"श्रीनिवास कशाळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर, {शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्य... खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा. |
(काही फरक नाही)
|
१८:५०, ३ जून २०१३ ची आवृत्ती
डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर, {शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|एम.बी.बी.एस. एम.डी. एफ.आय.सी.जी. एफ.एफ.एफ.बी.एम.एस.]] हे एक वैद्यकीय व्यवसाय करीत असलेले डॉक्टर आहेत. ते तणावमुक्तिशास्त्राचे विशेषज्ञ असून, शरीरशास्त्र या विषयात एम.डी. करणाऱ्यांसाठी अधिकृत मार्गदर्शक आणि त्या विषयाचे परीक्षक आहेत. त्यांचे त्यांचे परळ(मुंबई) येथे के.ई.एम. रुग्णालयाच्या इमारतीत ’तणावमुक्ती केंद्र’ आहे.
डॉक्टर कशाळीकर हे मराठीतील साहित्यिक डॉक्टर आहेत. त्यांनी लिहिलेली काही पुस्तके अशी :
डॉ. कशाळीकरांची पुस्तके
- अंकुर (कवितासंग्रह)
- आरोग्य स्मरण (सहलेखक :डॉ.सुहास म्हेत्रे व डॉ.पुष्कर शिकारखाने)
- आरोग्याचा आरसा
- आरोग्य का राजमार्ग (हिंदी) (सहलेखक : डॉ.पुष्कर शिकारखाने व डॉ.अपर्णा ताम्हाणे)
- तणावमुक्तीसाठी उपयोगी लेख
- तेजस्वी दृष्टी
- थकवा घालवा
- निरोगी माता
- भोवरा (अनुभवकथन. पुस्तकाला डॉ.इंदुमती पारीख यांची प्रस्तावना)
- यशोदय (यशोप्राप्तीसाठी मार्गदर्शन)
- वृद्ध तरीही समृद्ध
- वैद्यकीय व्यवसाय व्यवहार आणि ध्येय
- व्यसनमुक्ती
- संपूर्ण आरोग्यासाठी नामस्मरण
- संपूर्ण तणावमुक्ती आणि समस्यापूर्ती (सहलेखक :डॉ.सुहास म्हेत्रे व डॉ.पुष्कर शिकारखाने)
- संपूर्ण तणावमुक्तीसाठी हितगुज
- सम्यक् वैद्यक
- सर्वंकश वैयक्तिक व सामाजिक कल्याणाचा राजमार्ग
- सहस्रनेत्र (विष्णुसहस्रनाम स्तोत्राचे नवे आकलन)
- स्वच्छता आरोग्याचा राजमार्ग