"संगीता जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ ४८: | ओळ ४८: | ||
* स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघात गझलांचा विशेष कार्यक्रम सादर केला. |
* स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघात गझलांचा विशेष कार्यक्रम सादर केला. |
||
* पुणे व इतर ठिकाणी स्वत:च्या गझलांचा गझलरंग हा कार्यक्रम सादर. |
* पुणे व इतर ठिकाणी स्वत:च्या गझलांचा गझलरंग हा कार्यक्रम सादर. |
||
* सिंगापूर येथे ३ रे विश्व मराठी साहित्य संमेलन १३ व १४ ऑगस्ट २०११ या काळात पार पडले. त्यात निमंत्रित कवयित्री म्हणून सहभाग. |
|||
==संगीता जोशी यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान== |
==संगीता जोशी यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान== |
१६:२३, १ एप्रिल २०१४ ची आवृत्ती
संगीता जोशी (जन्मदिनांक : ८ मे) या मराठीतील एक गझलकवी आहेत. बी.एस्सी.बी.एड. झालेल्या संगीता जोशी एक निवृत्त शिक्षिका आहेत. त्या मराठीतील बहुधा पहिल्या स्त्री-गझलकार आहेत. त्यांनी लिहिलेल्या गझलांची पाचांहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या काव्यसंग्रहांना कुसुमाग्रज, पु.ल.देशपांडे, सुरेश भट, गं.ना.जोगळेकर यांची प्रशंसा लाभली आहे. संगीता जोशी यांनी अमरावती येथे भरलेल्या तिसऱ्या अखिल भारतीय मराठी गजल संमेलनाचें अध्यक्षपद भूषविले होते.
भीमराव पांचाळे, यशवंत देव, गजानन वाटवे, शरद करमरकर, सुरेश देवळे, केदार परांजपे, केदार पंडित, वगैरे संगीतकारांनी संगीता जोशी यांच्या काही गझलांना संगीत दिले आहे. भीमराव पांचाळे, संजीव अभ्यंकर, यशवंत देव आदी गायक संगीता जोशी यांची गझला गातातही.
यशवंत देव यांनीह्यी काही गझलांना चाली दिल्या आहेत. या गखला ते मैफिलीत सादर करत.
संगीता जोशी यांची काही हिंदी गीते गिरीश अत्रे यांनी संगीत देऊन स्वत: गायली आहेत.
व.पु. काळे यांच्या ‘वपुर्झा’ या पुस्तकाचे शीर्षक त्यांना संगीता जोशी यांनी सुचविले होते. या पुस्तकाचे अर्पणपत्र त्यांच्याच नावे आहे..
संगीता जोशी यांचे काव्यसंग्रह
- चांदणे उन्हातले
- तू भेटशी नव्याने (गझलसंग्रह)
- नजराणा शायरीचा : (गालिब ते आधुनिक उर्दू कवींचे सुमारे एक हजार विविध शेर निवडून त्याचे मराठी अर्थ सांगणारे पुस्तक).
- प्रथमेशा (अष्टविनायक गीते. संजीव अभ्यंकरांनी गायलेल्या आणि केदार पंडित यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीतांची सोनी कंपनीने कॅसेट काढली आहे.)
- म्युझिका
- वेदना संवेदना
- संगीता जोशी यांची गझल (पॉकेट बुक)
संगीता जोशी यांच्या ’आठवणीतली गाणी’ वरील कविता
- आयुष्य तेच आहे (गायक आणि संगीत दिग्दर्शक भीमराव पांचाळे)
- जो काल इथे आला (गायक - श्रीधर फडके आणि संगीत दिग्दर्शक यशवंत देव)
- यायचे होते फुलून (गायक आणि संगीत दिग्दर्शक भीमराव पांचाळे)
संगीता जोशी यांचे गद्य लेखन आणि त्यांची भाषणे
- संगीता जोशी यांनी अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांच्या अल्बममधील हिंदी गीतांचा परिचय करून देणारे काही लेख लिहून दिले आहेत..
- संगीता जोशी यांनी महाराष्ट्र व गोवा या राज्यांत अनेक ठिकाणी गझल लेखनावर कार्यशाळा घेतल्या आहेत.
- गझलेसंबंधी बरेच समीक्षात्मक लेखन व अनेक भाषणे.
- कवि सुरेश भट यांच्या सप्तरंग या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी, त्यांच्या उपस्थितीत त्या संग्रहाचे रसग्रहण करणारे भाषण.
- एका मराठी लेखिकेने उर्दू शेरांचे मराठी शेर केले आहेत. त्या उर्दू-मराठी-मिलाफ या पुस्तकाचे प्रस्तावना-लेखन.
- ई-टीव्ही वरील ’हा खेळ संचिताचा’ या मालिकेसाठी शीर्षक-गीत व इतर गीतांचे लेखन.
- ’एक होता राजा’ या मालिकेसाठीही गीतलेखन.
- ई-टीव्ही च्या ’सखी’ ह्या कार्यक्रमासाठी संहिता लेखन व समन्वयकाचे काम.
- काही पुस्तकांचे व काव्यसंग्रहांचे वॄत्तपत्रांसाठी परीक्षण - लेखन.
- मासिकांतून व दिवाळी अंकांमधून काही कथा व ललितलेखन प्रसिद्ध..
- ’गाइड टु स्टडी सर्कल’ या आध्यात्मिक पुस्तकाचे मराठी भाषांतर.
- शिर्डीचे साईबाबा ह्या मराठी पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर प्रसिद्ध.
- प्रौढ साक्षरांसाठी वीस पुस्तकांचे लेखन, वगैरे वगैरे.
संमेलनांमधील संगीता जोशी यांचा सहभाग
- अमरावतीत भरलेल्या ३ऱ्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाचे अध्यक्षपद.
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील जिल्हास्तरीय कॉलेज विद्यार्थी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
- अनेक कविसंमेलने व उर्दू-मराठी मिश्र मुशायऱ्यांत सहभाग.
- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अनेकदा निमंत्रित कवयित्री म्हणून सहभाग.
- पहिल्या कोथरूड साहित्य संमेलनात कविसंमेलनाचे आयोजन व सूत्रसंचालन.
- मंचर येथील एकदिवसीय साहित्य संमेलनात स्वतःच्या गझल-वाचनाचा स्वतंत्र कार्यक्रम
- बाणेर येथील विभागीय साहित्य संमेलनात निमंत्रित कवयित्री म्हणून सहभाग.
- स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघात गझलांचा विशेष कार्यक्रम सादर केला.
- पुणे व इतर ठिकाणी स्वत:च्या गझलांचा गझलरंग हा कार्यक्रम सादर.
- सिंगापूर येथे ३ रे विश्व मराठी साहित्य संमेलन १३ व १४ ऑगस्ट २०११ या काळात पार पडले. त्यात निमंत्रित कवयित्री म्हणून सहभाग.
संगीता जोशी यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
- पुणे येथील रंगत संगत प्रतिष्ठान या संस्थेचा, प्रतिष्ठेचा मानला गेलेला गझलकाराला देण्यात येणारा भाऊसाहेब पाटणकर पुरस्कार
- अकोला येथून गझल संग्रहास दिला जाणारा शब्दांकुर पुरस्कार ’चांदणे उन्हातले’ या संग्रहास.
- ’शायरी पुण्याची’ या संकलित उर्दू-गझल-संग्रहात संगीता जोशी यांच्या दोन उर्दू गझलांचा समावेश झालेला आहे.
- भारत-पाकिस्तानच्या कवयित्रींचा गुलमोहर’नावाचा उर्दू-गझल संग्रह जबलपूरहून प्रसिद्ध झाला. त्यात संगीता जोशी यांच्या
दोन उर्दू गझलांचा समावेश.
- त्यांच्या अनेक गझला आकाशवाणी आणि दूरदर्शनवर सादर झाल्या आहेत.