Jump to content

"दिनकरराव गोविंदराव पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: दिनकरराव गोविंदराव पवार ऊर्फ अप्पासाहेब पवार (जन्म: १९३०; मृत्यू...
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(काही फरक नाही)

२३:५१, ३ जानेवारी २०१४ ची आवृत्ती

दिनकरराव गोविंदराव पवार ऊर्फ अप्पासाहेब पवार (जन्म: १९३०; मृत्यू : १६ एप्रिल, २०००) हे एक कृषितज्ज्ञ होते. ते बी.एस्‌सी. होते. महाराष्ट्राचे राजकारणी नेते शरद पवार यांचे ते वडील बंधू होते. ते एक प्रायोगिक शेतकरी होते. शेतीचे खास ज्ञान मिळविण्यासाठी ते विद्यार्थी असतानाच इस्रायलला गेले होते.

अप्पासाहेब पवारांनी आपले ज्ञान ज्या रीतीने प्रत्यक्ष शेतीत वापरले , निरनिराळे प्रयोग यशस्वी केले ते थक्क करणारे होते. त्यामुळे बारामती परिसराचा चेहरामोहराच पालटून गेला. इस्रायलसारख्या छोट्या देशाने शेतीत मारलेला पल्ला अप्पासाहेबांनी प्रत्यक्ष पाहिला आणि हे आपल्या भूमीत का होऊ शकणार नाही, अशा जिद्दीने कामाला जुंपून घेतले.

बारामतीचे कृषी-विकास प्रतिष्ठान म्हणजे अप्पासाहेबांची सृजनशील अशी प्रयोगशाळाच होती. तेथे प्रत्येक धडपडणाऱ्या, नवीन विचार करणाऱ्या शेतकऱ्यायाचे स्वागत होते. आता शेतीत सर्रास वापरले जाणारे ठिबक सिंचन तंत्रज्ञान अप्पासाहेबांनी बारामतीत कित्येक वर्षांपूर्वीच यशस्वी केले.

नारळाचे देशावर फारसे उत्पन्न न देणारे फळझाड बारामतीत रुजविले, त्यासाठी आपल्या सार्वजनिक जीवनात धडपडणाऱ्या धाकट्या भावाला-शरद पवार यांना, कोकणात पाठविले. तेथून मासळीच्या खताचा वापर आणि इतर गोष्टी आत्मसात करायला लावल्या. हा धाकटा भाऊ पुढे खूप मोठा झाला तरी अप्पासाहेबांच्या कर्तृत्वाचा आधार आणि सावली त्याच्या मागे उभी असे.

अपार कष्ट करून अप्पासाहेबांनी बारामतीच्या दुष्काळी भागात छोट्या बंधाऱ्यांनी क्रांती केली. तालुक्यातील गो-पालन, कुक्कुटपालन , फळबागा या साऱ्यांचा नजरेत भरणारा विकास हे अप्पासाहेबांच्या दूरदृष्टीचे फळ होते.

अप्पासाहेब पवार सामाजिक कामातही रस घेत असत. शेतमजुरांच्या समस्या सोडविण्यास ते झटत. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी अनेक संस्था उभारल्या. समाजात मुलींना शिक्षणाच्या आणि विकासाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी १९८९-९० मध्ये मातोश्री शारदाबाई यांच्या नावे शारदानगरमध्ये स्वतंत्र संकुल उभारण्यात आले. त्यात कनिष्ट तसेच वरिष्ठ महाविद्यालय, व्यायामशाळा, शारीरिक शिक्षण, शिक्षणशास्त्र यांची महाविद्यालये, परिचारिका प्रशिक्षण केंद्र वगैरेंचा समावेश आहे.

अप्पासाहेब पवार यांनी लिहिलेली पुस्तके

  • पाणी - २१ व्या शतकातील संघर्षाची ठिणगी

चरित्र

  • शिवाजी ठोंबरे यांनी ’कृषीभगीरथ अप्पासाहेब पवार’ या नावाचे चरित्र लिहिले आहे.

पुरस्कार आणि सन्मान

  • महाराष्ट्र सरकारचा कृषिभूषण पुरस्कार (१९८८)
  • पद्मश्री पुरस्कार (१९९०)
  • महात्मा फुले विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद उपाधी (१९९२)
  • पुणे विद्यापीठाची डी.लिट. ही मानद उपाधी (१९९३)
  • डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या नावाने ’आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार’ देण्यात येतो.