"झेंडू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: झेंडू ही एक शोभेची फुले देणारी औषधी वनस्पती आहे. ;सामान्य नावे: म... |
(काही फरक नाही)
|
०१:१८, २७ सप्टेंबर २०१४ ची आवृत्ती
झेंडू ही एक शोभेची फुले देणारी औषधी वनस्पती आहे.
- सामान्य नावे
मराठी -मखमल किंवा झेंडू; इंग्रजी -मेरीगोल्ड; गुजराथी =-गुलहिरो किंवा मखमला; हिंदी -गेंदा, गुतोरा, कालगा, मखमली; संस्कृत स्थूलपुष्प, संदू झंडु; शास्त्रीय नाव -Tagetes erecta.
या फुलझाडाची लागवड भारतभर केली जाते. हे झाड अर्धा ते एक मीटर उंचीचे असते. झेंडूच्या काही जाती मेक्सिकोतून भारतात आल्या आहेत. दर्याच्या दिवशी या फुलांच्या माळा, दरवाज्याला आणि वाहनांना घालण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. नवरात्रामधल्या सातव्या दिवशी देवीला झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात.
औषधी उपयोग :- झेंडूची फुले चवीला तिखट, कडू आणि तुरट असतात. ती अपस्मार आकडीत उपयोगी आहेत. झेंडूची पाने मुळव्याध, मूत्रपिंडाची दुखणी आणि स्नायूंच्या दुखण्यावर गुणकारी आहेत. फुलांचा रस कानदुखी असल्यास कानात टाकतात. पाने केसतूट आणि कानपुळीत लावण्यासाठी वापरतात.