Jump to content

"इसाक मुजावर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीचा माहितीकोश समजले जाणारे इसाक मुजाव...
(काही फरक नाही)

०१:१२, २० जुलै २०१४ ची आवृत्ती

हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीचा माहितीकोश समजले जाणारे इसाक मुजावर हे एक मराठी लेखक आहेत. स्वातंत्र्यापूर्वी दोन वर्षे त्यांचा 'तारका' या सिनेसाप्ताहिकात राज कपूरच्या वाल्मीकी या चित्रपटासंदर्भात वाचकांच्या पत्रव्यवहारात पत्रवजा लेख छापून आला. तेव्हापासून ते चित्रपटांवर अखंड लिहीत आहेत. त्यांची २०१४ सालापर्यंत चाळीसेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. विषय सुचला की त्याची व्याप्ती, आखणी, मांडणी, बाज, स्वरूप, शब्दांची निवड व चपखल वापर या भानगडींना मुजावरांच्या लेखनजीवनात स्थान नाही. त्यांच्यापाशी असलेला माहितीचा डोंगर त्यांना स्टार्ट टु फिनिश घेऊन जातो. एकदा विचार डोक्यात आला की लेख किंवा पुस्तकही लिहून झाल्यात जमा असते.

मुजावर यांची रुची लक्षात घेऊन १९५८च्या आसपास त्यांना 'रसरंग' साप्ताहिकाने कार्यकारी संपादकपद दिले. त्यावेळेपासून हा पत्रकार आपली लेखणी घेऊन चौफेर मुशाफिरी करतो आहे. अनेक वृत्तपत्रांत त्यांनी लेखन केले. भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, अनंत माने यांच्यापासून सचिन, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, जब्बार पटेल, चंद्रकांत कुलकर्णी अशा असंख्य माणसांशी त्यांनी मैत्री केली आणि त्या मैत्रीतून उलगडणाऱ्या आठवणी केवळ आपल्यापुरत्या न ठेवता सिनेसृष्टीवर अपार प्रेम करणाऱ्या मराठी वाचकांसाठी त्या आपल्या पुस्तकांमधून खुल्या केल्या.

इसाक मुजावर यांनी लिहिलेली पुस्तके

  • अलबेला मास्टर भगवान
  • आई, माँ, मदर
  • एका सोंगाड्याची बतावणी
  • गुरुदत्त - एक अशांत कलावंत
  • चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ
  • चित्रपटसृष्टीतील काही एकतर्फी प्रेमकहाण्या
  • चित्रमाऊली
  • डॉनच्या फिल्मी बायका
  • तीन पिढ्यांचा आवाज -लता
  • दादासाहेब फाळके
  • नूरजहाँ ते लता
  • पेज थ्री फिल्मी फंडाज
  • प्रभात चित्रे
  • फ्लॅशबॅक
  • मराठी चित्रपटांचा इतिहास
  • मीनाकुमारी
  • मुखवटा
  • मुस्लिम सिनेमा समाज - बुरख्यातला बुरख्याबाहेरचा
  • रफीनामा
  • रुपेरी आठवणी
  • लकी-अनलकी
  • शिवाजी ते नेता - चित्रपटविषयक
  • शेवटची भेट
  • सप्तरंग
  • सिनेमाचा सिनेमा
  • सिनेमाचे तीन साक्षीदार
  • सिनेरंग
  • सिल्व्हर स्क्रीन
  • स्क्रीनप्ले

पुरस्कार

  • मराठी चित्रपट महांडळाचा चित्रभूषण पुरस्कार