"कृष्णा कल्ले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ८: | ओळ ८: | ||
==कृष्णा कल्ले यांनी गायिलेली मराठी गाणी (कंसात संगीत दिग्दर्शकाचे नाव)== |
==कृष्णा कल्ले यांनी गायिलेली मराठी गाणी (कंसात संगीत दिग्दर्शकाचे नाव)== |
||
* अंतरंगी रंगलेले गीत |
|||
* अशा या चांदराती |
|||
* अशी नजर घातकी बाई |
|||
* आईपण दे रे |
|||
* इथे मिळाली सागर-सरिता |
|||
* ऊठ शंकरा सोड समाधी ([[दत्ता डावजेकर]]]] |
* ऊठ शंकरा सोड समाधी ([[दत्ता डावजेकर]]]] |
||
* कशी रे आता जाऊ घरी |
|||
* कामापुरता मामा |
|||
* कुणि काहि म्हणा |
|||
* कुंजात विहरतो सुगंध शिंपित |
|||
* गुपित मनिचे राया |
|||
* गोड गोजिरी लाज लाजरी, ताई तू होणार नवरी ([[हृदयनाथ मंगेशकर]]) |
* गोड गोजिरी लाज लाजरी, ताई तू होणार नवरी ([[हृदयनाथ मंगेशकर]]) |
||
* चंद्र अर्धा राहिला रात्र |
|||
* चंद्रकळा रुक्मिणी नेसली |
|||
* तांडा चालला रे गड्या |
|||
* तुझ्याचसाठी कितीदा |
|||
* तू अनश्वरातील अमरेश्वर |
|||
* तू अबोल होउन जवळी मजला |
|||
* तू माझ्या स्वप्नांची कल्पना (ओम दत्ता) |
* तू माझ्या स्वप्नांची कल्पना (ओम दत्ता) |
||
* देश हीच माता देश जन्मदाता, घडो देशसेवा ऐसी, बुद्धी दे अनंता ([[श्रीनिवास खळे]]) |
* देश हीच माता देश जन्मदाता, घडो देशसेवा ऐसी, बुद्धी दे अनंता ([[श्रीनिवास खळे]]) |
||
* नाचतो डोंबारी रं |
|||
* पत्र तुझे ते येता अवचित |
|||
* परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशिल का ([[अनिल मोहिले]]) |
* परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशिल का ([[अनिल मोहिले]]) |
||
* पुनवेचा चंद्रमा आला घरी, चांदाची किरणं दर्यावरी (बाळ पार्टे) |
* पुनवेचा चंद्रमा आला घरी, चांदाची किरणं दर्यावरी (बाळ पार्टे) |
||
ओळ १९: | ओळ ३७: | ||
* मैना राणी चतुर शहाणी ([[श्रीनिवास खळे]]) |
* मैना राणी चतुर शहाणी ([[श्रीनिवास खळे]]) |
||
* रामप्रहरी रामगाथा ([[श्रीनिवास खळे]]) |
* रामप्रहरी रामगाथा ([[श्रीनिवास खळे]]) |
||
==कृष्णा कल्ले यांनी गायिलेली हिंदी गाणी== |
==कृष्णा कल्ले यांनी गायिलेली हिंदी गाणी== |
१७:०२, २९ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती
कृष्णा कल्ले या एक मराठी सुगम संगीत गायिका आहेत. त्यांनी १९६० तसेच १९७०च्या दशकात दोनशेहून अधिक हिंदी व शंभरहून मराठी गाणी गायली आहेत. 'केला इशारा जाता जाता' आणि 'एक गाव बारा भानगडी' या त्याकाळी गाजलेल्या चित्रपटांतील लावण्या त्यांनीच गायलेल्या आहेत. त्या इ.स. १९६०पासून मुंबई आकाशवाणीच्या 'अ' श्रेणीच्या गायिका होत्या.
मूळच्या कारवारी, पण वडिलांच्या उत्तरप्रदेशातील कानपूर येथील नोकरीमुळे कृष्णा कल्ले यांचा जन्म आणि बालपण, शिक्षण कानपूरच्याच हिंदीभाषी प्रदेशात झाले. परिणामी त्यांच्या गळ्यावर मूळच्या कारवारी भाषेऐवजी हिंदी-ऊर्दू भाषेचाच लहजा चढला. शालेय जीवनात त्या गायन शिकत असताना स्पर्धांमध्ये आपले गुण प्रदर्शित करून त्यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पारितोषिके पटकावली होती. त्यांच्या गोड आवाजामुळे सोळा वर्षांच्या असतानाच कानपूर रेडिओ स्टेशनवर त्या गायला लागल्या. सोबत उत्तर प्रदेशात होणार्या यात्रां-जत्रांतील संगीत समारोहांत देखील त्यांचा आवाज गुंजायला लागला.
एकदा मुंबईत नातेवाईकांकडे आल्या असताना कृष्णा कल्ले यांचा आवाज गायक [[अरुण दाते] यांच्या कानावर पडला आणि त्यांनी हा आवाज मुंबई आकाशवाणीवर काम करणार्या संगीत दिग्दर्शक यशवंत देवांपर्यंत पोहचवला. आधी देवांनी आणि नंतर [[अनिल मोहिले] यांनी कृष्णा कल्ले यांच्याकडून मराठी भावगीते गाऊन घेतली.
जमाने से पूछो, टारझन और जादुई चिराग, प्रोफेसर और जादूगर, रास्त और मंजिलें आदी काही दुय्यम दर्जाच्या हिंदी चित्रपटांतही कृष्णा कल्ले यांनी गाणी गायली. हिंदीतील सुमारे २०० आणि मराठीतील सुमारे १०० चित्रपटगीतांना त्यांनी आवाज दिला. १००हून अधिक भजने, भक्तिगीते व गझला त्या गायल्या आहेत.
कृष्णा कल्ले यांनी गायिलेली मराठी गाणी (कंसात संगीत दिग्दर्शकाचे नाव)
- अंतरंगी रंगलेले गीत
- अशा या चांदराती
- अशी नजर घातकी बाई
- आईपण दे रे
- इथे मिळाली सागर-सरिता
- ऊठ शंकरा सोड समाधी (दत्ता डावजेकर]]
- कशी रे आता जाऊ घरी
- कामापुरता मामा
- कुणि काहि म्हणा
- कुंजात विहरतो सुगंध शिंपित
- गुपित मनिचे राया
- गोड गोजिरी लाज लाजरी, ताई तू होणार नवरी (हृदयनाथ मंगेशकर)
- चंद्र अर्धा राहिला रात्र
- चंद्रकळा रुक्मिणी नेसली
- तांडा चालला रे गड्या
- तुझ्याचसाठी कितीदा
- तू अनश्वरातील अमरेश्वर
- तू अबोल होउन जवळी मजला
- तू माझ्या स्वप्नांची कल्पना (ओम दत्ता)
- देश हीच माता देश जन्मदाता, घडो देशसेवा ऐसी, बुद्धी दे अनंता (श्रीनिवास खळे)
- नाचतो डोंबारी रं
- पत्र तुझे ते येता अवचित
- परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशिल का (अनिल मोहिले)
- पुनवेचा चंद्रमा आला घरी, चांदाची किरणं दर्यावरी (बाळ पार्टे)
- फुलं स्वप्नाला आली गं (सुधीर फडके)
- बिब्बं घ्या बिब्बं, शिक्ककाई गल्लीबोळातनं वरडत जाई (राम कदम)
- मन पिसाट माझे अडले रे (यशवंत देव)
- मैना राणी चतुर शहाणी (श्रीनिवास खळे)
- रामप्रहरी रामगाथा (श्रीनिवास खळे)
कृष्णा कल्ले यांनी गायिलेली हिंदी गाणी
- गाल गुलाबी नैन शराबी (सहगायक मोहंमद रफी)
पुस्तक
कृष्णा कल्ले यांच्या जीवनावर 'गायिका कृष्णा कल्ले : एक कृतार्थ गानप्रवास' नावाचे पुस्तक वसुधा कुलकर्णी यांनी लिहिले आहे.
पुरस्कार आणि सन्मान
- जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते यूथ फेस्टिवल पुरस्कार
- राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते १९५७ मध्ये गायनासाठी पुरस्कार
- १९५८मध्ये अखिल भारतीय सुगम संगीताचे पहिले पारितोषिक
- पी. सावळाराम प्रतिष्ठान आणि ठाणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येणारा ‘गंगा जमुना पुरस्कार’
- अरुण दाते यांच्या आग्रहाखातर कृष्णा कल्ले यांनी १९६५मध्ये त्यांनी राष्ट्रीय पातळीवरच्या गायन स्पर्धेत भाग घेतला आणि सेहगल मेमोरियलतर्फे देण्यात येणारा गोल्डन 'गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया'चा किताब मिळवला.
- महाराष्ट्र सरकारच्या वतीने देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.