"गुरुचरित्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
||
ओळ १५: | ओळ १५: | ||
==गुरुचरित्राच्या हस्तलिखित आवृत्त्या== |
==गुरुचरित्राच्या हस्तलिखित आवृत्त्या== |
||
हस्तलिखितांचे अभ्यासक वा.ल. मंजुळ यांच्या सांगण्यानुसार गुरुचरित्राची सर्वात जुनी हस्तलिखित प्रत इ.स. १६९५ची आहे. या प्रतीत ५१ अध्याय आहेत. आतापर्यंत विविध संस्थांमधून गुरुचरित्राची १०० हस्तलिखिते जमा करण्यात आली आहेत. त्यांतील ३२ हस्तलिखिते मराठी हस्तलिखित केंद्रांत आहेत, तर भारत इतिहास संशोधक मंडळात १५ हस्तलिखिते आहेत. |
हस्तलिखितांचे अभ्यासक वा.ल. मंजुळ यांच्या सांगण्यानुसार गुरुचरित्राची सर्वात जुनी हस्तलिखित प्रत इ.स. १६९५ची आहे. या प्रतीत ५१ अध्याय आहेत. आतापर्यंत विविध संस्थांमधून गुरुचरित्राची १०० हस्तलिखिते जमा करण्यात आली आहेत. त्यांतील ३२ हस्तलिखिते मराठी हस्तलिखित केंद्रांत आहेत, तर भारत इतिहास संशोधक मंडळात १५ हस्तलिखिते आहेत. भांडारकर इन्स्टिट्यूट, वैदिक संशोधन मंडळ, डेक्कन कॉलेज व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ या संस्थांमध्ये सुमारे ५० हस्तलिखिते आहेत. त्यांमध्ये ५२ अध्यायी, एक्कावन्न श्लोकी, लघुसंहिता, गुरुचरित्र सार आणि संस्कृत रूपांतर अशा हस्तलिखितांचा समावेश आहे. |
||
वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत सरदार किबे यांच्या संग्रहातील इ.स. १८६२मधील सचित्र हस्तलिखित आहे. त्यामध्ये दत्ताचे एक दुर्र्मीळ रंगीत चित्र आहे. मात्र या चित्रात दत्ताच्या मागे गाय काढलेली नाही. |
|||
२१:४१, १७ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
श्री गुरुचरित्र हा श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीनृसिंहसरस्वती यांच्याबद्दलचा चरित्रग्रंथ आहे गुरुचरित्राची मूळ संस्कृत रचना त्यांचे शिष्य सिद्ध यांची असावी असा रा.चिं. ढेरे यांचा कयास आहे. मूळ संस्कृत ग्रंथ आता उपलब्ध नाही. सध्या उपलब्ध असलेल्या गुरुचरित्राची मराठी भाषेतील काव्यरचना सरस्वती गंगाधर यांनी इ. सन १५३५ मध्ये केली असावी. त्यावेळी ती रचना करण्यास मूळ संस्कृत ग्रंथाचा आधार उपलब्ध असण्याची शक्यता असू शकते असा संशोधक ढेरे यांचा कयास आहे. सरस्वती गंगाधर यांच्या ग्रंथात हा एकूणच दत्त संप्रदायाच्या कथा सांगणारा आहे.
सरस्वती गंगाधर हे श्रीनृसिंहसरस्वतींचे एक शिष्य सायंदेव यांच्या पाचव्या पिढीतील होते. नृसिंहसरस्वतींच्या सात प्रमुख शिष्यांमध्ये सायंदेव यांचा समावेश होतो. सायंदेव -> नागनाथ ->देवराव -> गंगाधर -> सरस्वती गंगाधर अशी वंशावळ गुरुचरित्र देते. सरस्वती गंगाधरांना चरित्र लिहिण्याचा आदेश स्वतः श्रीनृसिंहसरस्वतींनीच दिला अशी माहिती श्रीगुरुचरित्रात दिली असून परंपरेनेही तशी श्रद्धा दत्त संप्रदायात आहे. पुढे या मराठी पद्यरूपात असलेल्या श्रीगुरुचरित्राचे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामी यांनी संस्कृतमध्ये जवळजवळ समश्लोकी भाषांतर केले. हे संस्कृत गुरुचरित्र बहुशः अनुष्टुभ छंदात रचले आहे. गुरुचरित्रास दत्तसंप्रदायाचा उपासना ग्रंथ मानतात.
मराठी गुरुचरित्रात अनेक पाठभेद आहेत. अशा अनेक पाठांच्या प्रतींचा तौलनिक अभ्यास करून गुरुचरित्राची एक प्रमाणित प्रत विसाव्या शतकात श्री. रामचंद्र कृष्ण कामत यांनी सिद्ध केली. कामत यांच्या प्रतीवर सायंदेव प्रतीचा गाढ ठसा दिसून येतो. कामत यांची प्रमाणित प्रत आणि वासुदेवानंद सरस्वती यांच्या परंपरेतले श्री वामनराव गुळवणी यांच्या वापरात असलेली चित्रशाळा प्रत या गुरुचरित्राच्या पाठासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वाधिक लोकप्रिय प्रती आहेत.
गुरुचरित्र या ग्रंथात एकूण ५२ अध्याय असून त्यात ७४९१ ओव्या आहेत. मंगलाचरण, दत्तावतार चरित्र, श्रीपादश्रीवल्लभ चरित्र, नरसिंह सरस्वतींचे चरित्र आणि अवतरणिका असे विषय या ग्रंथामध्ये आहेत.
मूळ गुरुचरित्र ५१ अध्यायांचे होते. आणि अवतरणिका हा अध्याय नंतर जोडला गेला असे काही अभ्यासकांचे मत आहे. गुरुभक्ती आणि गुरुप्रसाद हे या ग्रंथाचे प्रमुख विषय आहेत. सरस्वती गंगाधर यांची मातृभाषा कानडी होती. त्यामुळे कानडी भाषेतील काही लकबी त्यात आढळतात. गुरुचरित्राचे विशेष म्हणजे वेदान्त आणि क्रियाशून्य भक्तीला येथे स्थान नाही. नृसिंह सरस्वती या व्यक्तीपेक्षा गुरू या पदाला आणि गुरु-शिष्य या नात्याला गुरुचरित्रात महत्त्व दिलेले आढळते.
गद्य गुरुचरित्र
अनेक जणांनी पद्यमय गुरुचरित्राचे गद्यात रूपांतर केले आहे. त्यांपैकी एक म्हणजे बाळ वामनभाई पंचभाई. यांनी लिहिलेल्या ’श्री गुरुचरित्र - जसे आहे तसे’ या पुस्तकात गुरुचरित्राच्या ५२ही अध्यायांतील कथासार साध्या सोप्या मराठीत शब्दबद्ध केले आहे.
गुरुचरित्राच्या हस्तलिखित आवृत्त्या
हस्तलिखितांचे अभ्यासक वा.ल. मंजुळ यांच्या सांगण्यानुसार गुरुचरित्राची सर्वात जुनी हस्तलिखित प्रत इ.स. १६९५ची आहे. या प्रतीत ५१ अध्याय आहेत. आतापर्यंत विविध संस्थांमधून गुरुचरित्राची १०० हस्तलिखिते जमा करण्यात आली आहेत. त्यांतील ३२ हस्तलिखिते मराठी हस्तलिखित केंद्रांत आहेत, तर भारत इतिहास संशोधक मंडळात १५ हस्तलिखिते आहेत. भांडारकर इन्स्टिट्यूट, वैदिक संशोधन मंडळ, डेक्कन कॉलेज व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ या संस्थांमध्ये सुमारे ५० हस्तलिखिते आहेत. त्यांमध्ये ५२ अध्यायी, एक्कावन्न श्लोकी, लघुसंहिता, गुरुचरित्र सार आणि संस्कृत रूपांतर अशा हस्तलिखितांचा समावेश आहे.
वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत सरदार किबे यांच्या संग्रहातील इ.स. १८६२मधील सचित्र हस्तलिखित आहे. त्यामध्ये दत्ताचे एक दुर्र्मीळ रंगीत चित्र आहे. मात्र या चित्रात दत्ताच्या मागे गाय काढलेली नाही.
हे सुद्धा पहा
- दत्तात्रेय
- श्रीगुरुचरित्र-बावन्नावा अध्याय
- श्री गुरुचरित्र - जसे आहे तसे (मराठी गद्य. अनुवादक : बाळ वामनभाई पंचभाई)