[श्री.व्यं. केतकर]] यांच्या ज्ञानकोशासाठी लिहिला. ह्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत ’महिकावतीची बखर’ला इतिहासाचार्य [[वि.का. राजवाडे]] यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील अनेक विधाने जोशींनी साधार खोडून काढली आहेत.

==पुरस्कार==
पु.बा. जोशी ह्यांच्या वाङ्‌मयसेवेबद्दल त्यांना मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे ’कॅम्पबेल सुवर्णपदक’ मिळाले होते.


{{DEFAULTSORT:जोशी, पुरुषोत्तम बाळकृष्ण}}


[[वर्ग:इतिहासकार]]
[[वर्ग:इतिहासकार]]
[[वर्ग:मराठी कवी]]
[[वर्ग:मराठी कवी]]
{{वर्ग:इ.स.१८५६ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९२९ मधील मृत्यू]]

१४:४३, १४ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी (जन्म : ५ मार्च, इ.स. १८५६; मृत्यू : मुंबई, २६ मार्च, इ.स. १९२९) हे मुंबई इलाख्याची दर्शनिका (गॅझेटियर) तयार करण्यात सहभाग असलेले मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासाचे अभ्यासक व कवी होते.

पु.बा. जोशी यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे जिल्ह्यातील केळवे येथे आणि हायस्कूलचे शिक्षण मुंबईत झाले. इ.स. १८७५मध्ये मॅट्रिक झाल्यावर जोशी कस्टम्स खात्यात नोकरीला लागले. कस्टम्समधील जेम्स क~म्बेल हे विद्याभिलाषी इंग्रज अधिकारी होते. त्यांची मुंबई इलाख्याच्या गॅझेटियरसाठी मुख्य संपादक म्हणून नेमणूक होताच त्यांना पु.बा.साहाय्यक म्हणून निवडले. जोशींनी दर्शनिकेसाठी संशोधनपर लेखन करतानाचइतिहास संशोधन व मानववंशशास्त्र (अॅन्थ्रॉपॉलॉजी) ह्या विषयांवर निबंध प्रकाशित केले. ट्य़ाआ खाआलाआट झॊशःऎऎम्छॆ ’टाइम्स ऑफ इंडिया’त हिंदुधर्म व इतिहास यांवर अनेक लेख प्रसिद्ध झाले.

पु.बा. जोशी यांच्या कविता व मराठी लेख ’मासिक मनोरंजन’. चित्रमयजगत’, ’विविधज्ञानविस्तार’ आणि ’नवयुग’ आदी नियतकालिकांतून प्रकाशित झाले. त्यांचा कल साधारणपणे दीर्घकाव्ये लिहिण्याकडे होता, असे दिसते. राष्ट्रीय सद्गुण व स्वदेशप्रीती यांच्या संवर्धनाचा हेतू बाळगून त्यांनी बरीच काव्ये लिहिली आहेत.

पु.बा. जोशी यांची स्फुट काव्ये

  • काव्यरत्‍न पहिले (१९१६)
  • पद्यसुधा (१८८२)
  • मुक्तावली (१८७३)
  • युवराजनिधन-काव्य (१९०९)
  • समाधिशतावली

इतिहासलेखन

उत्तर कोंकणाचा प्राचीन इतिहास (१९२६) हा ग्रंथ पु.बा. जोशींनी डॉ. श्री.व्यं. केतकर यांच्या ज्ञानकोशासाठी लिहिला. ह्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत ’महिकावतीची बखर’ला इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील अनेक विधाने जोशींनी साधार खोडून काढली आहेत.

पुरस्कार

पु.बा. जोशी ह्यांच्या वाङ्‌मयसेवेबद्दल त्यांना मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे ’कॅम्पबेल सुवर्णपदक’ मिळाले होते. {{वर्ग:इ.स.१८५६ मधील जन्म]]