श्रीनिवास कशाळीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. श्रीनिवास जनार्दन कशाळीकर, एम.बी.बी.एस. एम.डी. एफ.आय.सी.जी. एफ.एफ.एफ.बी‍.एम.एस. हे एक वैद्यकीय व्यवसाय करीत असलेले डॉक्टर आहेत. ते तणावमुक्तिशास्त्राचे विशेषज्ञ असून, शरीरशास्त्र या विषयात एम.डी. करणाऱ्यांसाठी अधिकृत मार्गदर्शक आणि त्या विषयाचे परीक्षक आहेत. त्यांचे त्यांचे परळ(मुंबई) येथे के.ई.एम. रुग्णालयाच्या इमारतीत ’तणावमुक्ती केंद्र’ आहे. अ

डॉ. श्रीनिवास कशाळीकर यांचे वडील जनार्दनशास्त्री हे एक आयुर्वैदिक वैद्य होते. त्यांनी आयुर्वेदावर पुस्तके लिहिली होती.

डॉक्टर कशाळीकर हे मराठीतील साहित्यिक डॉक्टर आहेत. त्यांनी लिहिलेली पुस्तके (यांतली काही पुस्तके ई-पुस्तकेही आहेत.) :

डॉ. कशाळीकरांची पुस्तके[संपादन]

  • अंकुर (कवितासंग्रह)
  • ॲक्शन अगेन्स्ट करप्शन (इंग्रजी)
  • आरोग्यदीप
  • आरोग्य स्मरण (सहलेखक :डॉ.सुहास म्हेत्रे व डॉ.पुष्कर शिकारखाने)
  • आरोग्याचा आरसा
  • आरोग्य का राजमार्ग (हिंदी) (सहलेखक : डॉ.पुष्कर शिकारखाने व डॉ.अपर्णा ताम्हाणे)
  • आसनाज़ (योगासनांचे सादरीकरण, ई-पुस्तक)
  • स्ट्रेस ॲन्ड करप्शन (इंग्रजी)
  • स्ट्रेस ॲन्ड कन्सेप्च्युअल स्ट्रेस (इंग्रजी)
  • स्ट्रेस ॲन्ड मेडिटेशन (इंग्रजी)
  • स्ट्रेस ॲन्ड वॉकिंग (इंग्रजी)
  • कामजीवन ज्ञान आणि समाधान
  • गिनिपिग (टी.व्ही. मालिका)
  • तणावमुक्तीसाठी उपयोगी लेख
  • तेजस्वी दृष्टी
  • थकवा घालवा स्फूर्ती मिळवा
  • नवग्रह स्तोत्रम्‌ (धार्मिक)
  • नामस्मरण (बोलके पुस्तक -ऑडियो सीडी))
  • नामस्मरण ॲन्ड स्ट्रेस (इंग्रजी)
  • निरोगी माता
  • प्रॅक्टिकल टोटल स्ट्रेस मॅनेजमेन्ट (इंग्रजी)
  • बी सक्सेसफुल इन एक्झॅमिनेशन (इंग्रजी)
  • भोवरा (अनुभवकथन. पुस्तकाला डॉ.इंदुमती पारीख यांची प्रस्तावना आहे.)
  • म्हणजे काय होते
  • यशोदय (यशोप्राप्तीसाठी मार्गदर्शन)
  • वृद्ध तरीही समृद्ध
  • वैद्यकीय व्यवसाय व्यवहार आणि ध्येय
  • व्यसनमुक्ती
  • शांभवी (कादंबरी)
  • संपूर्ण आरोग्यासाठी नामस्मरण (मराठी, इंग्रजी)
  • संपूर्ण तणावमुक्ती आणि समस्यापूर्ती (सहलेखक :डॉ.सुहास म्हेत्रे व डॉ.पुष्कर शिकारखाने)
  • संपूर्ण तणावमुक्तीसाठी हितगुज
  • संपूर्ण कामजीवन : लैंगिक ज्ञान-समाधान
  • सम्यक्‌ वैद्यक
  • सर्वंकश वैयक्तिक व सामाजिक कल्याणाचा राजमार्ग
  • सहस्रनेत्र (विष्णूसहस्रनाम स्तोत्राचे नवे आकलन)
  • सुपरलिव्हिंग (इंग्रजी)
  • सूर्यशोध (सामाजिक कादंबरी)
  • स्माइलिंग सन (इंग्रजी)
  • स्वच्छता आरोग्याचा राजमार्ग
  • हेल्थ इन फर्स्ट चॅप्टर ऑफ गीता (इंग्रजी)
  • होलिस्टिक मेडिसिन (इंग्रजी)