"नवापुरा पेठ (पुणे)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: पुणे शहर हे पेशव्यांच्या राजधानीचे शहर झाल्यानंतर शहराची वस्ती ... |
(काही फरक नाही)
|
२३:१८, १९ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती
पुणे शहर हे पेशव्यांच्या राजधानीचे शहर झाल्यानंतर शहराची वस्ती वाढू लागली. अशा काळात शेटे, महाजन आणि व्यापारी-व्यावसायिक मंडळी शहरात एखादी पेठ स्थापन करण्याची परवानगी मागत. सरकारकडून कौल मिळाला की, ती पेठ वसवली जाई. भवानी पेठेच्या पूर्वेला नवापुरा नावाची पेठ वसवण्याची परवानगी इ.स. १७८८च्या सुमारास जीवन घाशीराम यांनी पेशवेसरकारांकडे मागितली. परंतु, परवानगी मिळूनही ही पेठ वसू शकली नाही. पुढे नऊ वर्षांनी माधवराव रामचंद्र यांनी ती पेठ वसवण्याची जबाबाबदारी स्वीकारली. दुर्दैवाने त्यांनाही या बाबतीत यश मिळाले नाही, आणि पुण्यातील नवापुरा नामक पेठ वसता वसता वसायची राहून गेली. अंती ती जागा त्या काळात उजाडच राहिली.