Jump to content

"मुकुंद श्रीनिवास कानडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. २०१२ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
ओळ २२: ओळ २२:
* मराठी रंगभूमीची ५० वर्षे
* मराठी रंगभूमीची ५० वर्षे
* मराठी शब्दसमीक्षा
* मराठी शब्दसमीक्षा
* श्रीसमर्थ रामदास वाङ्मय : शब्दार्थ संदर्भ कोश
* श्रीसमर्थ रामदास वाङ्मय : शब्दार्थ संदर्भ कोश (समर्थाच्या दासबोधेतर वाङ्मयाचा सर्वसंग्राह्य शब्दकोश. पृष्ठसंख्या ४९६, प्रकाशक - रामकृष्ण प्रकाशन)
* संत चोखामेळा - अभंगवाणी
* संत चोखामेळा - अभंगवाणी
* संत नामदेव काव्यदर्शन
* संत नामदेव काव्यदर्शन

१९:५३, २ मार्च २०१४ ची आवृत्ती

डॉ. मुकुंद श्रीनिवास कानडे (३ डिसेंबर, इ.स. १९३१ - २५ जून, इ.स. २०१२) हे मराठीतले एक लेखक, समीक्षक व संत साहित्याचे अभ्यासक होते.

जीवन

पदव्युत्तर शिक्षणानंतर लगेच ते मराठीचे प्राध्यापक म्हणून काम करू लागले. दासबोधाचा भाषाशास्त्रीय अभ्यास या विषयावर त्यांनी डॉक्टरेट मिळवली. संत साहित्य आणि अर्वाचीन साहित्यावरील कानड्यांचे अभ्यासपूर्ण लेखन विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. नाटक आणि नाट्यसमीक्षा या विषयावर लेखन व अनेक ग्रंथांचे संपादनही कानडे यांनी केले. इ.स.१९७६ ते १९९१ या काळात ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात अध्यापन करत होते. तेथूनच विभागप्रमुख म्हणून ते ३१ डिसेंबर १९९१ला निवृत्त झाले. विद्यापीठात मु.श्री.कानडे हे संत ज्ञानदेव अध्यासन चालवीत. या अध्यासनासाठी त्यांनी खूप काम केले. अध्यासन मोठे करण्यात त्यांचा मोठा हातभार होता.

मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे ते माजी सदस्य होते. त्यानी विश्वकोशातील काही लेखांचे लेखन केले आहे.

मु.श्री.कानडे निवृत्त झाल्यावर त्यांच्या गौरवार्थ दोन ग्रंथ प्रकाशित करण्याचे ठरले. त्यासाठी ’डॉ.मु.श्री.कानडे मित्रमंडळ’ स्थापन करण्यात आले. या मंडळात डॉ.कल्याण काळे, डॉ.गं.ना.जोगळेकर, डॉ.दत्तात्रय पुंडे, डॉ.प्र.ज.जोशी, मीरा धांडगे, डॉ.र.रा.गोसावी, रा.शं.नगरकर, डॉ.श्रीपाल सबनीस, डॉ.सु.रा.चुनेकर आणि डॉ.स्नेहल तावरे आदी विद्वान मंडळी होती. मंडळाने ’आजचे नाटककार’ हा ग्रंथ प्रकाशित केलाच, शिवाय डॉ.मु.श्री.कानडे यांच्या सत्काराच्या निमित्ताने ’संतसाहित्य अभ्यासाच्या काही दिशा’ या विषयावर झालेल्या चर्चासत्राचे पुस्तकही प्रकाशित करण्यात आले.

प्रकाशित साहित्य

  • एकनाथी भागवत : शब्दार्थ संदर्भ कोश
  • काही संत : काही शाहीर
  • कालचे नाटककार (इ.स. १९६७)
  • गाभारा
  • नाट्यशोध (नाट्य समीक्षा)
  • प्रयोगक्षम मराठी नाटके
  • भाऊसाहेबांची बखर
  • भारत इतिहास संशोधक मंडळाने शके १८३२ ते १९०२ या काळात प्रसिद्ध केलेल्या लेखांची सूची
  • मराठीचा भाषिक अभ्यास
  • मराठी रंगभूमीचा उष:काल
  • मराठी रंगभूमीची १२५ वर्षे(प्रकाशन तारीख २३-४-२०१०)
  • मराठी रंगभूमीची ५० वर्षे
  • मराठी शब्दसमीक्षा
  • श्रीसमर्थ रामदास वाङ्मय : शब्दार्थ संदर्भ कोश (समर्थाच्या दासबोधेतर वाङ्मयाचा सर्वसंग्राह्य शब्दकोश. पृष्ठसंख्या ४९६, प्रकाशक - रामकृष्ण प्रकाशन)
  • संत चोखामेळा - अभंगवाणी
  • संत नामदेव काव्यदर्शन
  • संत नामदेवांचा सार्थ चिकित्सक गाथा
  • संत साहित्य : संदर्भ कोश खंड १
  • संतांची हे भेटी
  • संतांच्या अंतरंगाचा शोध

पुरस्कार व गौरव

  • प्र.न.जोशी यांच्या नावाने दिला जाणारा साहित्यसेवेसाठीचा ’संतमित्र ग्रंथश्रेष्ठता’ हा पुरस्कार
  • ’मराठीचा भाषिक अभ्यास’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला.
  • मु.श्री.कानडे यांच्या गौरवार्थ ’आजचे नाटककार’ व ’संतसाहित्य अभ्यासाच्या काही दिशा’ हे ग्रंथ प्रकाशित करण्यात आले.
  • संत विद्या प्रबोधिनी, गोरटे(नांदेड जिल्हा) या संस्थेतर्फे संतकवी श्रीदासगणू महाराज पुरस्कार
  • ’संत साहित्य, संदर्भ कोश’ या ग्रंथाला दोन पुरस्कार मिळाले.
  • ’संताची हे भेटी’ या पुस्तकाला दोन पुरस्कार मिळाले.