"रघुवीर नेवरेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: {{गल्लत|श्रीपाद नेवरेकर}} रघुवीर नेवरेकर (जन्म : १६ नोव्हेंबर १९२८;...
(काही फरक नाही)

११:४४, २४ नोव्हेंबर २०१४ ची आवृत्ती


रघुवीर नेवरेकर (जन्म : १६ नोव्हेंबर १९२८; मृत्‍यू : मुंबई, २३ नोव्हेंबर २०१४) हे एक मराठी नाट्य‍अभिनेते होते. त्यांच्या स्त्री-भूमिकाही गाजल्या. त्या उत्तम खलनायक होते.

धी गोवा हिंदू असोसिएशनच्या संशयकल्लोळ, शारदा, मृच्छकटिकम् नाटकांत त्यांनी काम केले होते. संशयकल्लोळमधील फाल्गुनराव, शारदामध्ये भुजंगराव या नेवरकेर यांच्या भूमिका गाजल्या. गोवा असोसिएशनच्या 'मरणात खरोखर जग जगते' या नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. राज्य नाट्य स्पर्धा सुरू झाल्यानंतर सलग तीन वर्ष सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार त्यांनी पटकावला होता. 'करीन ती पूर्व' या नाटकातील अभिनय पाहून विख्यात दिग्दर्शक विमल रॉयही भारावून गेले होते. यशस्वी उद्योजक म्हणूनही त्यांनी काम केले होते. अभिनेते अशोक सराफ व सुभाष सराफ यांचे नेवरेकर हे मामा होत.

एकोणीसशे ऐंशीच्या दशकात दूरदर्शनवरील श्वेतांबरा या गाजलेल्या मालिकेत गायकवाड नावाचा कोल्ड ब्लडेड व्हिलनच्या भूमिकेत त्यांनी रंग आणला होता.

नेवरेकरांच्या भूमिका असलेली नाटके आणि (कंसात त्यांतील पात्रांची नावे)

  • एकच प्याला (गीता)
  • करीन ती पूर्व (हिरोजी/शिवाजी)
  • कुलवधू (बापाजी)
  • भावबंधन (इंदू)
  • मृच्छकटिकम्‌
  • शारदा (श्रीमंत)
  • सत्तेचे गुलाम (केरोपंत)
  • संशयकल्लोळ (फाल्गुनराव)

वर्गइ.स. २०१४ मधील मृत्यू