Jump to content

"भगवान ठग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०: ओळ ३०:
==सन्मान==
==सन्मान==
* 'इंटरनॅशनल हूज हू'ने 'पोएट्री अॅन्ड पोएट एन्सायक्लोपीडिया'मध्ये केवळ भगवान ठग या एकाच वैदर्भीय कवीची नोंद केली आहे.
* 'इंटरनॅशनल हूज हू'ने 'पोएट्री अॅन्ड पोएट एन्सायक्लोपीडिया'मध्ये केवळ भगवान ठग या एकाच वैदर्भीय कवीची नोंद केली आहे.
* भगवान ठग यांनी वाशीम जिल्ह्यातल्या रिसोड या गावी भरणार्‍या [[एकलव्य साहित्य संमेलन|एकलव्य साहित्य संमेलनाचे ]] अध्यक्षपद भूषविले होते.






१४:५३, १२ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

भगवान ठग (जन्म : हिवरखेड (खामगाव-विदर्भ), २४ जानेवारी, १९५३; मृत्यू : बुलढाणा, २० जानेवारी, इ.स. २००९) हे कवी आणि अनुवादक होते. खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी हिवरखेडसारख्या खेडेगावात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतले. भूमि-अभिलेख खात्यात सवेर्क्षक म्हणून ते सरकारी नोकरी करीत होते. स्वतःच्या पगारातील अर्धाअधिक रक्कम आणि वेळ पडल्यास प्रॉव्हिडन्ट फंडातून कर्ज काढून त्यांनी ही साहित्यसेवा आयुष्याच्या अखेरपर्यंत सुरू ठेवली होती. ’साने गुरुजींच्या आंतरभारतीचे स्वप्न साहित्यातून प्रत्यक्षात साकार करण्यासाठी अविरत झटणारा एक कार्यकर्ता' असे स्वतःबद्दल ते अभिमानाने सांगत असत.

त्यांनी अनेक भाषांमधील कवितांचा मराठीत अनुवाद केला. काही मराठी कवींच्या कवितांचे त्यांनी केलेले इंग्रजी अनुवादही प्रकाशित झाले होते.

भगवान ठग यांनी महाराष्ट्र अनुवाद परिषद या संस्थेची स्थापना केली होती.[] तुका म्हणे या नावाने असलेले अनियतकालिक ते चालवीत असत व त्याच नावाचा पुरस्कार दरवर्षी मराठीतील निवडक साहित्यकृतींना देत असत.

लेखन

कवितासंग्रह (एकूण ११ पैकी १०))

  • अनर्थ
  • अन्नदात्याची धुळाक्षरे
  • आत्मपक्षी
  • मराठी पोएट्रीज (८ खंड)
  • माझ्या आत्म्याच्या चुंबकीय परिघात
  • युद्ध
  • वणव्याला वळण देण्यासाठी
  • वाळवीची कुळे
  • सूर्यफुलांचे पीक सांभाळण्यासाठी
  • क्षण काव्य

अनुवाद (एकूण १२ पुस्तके)

  • हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांत कविता लेखन

समीक्षा ग्रंथ

  • आधुनिक मराठी कवितेचे पीक पाणी
  • समकालीन मराठी कवी आणि कविता

संकलन

  • १८० मराठी कवींच्या कवितांचे 'समकालीन कविता' या नावाने संपादन

सन्मान

  • 'इंटरनॅशनल हूज हू'ने 'पोएट्री अॅन्ड पोएट एन्सायक्लोपीडिया'मध्ये केवळ भगवान ठग या एकाच वैदर्भीय कवीची नोंद केली आहे.
  • भगवान ठग यांनी वाशीम जिल्ह्यातल्या रिसोड या गावी भरणार्‍या एकलव्य साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/-/articleshow/4024284.cms?. १२ आॅक्टोबर २०१४ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)