"आनंद बालाजी देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Mahitgar ने पुनर्निर्देशन ठेउन लेख आकाशानंद वरुन आनंद बालाजी देशपांडे ला हलविला: शीर्षक लेखन संक... |
|||
ओळ ३५: | ओळ ३५: | ||
* सावल्या देणारे वृक्ष |
* सावल्या देणारे वृक्ष |
||
* सूर्यफुले, वगैरे वगैरे. |
* सूर्यफुले, वगैरे वगैरे. |
||
==आकाशानंद यांना मिळालेले पुरस्कार== |
|||
* गोंदियाभू्षण पुरस्कार |
|||
* महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार |
|||
* सेवाश्री पुरस्कार |
|||
१८:५४, २७ मार्च २०१४ ची आवृत्ती
आकाशानंद ऊर्फ आनंद बालाजी देशपांडे (जन्म : १९३३; मृत्यू : मुंबई १३ मार्च, २०१४) हे मुंबई दूरदर्शन केंद्राचे माजी उपसंचालक होते. इ.स. १९७२ साली मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू होण्याआधी आकाशानंद नागपूर नभोवाणी केंद्रात होते. मूळ कार्यक्रम निर्माते असलेले आकाशानंद, आपल्या १९७२ ते १९९२ पर्यंतच्या सेवाकाळात मुंबई दूरदर्शन केंद्राच्या उपसंचालक पदापर्यंत पोहोचले होते.
मुंबईत आल्यावर आकाशानंद यांनी ’ऐसी अक्षरे’ आणि शालेय चित्रवाणी’ या कार्यक्रमांची निर्मिती केली.त्यानंतर त्यांनी शिक्षण, समाजसेवा आदी क्षेत्रांत काम करणार्या लोकांना व्यासपीठ मिळवून देऊन त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणारा ’ज्ञानदीप’ हा कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली.
मुंबई दूरदर्शनवरचा हा कार्यक्रम इतका लोकप्रिय झाला की, 'ज्ञानदीप' या कार्यक्रमामार्फत ज्ञानाची ज्योत घराघरात पोचली. या कार्यक्रमावर आधारित 'ज्योत एक सेवेची' हे मासिकही आकाशानंद यांनी त्यांनी पंचवीस वर्षे चालवले.
१९९२मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर आकाशानंद यांनी अंधेरीत पहिल्या 'ज्ञानदीप' मंडळाची स्थापना केली. त्याचा विस्तार होऊन राज्यात पंधराशे मंडळे स्थापन झाली. 'ज्ञानदीप' या कार्यक्रमावर अमिता भिडे यांनी पीएचडी मिळवली, पण त्याही आधी १९८८ मध्ये या कार्यक्रमाची दखल घेऊन त्यावर ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या एलिझाबेथ स्मिथ यांनी पंचेचाळीस मिनिटांचा लघुपट केला होता.
लेखन
आकाशानंद यांनी 'माध्यम चित्रवाणी' नावाने ’दूरचित्रवाणी’ या विषयावर पहिले मराठी पुस्तक लिहिले होते. या पुस्तकाला राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा पुरस्कार मिळाला होता. याशिवाय तीनशे गोष्टींची पुस्तके लिहून त्यांनी मराठी बालसाहित्यात मोलाची भर घातली
आकाशानंद यांनी लिहिलेली पुस्तके
- टेक वन् टेक टू
- मर्मबंधातली ठेव ही
- माध्यम आकाशवाणी
- सोहनपुरी
- हिरवी शाई
आकाशानंद यांचे बालसाहित्य
- असे होते गांधीजी
- इथे टिकले श्रीराम
- इंद्रधनू
- ओली माती फिरते चाक
- कर्णफुले
- कल्पना कुमारी
- किस्से परदेशी
- टुकटुक माकड
- दिलदार दरवडेखोर
- पाताळनगरी
- पुत्र व्हावा ऐसा गुंडा
- पुष्पमहाल
- मंगला
- रामटेक
- विजयादशमी
- सावल्या देणारे वृक्ष
- सूर्यफुले, वगैरे वगैरे.
आकाशानंद यांना मिळालेले पुरस्कार
- गोंदियाभू्षण पुरस्कार
- महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार
- सेवाश्री पुरस्कार