Jump to content

नवापुरा पेठ (पुणे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नवापुरा पेठ ही पुण्यातील प्रस्तावित पेठ होती.

पुणे शहर हे पेशव्यांच्या राजधानीचे शहर झाल्यानंतर शहराची वस्ती वाढू लागली. अशा काळात शेटे, महाजन आणि व्यापारी-व्यावसायिक मंडळी शहरात एखादी पेठ स्थापन करण्याची परवानगी मागत. सरकारकडून कौल मिळाला की, ती पेठ वसवली जाई. भवानी पेठेच्या पूर्वेला नवापुरा नावाची पेठ वसवण्याची परवानगी इ.स. १७८८ च्या सुमारास जीवन घाशीराम यांनी पेशवेसरकारांकडे मागितली. परंतु, परवानगी मिळूनही ही पेठ वसू शकली नाही. पुढे नऊ वर्षांनी माधवराव रामचंद्र यांनी ती पेठ वसवण्याची जबाबाबदारी स्वीकारली. दुर्दैवाने त्यांनाही या बाबतीत यश मिळाले नाही, आणि पुण्यातील नवापुरा नामक पेठ वसता वसता वसायची राहून गेली. अंती ती जागा त्या काळात उजाडच राहिली.