"रेखा कामत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ २८: ओळ २८:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'रेखा' या नावाने परिचित असलेल्या रेखा कामत या एक मराठी अभिनेत्री आहेत. [[राजा परांजपे]] यांच्या 'लाखाची गोष्ट' या चित्रपटाद्वारे त्यांचा चित्रसृष्टीत प्रवेश झाला.
'रेखा' या नावाने परिचित असलेल्या रेखा कामत या एक मराठी अभिनेत्री आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीत एके काळी रेखा आणि चित्रा या दोन अभिनेत्रींचा खूप बोलबाला होता. या दोन सख्ख्या बहिणींमधल्या रेखा म्हणजे आधीच्या कुमुद सुखटणकर, आणि चित्रा म्हणजे कुसुम सुखटणकर. सचिन शंकर यांच्या बॅलेमधून काम करता करता रेखा अभिनय क्षेत्रात आल्या. [[राजा परांजपे]] यांच्या ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटातून नायिका म्हणून त्यांनी रेखा या नावाने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. चित्रपटलेखक [[ग.रा. कामत]] यांच्याशी विवाह केल्यानंतर रेखा यांनी अनेक नाटकांतही भूमिका केल्या. अभिनेत्री म्हणून देखणा, घरंदाज, शालीन आणि प्रेमळ चेहरा लाभलेल्या रेखा आज(२०१४ साली) काही मालिका आणि चित्रपटांतून प्रेमळ आजीच्या भूमिकांत दिसतात.

==बालपण==
रेखा कामत यांचे बालपण दादरच्या प्लाझा चित्रपटगृहाशेजारच्या मिरांडा चाळीत गेले. इयत्ता चौथीपर्यंत भवानी शंकर रोडवरील कुंभारवाडा परिसरातील शाळेत झाले. पाचव्या इयत्तेनंतर इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या छबिलदास शाळेतून त्यांनी मॅट्रिक केले. पुढे एसएनडीटीमधून एफ.वाय. झाल्यावर त्यादरम्यान ग. रा. कामतांशी लग्न ठरलं. परिणामी शिक्षण थांबवावं लागलं.
त्यांच्या चाळीत गणेशोत्सव जल्लोषात साजरा होत असे. त्यावेळी गणेशोत्सवात दहा-पंधरा दिवस चालणारे मेळे असायचे. त्या मेळयांमध्ये छोटया छोटया नाटिका व्हायच्या. त्या नाटिकांमधून रेखा कामत यांना कामे करायला मिळाली. हे मेळे बघायला दादर परिसरातील मान्यवर मंडळींची उपस्थिती असायची. त्यावेळी दादरमधल्या विविध संस्थांचे वार्षिक कार्यक्रम व्हायचे. मिरांडा चाळीतील गणेशोत्सवात होणाऱ्या मेळयांतील कार्यक्रम पाहून त्यांना त्या वार्षिक कार्यक्रमात होणा-या स्नेहसंमेलनात होणा-या सादरीकरणासाठी बोलावले जाऊ लागले. त्यात काम करता करताच रेखाबाईंना नाटकांतून कामे करण्याची आवड निर्माण झाली, तर दुसरीकडे त्यांचा नृत्य आणि गायनाचा सराव सुरू झाला. दादरमधील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या मुलींच्या शाळेत शिकत असताना रेखा यांनी नृत्याचे आणि गायनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. गाण्यासाठी भानुदास मानकामे व घोडकेगुरुजींची शिकवणी लावली. तर नृत्यासाठी त्यांनी गौरी शंकर (कथ्थक) आणि पार्वतीकुमार (भरतनाटयम्) अशा नामवंत गुरूंकडे शिकण्यास सुरुवात केली. नृत्य आणि गायनाची साधना सुरू असताना त्यांनी मेळयांमधून कामे करणे सोडले नाही.

रेखा यांना एके दिवशी सचिन शंकर यांच्या ‘रामलीला’ या प्रसिद्ध नृत्यनाटिकेत काम करण्याची संधी चालून आली. त्यांचे वय त्यावेळी पंधरा-सोळा वर्षे होते. सचिन शंकरच्या बॅलेत काम करण्याची संधी मिळणं, ही भाग्याची गोष्ट समजली जायची. त्यामुळे घरचे लोक, खास करून आई त्यांना तिथे पाठवायला तयार झाली. त्यावेळी सचिन शंकरच्या बॅलेत रेखाबरोबर कुमुदिनी लेलेही होत्या. (पुढे त्या कुमुदिनी शंकर झाल्या.) मैत्रीणच सोबत असल्यामुळे काम करण्यास त्यांना हुरूप येई.. त्या बॅलेत रेखाबाईंना वानर, राक्षस, सैनिक अशी कामेच मिळाली. या बॅलेचे ठिकठिकाणी प्रयोग व्हायचे. सचिन शंकर फक्त बॅलेच बसवायचे नाहीत, तर ‘बॉम्बे टॉकीज’, ‘फिल्मिस्तान’च्या चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन करायचे. त्यावेळी समूहनृत्यासाठी ते रेखाला आवर्जून बोलवायचे. सचिन शंकरच्या बॅलेतून काम करण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांना लखनौपासून लाहोरपर्यंतची हिंदुस्थानातील सगळी प्रमुख शहरे बघायला मिळाली, आणि त्यांची पहिलीवहिली मिळकतही सुरू झाली, नृत्य आणि गायन हे अभिनयाचे एक अंगच असल्याने, त्यातूनच रेखा कामत यांचा अभिनय फुलत गेला.

==रेखा कामत यांचे मराठी चित्रपट==
* कुबेराचं धन
* गृहदेवता
* लाखाची गोष्ट

==नाटके==
* ऋणानुबंध
* संगीत एकच प्याला
* कल्पवृक्ष कन्येसाठी (पहिले नाटक)
* गंध निशिगंधाचा (शेवटचे नाटक)
* गोष्ट जन्मांतरीची
* तरुण तुर्क म्हातारे अर्क
* तुझे आहे तुजपाशी
* दिल्या घरी तू सुखी राहा
* दिवा जळू दे सारी रात
* संगीत पुण्यप्रभाव (भूमिकेचे नाव - किंकिणी)
* प्रेमाच्या गावा जावे
* संगीत भावबंधन
* लग्नाची बेडी
* सुंदर मी होणार
* संगीत सौभद्र





१६:४१, ६ ऑगस्ट २०१४ ची आवृत्ती

रेखा कामत
जन्म रेखा कामत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

'रेखा' या नावाने परिचित असलेल्या रेखा कामत या एक मराठी अभिनेत्री आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीत एके काळी रेखा आणि चित्रा या दोन अभिनेत्रींचा खूप बोलबाला होता. या दोन सख्ख्या बहिणींमधल्या रेखा म्हणजे आधीच्या कुमुद सुखटणकर, आणि चित्रा म्हणजे कुसुम सुखटणकर. सचिन शंकर यांच्या बॅलेमधून काम करता करता रेखा अभिनय क्षेत्रात आल्या. राजा परांजपे यांच्या ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटातून नायिका म्हणून त्यांनी रेखा या नावाने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. चित्रपटलेखक ग.रा. कामत यांच्याशी विवाह केल्यानंतर रेखा यांनी अनेक नाटकांतही भूमिका केल्या. अभिनेत्री म्हणून देखणा, घरंदाज, शालीन आणि प्रेमळ चेहरा लाभलेल्या रेखा आज(२०१४ साली) काही मालिका आणि चित्रपटांतून प्रेमळ आजीच्या भूमिकांत दिसतात.

बालपण

रेखा कामत यांचे बालपण दादरच्या प्लाझा चित्रपटगृहाशेजारच्या मिरांडा चाळीत गेले. इयत्ता चौथीपर्यंत भवानी शंकर रोडवरील कुंभारवाडा परिसरातील शाळेत झाले. पाचव्या इयत्तेनंतर इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या छबिलदास शाळेतून त्यांनी मॅट्रिक केले. पुढे एसएनडीटीमधून एफ.वाय. झाल्यावर त्यादरम्यान ग. रा. कामतांशी लग्न ठरलं. परिणामी शिक्षण थांबवावं लागलं. त्यांच्या चाळीत गणेशोत्सव जल्लोषात साजरा होत असे. त्यावेळी गणेशोत्सवात दहा-पंधरा दिवस चालणारे मेळे असायचे. त्या मेळयांमध्ये छोटया छोटया नाटिका व्हायच्या. त्या नाटिकांमधून रेखा कामत यांना कामे करायला मिळाली. हे मेळे बघायला दादर परिसरातील मान्यवर मंडळींची उपस्थिती असायची. त्यावेळी दादरमधल्या विविध संस्थांचे वार्षिक कार्यक्रम व्हायचे. मिरांडा चाळीतील गणेशोत्सवात होणाऱ्या मेळयांतील कार्यक्रम पाहून त्यांना त्या वार्षिक कार्यक्रमात होणा-या स्नेहसंमेलनात होणा-या सादरीकरणासाठी बोलावले जाऊ लागले. त्यात काम करता करताच रेखाबाईंना नाटकांतून कामे करण्याची आवड निर्माण झाली, तर दुसरीकडे त्यांचा नृत्य आणि गायनाचा सराव सुरू झाला. दादरमधील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या मुलींच्या शाळेत शिकत असताना रेखा यांनी नृत्याचे आणि गायनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. गाण्यासाठी भानुदास मानकामे व घोडकेगुरुजींची शिकवणी लावली. तर नृत्यासाठी त्यांनी गौरी शंकर (कथ्थक) आणि पार्वतीकुमार (भरतनाटयम्) अशा नामवंत गुरूंकडे शिकण्यास सुरुवात केली. नृत्य आणि गायनाची साधना सुरू असताना त्यांनी मेळयांमधून कामे करणे सोडले नाही.

रेखा यांना एके दिवशी सचिन शंकर यांच्या ‘रामलीला’ या प्रसिद्ध नृत्यनाटिकेत काम करण्याची संधी चालून आली. त्यांचे वय त्यावेळी पंधरा-सोळा वर्षे होते. सचिन शंकरच्या बॅलेत काम करण्याची संधी मिळणं, ही भाग्याची गोष्ट समजली जायची. त्यामुळे घरचे लोक, खास करून आई त्यांना तिथे पाठवायला तयार झाली. त्यावेळी सचिन शंकरच्या बॅलेत रेखाबरोबर कुमुदिनी लेलेही होत्या. (पुढे त्या कुमुदिनी शंकर झाल्या.) मैत्रीणच सोबत असल्यामुळे काम करण्यास त्यांना हुरूप येई.. त्या बॅलेत रेखाबाईंना वानर, राक्षस, सैनिक अशी कामेच मिळाली. या बॅलेचे ठिकठिकाणी प्रयोग व्हायचे. सचिन शंकर फक्त बॅलेच बसवायचे नाहीत, तर ‘बॉम्बे टॉकीज’, ‘फिल्मिस्तान’च्या चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन करायचे. त्यावेळी समूहनृत्यासाठी ते रेखाला आवर्जून बोलवायचे. सचिन शंकरच्या बॅलेतून काम करण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांना लखनौपासून लाहोरपर्यंतची हिंदुस्थानातील सगळी प्रमुख शहरे बघायला मिळाली, आणि त्यांची पहिलीवहिली मिळकतही सुरू झाली, नृत्य आणि गायन हे अभिनयाचे एक अंगच असल्याने, त्यातूनच रेखा कामत यांचा अभिनय फुलत गेला.

रेखा कामत यांचे मराठी चित्रपट

  • कुबेराचं धन
  • गृहदेवता
  • लाखाची गोष्ट

नाटके

  • ऋणानुबंध
  • संगीत एकच प्याला
  • कल्पवृक्ष कन्येसाठी (पहिले नाटक)
  • गंध निशिगंधाचा (शेवटचे नाटक)
  • गोष्ट जन्मांतरीची
  • तरुण तुर्क म्हातारे अर्क
  • तुझे आहे तुजपाशी
  • दिल्या घरी तू सुखी राहा
  • दिवा जळू दे सारी रात
  • संगीत पुण्यप्रभाव (भूमिकेचे नाव - किंकिणी)
  • प्रेमाच्या गावा जावे
  • संगीत भावबंधन
  • लग्नाची बेडी
  • सुंदर मी होणार
  • संगीत सौभद्र


पुरस्कार

  • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार - २०१४