Jump to content

"विनायक रा. करंदीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १०: ओळ १०:
* ’जगावे का आणि कशासाठी..’
* ’जगावे का आणि कशासाठी..’
* ’तीन सरसंघचालक’
* ’तीन सरसंघचालक’
* ’नर्मदे हर!([[नर्मदा परिक्रमा|नर्मदा परिक्रमेचा]] अनुभवसिद्ध वृत्तान्त” या रघुनाथ रामचंद्र गुण्ये लिखित पुस्तकाची प्रस्तावना
* ’भगवद्‌गीतेचे तीन टीकाकार’
* ’भगवद्‌गीतेचे तीन टीकाकार’
* ’रघुनाथ पांडुरंग ऊर्फ दादासाहेब करंदीकर यांची दैनंदिनी’
* ’रघुनाथ पांडुरंग ऊर्फ दादासाहेब करंदीकर यांची दैनंदिनी’

१४:४६, २९ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

डॉ. विनायक रा. करंदीकर (जन्म : २७ ऑगस्ट १९१९ मृत्यू : १५ एप्रिल २०१३) हे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजात प्राध्यापक होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते सचिव होते. त्यांचा संतसाहित्य, रामकृष्ण परमहंस, आणि स्वामी विवेकानंद यांचा विशेष अभ्यास होता. डॉ. करंदीकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाशी संलग्न विविध संस्थांमध्येही काम केले. रामकृष्ण मठाशी त्यांचा निकटचा संबंध होता. दैनिक ’तरुण भारत' प्रकाशित करणाऱ्या राष्ट्रीय विचार प्रसारक मंडळाचे ते दहा वर्षे अध्यक्ष होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते पदाधिकारी होते. मराठी ज्ञानकोशाच्या संपादनाचे कामही डॉ. करंदीकरांनी केले आहे. डॉ. करंदीकर यांच्या अनेक ग्रंथांचे हिंदी, इंग्रजी, कन्नडसह अन्य भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या ’इंडियन मास्टरपीस' या संपादित ग्रंथात ज्ञानदेव-तुकारामांवर करंदीकरांनी लिहिलेल्या इंग्रजी लेखांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.


प्रकाशित साहित्य

  • 'कुणा यात्रिकाचा जीवनसंवाद' (आत्मचरित्र)
  • ’ख्रिस्त, बुद्ध आणि श्रीकृष्ण’
  • ’गोपवेणू' (कवितासंग्रह)
  • ’ग्रंथशोध’
  • ’जगावे का आणि कशासाठी..’
  • ’तीन सरसंघचालक’
  • ’नर्मदे हर!(नर्मदा परिक्रमेचा अनुभवसिद्ध वृत्तान्त” या रघुनाथ रामचंद्र गुण्ये लिखित पुस्तकाची प्रस्तावना
  • ’भगवद्‌गीतेचे तीन टीकाकार’
  • ’रघुनाथ पांडुरंग ऊर्फ दादासाहेब करंदीकर यांची दैनंदिनी’
  • रामकृष्ण आणि विवेकानंद
  • 'रामकृष्ण, विवेकानंद आणि गुरुबंधू'
  •  वामन पंडितांची 'यथार्थदीपिका'
  • ’विचारविश्वातील भ्रमंती’
  • ’विदेश संचार आणि मुक्त चिंतन’
  • ’विश्वमानव स्वामी विवेकानंद’
  • ’वेध ऋणानुबंधाचा’
  • ’सांस्कृतिक संचित’
  • ’साक्षेप समर्थांचा’
  • ’स्वामी विवेकानंद जीवनदर्शन’ (विवेकानंदांचे त्रिखंडात्मक चरित्र)
  • 'ज्ञानदेवांचा गीतासंवाद'
  • 'ज्ञानदेवांचा आत्मसंवाद'
  • ' ज्ञानेश्वरी दर्शन '
  • ’Three Architects Of R.S.S' (इंग्रजी)

इतर

संदर्भ

  • महाराष्ट्र टाइम्स, २० एप्रिल २०१३
  • भाषा आणि जीवन, अंक : उन्हाळा २०१३