Jump to content

रु आणि रू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठीत दोन रु आहेत हेच अनेकांना माहीत नसते, किंवा असले तरी कोणता रु कधी वापरायचा हे माहीत नसते.

‘र’ हे अक्षर अत्यंत सडपातळ आहे, त्यामुळे त्याच्यावरची शिरोरेषाही अतिशय आखूड असते. त्यामुळे नेहमीच्या पद्धतीने (ु आणि ू) उकार लावताना, शिरोरेषा अकारण लांबवावी लागते. तसे लागू नये त्यासाठी देवनागरीच्या निर्मात्यांनी ‘र’च्या बेचक्यात उकार लावायची पद्धत सुरू केली असली पाहिजे. दोन उकारांपैकी ऱ्हस्व उकार (रु) म्हणजे 'र'च्या बेचक्यात काढलेली एक छोटी खालच्या दिशेला वळलेली आकडी (हूक), आणि दीर्घ उकार (रू) म्हणजे ‘र’ पासून दूर जाणारे दीर्घ उकाराचे चिन्ह. मराठीच्या काही फॉन्ट्‌समध्ये हे दीर्घ उकाराचे चिन्हही ‘र’ पासून दूर न जाता खाली वळते. त्यामुळे तोही उकार ऱ्हस्व असल्याचा गैरसमज होतो. असे रू वर्तमानपत्रांमधून सतत वाचनात आल्याने रु-रूंमधील भेद लक्षात येत नाही. असे फॉन्ट्‌स वापरणे टाळणे उत्तम.

ऱ्हस्व रु असलेले संस्कृत शब्द

[संपादन]

हे शब्द मराठीतही असेच लिहिले जातात. ’अकारान्त शब्दांतील उपान्त्य अक्षर दीर्घ’हा नियम या शब्दांना लागू नाही.

ऱ्हस्व 'रु'चे शब्द

अरुण (अरुणोदय), करुण (करुणामय, कारुण्य), क्रुद्ध, गरुड, तरुण (तरुणी, तारुण्य), दारुण, ध्रुव (धृव नाही!), ध्रुवपद, ध्रुवीकरण, पुरुष (पुरुषत्व, पुरुषसूक्त, पौरुष), मारुति(मराठीत मारुती), रुग्ण, रुग्णालय, -मराठीत रुची (अरुची, रुचकर, वररुची, सुरुची), रुद्ध (अनिरुद्ध, विरुद्ध), वरुण, वारुणी,

ऱ्हस्व रु असलेले मराठी शब्द

[संपादन]

रुपे(रुपया-दोन्ही शब्द मराठी), रुजणे (रुजवण), रुजामा, रुसणे (रुसवा),

दीर्घ रू असलेले संस्कृत शब्द

[संपादन]

हे शब्द मराठीत लिहिताना त्यांतील ’रू’ दीर्घच राहतो.
आरूढ, ऊरू, क्रूर, रूप (कुरूप, प्रारूप, रूपवान, रूपवती, सुरूप, स्वरूप, सुस्वरूप),

संस्कृतमध्ये ऱ्हस्व ’रु, पण मराठीत दीर्घ

गुरू (पण गुरुकृपा, गुरुवर्य, गुरुभक्ती), चारू (पण चारुदत्त, चारुशीला), जरत्कारू, तरू (पण तरुवर), मेरू (पण मेरुदंड), ,ववलरंय् या यव्

संस्कृतमध्ये दीर्घ पण मराठीत ऱ्हस्व

रूक्ष (अर्थ : कोरडा, अरसिक)हा मूळ दीर्घ रू असलेला संस्कृत शब्द मराठीत रुक्ष असे लिहिण्याचा प्रघात आहे.

मराठी शब्द

[संपादन]
मराठी अकारान्त शब्दांतल्या उपान्त्य अक्षराचा इकार-उकार दीर्घ असतो, म्हणून --

आवरून, उरून, करून, करवून, कोथरूड, खतरूड(खत्रूड), गारूड, घरून, चोरून, जरूर(पण जरुरी), जागरूक (जागरूकता), धरून, पुरून, फतरूड), बुरूज (पण बुरुजावर), बुरूड, भरून, भारूड, भारून, मारून, मुरूड, मुरूडकर, मुरूड जंजिरा, सवरून, स्मरून वगैरे ऊन-प्रत्ययान्त पूर्वकालवाचक अव्यय-शब्दांतला आणि अन्य शब्दांतला उपान्त्य रू दीर्घ.

धातूंना पररूप संधीने ऊ आख्यात लागलेले शब्द

करू, भरू, मारू,

मराठीत अन्त्य अक्षराचा इकार-उकार नेहमीच दीर्घ म्हणून,

इच्छाधरू, करू, गबरू, गेरू, घारू, जोरू, तरू (पण तरुवर), तारू, दारू (पण दारुड्या), दारूगोळा, दारूबंदी, तारू, नारू, नेहरू, पेरू, पोटभरू, बोरू, भरू, भैरू, मारू, मेरू (पण मेरुदंड), मोरू, यात्रेकरू, वाटसरू, सुरू (पण सुरुवात), होतकरू, वगैरे.

नादानुकारी (onomatopoeic) असलेले दीर्घान्त लिहिले नाहीत तरी चालते असे शब्द

चुरुचुरु, तुरुतुरु, वगैरे

शब्दात अनुस्वार असलेल्या अक्षराचा उकार बहुधा ऱ्हस्व म्हणून

अरुंद, अरुंधती, उरुंडी, कुरुंद, कुरुंदकर, कुरुंदवाड, कुरुंदी, जामरुंग (बोरघाटातले एक रेल्वे स्थानक), तुरुंग, निरुंद, बुरुंडी, रुंगठा, रुंजी, रुंद (रुंदी), लांबरुंद, सुरुंग, वगैरेबबंडङई.

परकीय शब्द

उरुग्वे, पेरुमल, बरुआ, फारुकी, रुक्साना, रुमानिया, रुमाल (हातरुमाल), वगैरे.

ऋ असलेले मराठी शब्द

[संपादन]

ऱ्हस्व असा असतो, तर दीर्घ असा.

हे सर्व शब्द मुळात संस्कृत असतात.

ऋकार, ऋग्वेद (ऋग्वेदी), ऋचा, ऋजू, ऋण (ऋणी), ऋता (इंग्रजीत हे नाव रीटा होते.), ऋतावरी, ऋतू (पण ऋतुपर्ण, ऋतुराज, ऋतुसंहार), ऋषभ, ऋषी (पण ऋषितुल्य), नैर्ऋत्य, वगैरे

दीर्घ ॠ असलेले मराठी शब्द

[संपादन]

असे शब्द फक्त कवितेतच सापडतात.

उदा० १ बहू शापिता कष्टला अंबषी । तयाचे स्वयें श्रीहरी जन्म सोशी ॥... रामदासकृत ’मनाचे श्लोक’, श्लोक ११६ वा.

२. षी वचनें ऐकोनी संतोषला सूतमूनी । .. मुक्तेश्वर आख्यान, अध्याय १ला श्लोक १५वा.

३. व्यंजनाला जोडलेला दीर्घ ॠ नेहमीच सापडतो.. उदा० भातॄण, पितॄण, मातॄण, वगैरे.

४. संस्कृतमध्ये दीर्घ ॠ असलेले अनेक धातू आहेत. उदा० कॄ,

हृ असलेले शब्द

[संपादन]

सुहृद, सुहृदय, हृदय, हृदयरोग, हृषीकेश, हृष्यशृंग