"ललिता सुधीर फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ललिता फडके (जन्म इ.स. १९२५; मृत्यू २५ मे २०१०) या मराठी भावगीते आणि ...
खूणपताका: संदर्भा विना भला मोठा मजकुर ! कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा.
(काही फरक नाही)

२२:३३, २३ जून २०१३ ची आवृत्ती

ललिता फडके (जन्म इ.स. १९२५; मृत्यू २५ मे २०१०) या मराठी भावगीते आणि हिंदी चित्रपटगीते गाणाऱ्या गायिका होत्या. त्यांचे माहेरचे नाव ललिता देऊळकर. एका सारस्वत मध्यमवर्गीय कुटुंबात १९२५ सालच्या ललितापंचमीला त्यांचा जन्म झाला. वडील देऊळकर हे कापडाचे व्यापारी. ललिताबाईंचे दोन काका उत्तम गाणारे आणि आजीचाही आवाज गोड. त्यांच्याच प्रेरणेने छोटी ललिता गाणे शिकली. ललिताबाईंनी गायनाचे धडे दत्तोबा तायडे आणि पुरुषोत्तम वालावलकर यांच्याकडे गिरवले. शास्त्रीय संगीतही त्या उत्तम गायच्या. पण गाणे हे घरापुरते ठेवायचे, हा त्या काळातल्या सर्वसाधारण सारस्वत मंडळींचा दृष्टिकोन असे. त्यामुळेच शेजारच्या बंगाली कुटुंबाकडे आलेले कवी आणि अभिनेते हरींद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी या मुलीचा आवाज ऐकला तेव्हा ‘हिला तुम्ही सिनेमात का पाठवत नाही’, असा प्रश्न केला. देऊळकर खरे तर या गोष्टीला राजी नव्हते. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी अखेर ती तयारी दर्शविली. चट्टोपाध्याय यांच्याच ओळखीने ललिताबाईंना ‘बॉम्बे टॉकीज’ या मातब्बर संस्थेत प्रवेश मिळाला. ‘बॉम्बे टॉकीज’ची आघाडीची नायिका देविकाराणीसोबत ‘दुर्गा’मध्ये एक फुटकळ भूमिका त्यांनी केली. याच संस्थेच्या ‘अंगूठी’मध्ये त्या दोन गाणीही गायल्या. ‘बंधन’, ‘कंगन’ या चित्रपटांपर्यंत त्या ‘बॉम्बे टॉकीज’मध्ये होत्या.

२९ मे १९४९ रोजी त्यांचा सुधीर फडके यांच्याशी विवाह झाला. त्या विवाहात महंमद रफीने मंगलाष्टके म्हटली होती.

ललिता फडके यांनी आकाशवाणीवर सादर झालेल्या गीतरामायणातली कौसल्येची सर्व गाणी गायली होती. शहीद (१९४८), नदिया के पार (१९४८), विद्या (१९४८), सिपहिया (१९४९) यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांसाठी, आणि उमज पडेल तर, चिमण्यांची शाळा, जन्माची गाठ, जशास तसे, प्रतापगड, माझं घर माझी माणसं, मायबहिणी, रानपाखरं, वंशाचा दिवा, इत्यादी मराठी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले.

आशा भोसले यांना सर्वप्रथम ललिताबाईंना पारखले होते. त्यांनीच सुधीर फडके यांच्याकडे आशाबाईंचे नाव सुचवले होते.

ललिता देऊळकर-फडके यांनी गायलेली गीते

  • अळीमिळी गोम चिळी (चित्रपट माय बहिणी)
  • उगा का काळीज माझे उले पाहूनि वेलीवरची फुले (गीत रामायण)
  • कदम उठाकर रुक नही सकता (चित्रपट शहीद)
  • तिन्ही सांज होता तुझी याद येते (चित्रपट चिमण्यांची शाळा)
  • नको रे जाऊ रामराया (गीत रामायण)
  • नखानखांवर रंग भरा (चित्रपट मायाबाजार)
  • पाव्हणं एवढं ऐका (चित्रपट वंशाचा दिवा)
  • बचपन की याद धीरे धीरे (चित्रपट शहीद)
  • मिटून घेतले नेत्र तरी (चित्रपट उमज पडेल तर)
  • मी आज पाहिला बाई (चित्रपट चिमण्यांची शाळा)
  • मी तर प्रेम दिवाणी (चित्रपट सुवासिनी)
  • मेरे राजा हो, ले चल नदिया के पार (चित्रपट नदिया के पार)
  • मोठं मोठं डोळं माझं कोळ्याचं जाळं (चित्रपट जशास तसे)
  • रंगूबाई, गंगूबाई हात जरा चालू द्या (चित्रपट चिमण्यांची शाळा)
  • रंगू बाजारला जाते (चित्रपट वंशाचा दिवा)
  • लंगडा गं बाई लंगडा नंदाचा कान्हा लंगडा (चित्रपट सौभाग्य)
  • सावळा गं रामचंद (गीत रामायण)
  • हमको तुम्हारा ही आसरा (चित्रपट साजन)

ललिता फडके यांना मिळालेले पुरस्कार

  • गदिमा प्रतिष्ठानचा ‘गृहिणी-सखी-सचिव पुरस्कार’

हेही पहा

[www.aathavanitli-gani.com/Swar/Lalita_Phadke‎ललिता फडके यांची गाणी]