Jump to content

"शोभा अभ्यंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. शोभा अभ्यंकर (जन्म : २० जानेवारी, १९४६; मृत्यू : १७ ऑक्टोबर, २०१४)...
(काही फरक नाही)

१७:४९, १८ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

डॉ. शोभा अभ्यंकर (जन्म : २० जानेवारी, १९४६; मृत्यू : १७ ऑक्टोबर, २०१४) या एक मराठी शास्त्रीय संगीत गुरू होत्या.

डॉ. शोभा अभ्यंकर यांना एसएनडीटी विद्यापीठातून संगीत विषय घेऊन एमए करताना विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळाला होता. पुणे विद्यापीठातून त्यांनी संगीत विषयात डॉक्टरेट संपादन केली. पीएच.डी.साठी 'मराठी भावसंगीताची वाटचाल' या विषयावर प्रबंध सादर करून शोभा अभ्यंकर यांनी पीएच. डी. संपादन केली. त्यासाठी संगीत क्षेत्रातील अनेकांच्या अभ्यासपूर्ण प्रदीर्घ मुलाखती घेतल्या होत्या. हा प्रबंध राजहंस प्रकाशनने 'सखी. भावगीत माझे' या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर आणला.

डॉ. शोभा अभ्यंकर यांचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण प्रथम पंडित गंगाधरबुवा पिंपळखरे व नंतर पंडित वि.रा. आठवले आणि संगीतमार्तंड पंडित जसराज यांच्याकडे झाले. घशाच्या त्रासामुळे गायिका म्हणून त्यांनी कारकीर्द घडविली नसली तरी 'गायन गुरु' म्हणून त्यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. डॉ. अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विद्यापीठ आणि एसएनडीटी विद्यापीठामधून अनेक शिष्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. त्यातील अनेकांना विविध पारितोषिके आणि राष्ट्रीय शिष्यवृत्त्या मिळाल्या आहेत.

=डॉ. शोभा अभ्यंकर यांना मिळालेले पुरस्कार=-

  • ना.द. कशाळकर पुरस्कार
  • गानहिरा पुरस्कार
  • वसंत देसाई पुरस्कार
  • विष्णू दिगंबर पलुस्कर पुरस्कार
  • रागऋषी पुरस्कार