Jump to content

"रु आणि रू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मराठीत दोन रु आहेत हेच अनेकांना माहीत नसते, किंवा असले तरी कोणता ...
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(काही फरक नाही)

१५:१५, २७ जुलै २०१३ ची आवृत्ती

मराठीत दोन रु आहेत हेच अनेकांना माहीत नसते, किंवा असले तरी कोणता रु कधी वापरायचा हे माहीत नसते.

’र’ हे अक्षर अत्यंत सडपातळ आहे, त्यामुळे त्याच्यावरची शिरोरेषाही अतिशय आखुड असते. त्यामुळ नेहमीच्या पद्धतीने(ु आणि ू)उकार लावताना, शिरोरेषा लांबवावी लागते. त्यासाठी देवनागरीच्या निर्मात्यांनी ’र’च्या बेचक्यात उकार लावायची पद्धत सुरू केली असली पाहिजे. दोन उकारांपैकी ऱ्हस्व उकार म्हणजे एक छोटी खालच्या दिशेला वळलेली आकडी (हूक), आणि दीर्घ म्हणजे ’र’पासून दूर जाणा्रे दीर्घ उकाराचे चिन्ह. मराठीच्या काही फॉन्ट्‌समध्ये हे दीर्घ उकाराचे चिन्हही ’र’पासून दूर न जाता खाली वळते. त्यामुळे तोही उकार ऱ्हस्व असल्याचा गैरसमज होतो. असे रू वर्तमानपत्रांमधून सतत वाचनात आल्याने रु-रूंमधील भेद लक्षात येत नाही. शक्यतो असे फॉन्ट्‌स वापरणे टाळावे.

रु असलेले शब्द

संस्कृत शब्द

हे शब्द मराठीतही असेच लिहिले जातात. ’अकारान्त शब्दांतील उपान्त्य अक्षर दीर्घ’हा नियम या शब्दांना लागू नाही.

रुचे शब्द

अरुण, करुण(करुणामय, कारुण्य), गरुड, तरुण(तरुणी, तारुण्य), तुरुंग, दारुण, पुरुष(पुरुषत्व, पुरुषसूक्त, पौरुष), रुपे(रुपया-दोन्ही शब्द मराठी), वरुण, वारुणी, सुरुंग,

रूचे शब्द

आरूढ, ऊरू, रूप(कुरूप, रूपवान, रूपवती, सुरूप, स्वरूप, सुस्वरूप),

संस्कृतमध्ये ऱ्हस्व ’रु, पण मराठीत दीर्घ

गुरू (पण गुरुकृपा, गुरुवर्य, गुरुभक्ती), तरू (पण तरुवर), मेरू (पण मेरुदंड),


मराठीशब्द

मराठी अकारान्त शब्दांतल्या उपान्त्य अक्षराचा इकार-उकार दीर्घ असतो, म्हणून --

आवरून, उरून, करून, करवून, घरून, चोरून, जागरूक (जागरूकता), धरून, पुरून, भरून, भारून, मारून, सवरून, स्मरून वगैरे पूर्वकालवाचक आणि अन्य शब्दांतला रू दीर्घ.

मराठीत अन्त्य अक्षराचा इकार-उकार नेहमीच दीर्घ म्हणून,

इच्छाधरू, गबरू, जोरू, तरु (पण तरुवर), तारू, दारू (पण दारुड्या), दारूगोळा, दारूबंदी, नारू, पेरू, बोरू, भैरू, मेरू (पण मेरुदंड), सुरू (पण सुरुवात), होतकरू,

ध्वन्यर्थक शब्द असल्याने दीर्घान्त लिहिले नाहीत तरी चालते असे शब्द

चुरुचुरु, तुरुतुरु,


(अपूर्ण)