Jump to content

"मंदारमाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''संगीत मदारमाला''' हे मराठी नाटककार विद्याधर गोखले यांनी लिहिले...
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
(काही फरक नाही)

१८:१३, २३ मार्च २०१४ ची आवृत्ती

संगीत मदारमाला हे मराठी नाटककार विद्याधर गोखले यांनी लिहिलेले एक मराठी नाटक आहे.

इ.स. १९५५-६० या काळात मरगळलेल्या अवस्थेत असलेली मराठी संगीत रंगभूमी, नाटककार-पत्रकार विद्याधर गोखले यांच्या ‘पंडितराज जगन्नाथ’ आणि ‘सुवर्णतुला’ या दोन लागोपाठ आलेल्या संगीत नाटकांनी पुन्हा जागृत केली. मात्र त्या रंगभूमीला विद्याधर गोखले यांच्या ‘संगीत मंदारमाला’ने खऱ्या अर्थाने नवसंजीवनी दिली. हे नाटक नंतर संगीत नाटक-रंगभूमीवरील एक मैलाचा दगड ठरले..

नाटकाचे कथानक

‘संगीत मंदारमाला’चे कथानक सतराव्या-अठराव्या शतकात राजपुतान्यात घडले, अशी मध्यवर्ती कल्पना आहे. आपल्याकडे जे ज्येष्ठ श्रेष्ठ गायक, बंदिशकार, नायक, विद्वान पंडित होऊन गेले त्यांच्यापैकीच काहींच्या जीवनातील मोजक्या प्रसंगांना विद्याधर गोखले यांनी कल्पनेची जोड देत या नाटकाचे कथानक लिहिले. या नाटकाद्वारे, ‘मंदार’ या कमालीचा स्त्रीद्वेष्टा असलेल्या, जीवनाला विटलेल्या, मात्र सप्तसुरांच्या नादब्रह्मात कायम रमणार्‍या आणि संगीत भक्तीच्याच बळावर मनपरिवर्तन झालेल्या अवलिया वनवासी संगीतकाराचा जीवनप्रवास रसिकांसमोर आला.

मंदारमालाचा पहिला प्रयोग

१९६३च्या गुढीपाडव्याला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ‘भारत नाट्य प्रबोधन संघा’ने हे नाटक रंगभूमीवर आणले. दादर येथील रंगमंदिरात नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग झाला. पहिले शंभर प्रयोग ‘रंगमंदिर’तर्फे झाल्यावर नाट्यनिर्माते राजाराम शिंदे यांच्या ‘नाट्यमंदार’ने हे नाटक चालवायला घेतले आणि ४०० प्रयोगांचा पल्ला कधी ओलांडला हे रसिकांनाही समजले नाही. संपूर्ण देशभर प्रयोग झाले. अडीच-अडीच महिने सलग दौरे होत. कधीकधी नाटकाचे दिवसाला तीन-तीन प्रयोग होत. या नाटकाचे असे एकूण १२००हून अधिक हाऊसफुल्ल प्रयोग झाले.

२३ मार्च २०१४ रोजी या नाटकाच्या निर्मितीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ठाण्यातील नादब्रह्म ही नाट्यसंस्था व रोटरी क्लब यांनी एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.

नंतरची नाटके

‘मंदारमाला’नंतर पुढील पंचवीस वर्षांत म्हणजे १९८५ पर्यंत मत्स्यगंधा, ययाती आणि देवयानी, कट्यार काळजात घुसली, मेघमल्हार, जय जय गौरीशंकर अशी तोडीस तोड एकूण ५५ संगीत नाटके रंगमंचावर आली. आणि’मंदारमाला’चे प्रयोग होणे जवळपास थांबले.

मंदारमालातील गीते

या नाटकाद्वारे विद्याधर गोखले यांनी मोठ्या आणि आळवून आळवून म्हणावयाच्या नाट्यपदांच्या परंपरेला छेद दिला. लागोपाठ पदे येणार नाहीत अशी नाटकाची सुरेख मांडणी त्यांनी केली.चटपटीत संवादांदरम्यान ही रसाळ पदे गुंफली होती. पंडित राम मराठे आणि प्रसाद सावकार यांच्यातील ‘बसंत की बहार आयी’ ही अजरामर जुगलबंदी ऐकण्याला प्रेक्षक उत्सुक असत. त्यासाठी नाटक साडेचार तास चालले तरी ते चुळबूळ करीत नसत.

‘संगीत मंदारमाला’चं कथानक सतराव्या-अठराव्या शतकात राजपुतान्यातील असल्याचे गृहीत धरण्यात आलं आहे. आपल्याकडे जे ज्येष्ठ श्रेष्ठ गायक, बंदीशकार, नायक, विद्वान पंडित होऊन गेले त्यांच्यापैकीच काहींच्या जीवनातील मोजक्या प्रसंगांना विद्याधर गोखले कल्पनेची अफलातून जोड दिली आणि ‘मंदार’ या कमालीचा स्त्रीद्वेष असलेल्या, जीवनाला विटलेल्या, मात्र सप्तसुरांच्या नादब्रह्मात कायम रमणार्‍या आणि संगीत भक्तीच्याच बळावर मनपरिवर्तन झालेल्या अवलिया वनवासी संगीतकाराचा जीवनप्रवास ‘संगीत मंदारमाला’च्या रूपानं रसिकांसमोर आला अन् इतिहास बनून गेला.

‘सोहम हर डमरू बाजे’ ही या नाटकातील तोडी रागावर आधारित बंदिश आजही लोकप्रिय आहे. नाटकातील इतर पदांमध्येही पं. राम मराठे यांनी अनेक राग-रागिण्यांचा वापर केला. ज्योतकंस, अहिरभैरव, गौडमल्हार, बसंत बहार, बैरागी भैरव, तोडी, मालकंस, बिहाग, हिंडोल, भैरवी असे अनेक राग रामभाऊंनी चपखलपणे वापरले. ‘बसंत की बहार आयी’ या जुगलबंदीतील ‘चक्रधार’ हा तर त्यांच्या सांगीतिक गणिताचा उत्तम नमुना होता.

मंदारमालातील गाजलेली पदे

  • बसंत की बहार आयी
  • सोऽहम डमरू वाजे

(अपूर्ण)