Jump to content

"प्रतिष्ठाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''प्रतिष्ठान''' म्हणजे इंग्रजीत फाउंडेशन. महाराष्ट्रात संस्थांच्...
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
(काही फरक नाही)

१२:४९, ७ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

प्रतिष्ठान म्हणजे इंग्रजीत फाउंडेशन. महाराष्ट्रात संस्थांच्या नावांत, एकेकाळी संस्था, मंडळ, मंडळी, कंपनी, सोसायटी, समाज, सभा हे शब्द असत. एखाद्या गर्भश्रीमंत माणसाने मागे ठेवलेल्या पैशांचा योग्य विनियोग व्हावा म्हणून स्थापन केलेल ट्रस्ट (न्यास) होते; आणि एखाद्या उद्योजकाने किंवा फार मोठ्या व्यापाऱ्याने आपल्या गडगंज संपत्तीच्या काही भागाचा सदुपयोग व्हावा म्हणून काही फाउंडेशनेही स्थापन केली होती. पण त्यांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी जेमेतेम असेल.

ॲकॅडमी

पुण्यात नॅशन्ल डिफेन्स ॲकॅडमी स्थापन झाली आणि ॲकॅडमी शब्दासाठी भारत सरकारने अकादमी असा शब्द योजला. त्या शब्दावर आचार्य अत्रे आणि इतर अनेक मराठी पत्रकारांनी सडकून टीका केली, अनेक शब्द सुचवले आणि शेवटी ॲकॅडमीसाठी प्रबोधिनी हा शब्द मान्य झाला. आता पुण्यातील त्या संस्थेला मराठीत ’राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ म्हटले जाते. परिणामत: पुढच्या काळात महाराष्ट्रात अनेक प्रबोधिन्या आणि बोधिन्या स्थापन झाल्या. ज्ञानप्रबोधिनी आणि म्हाळगीबोधिनी ही त्यांची ठळक उदाहरणे.

प्रतिभा प्रतिष्ठान

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांनी १९८० साली ’इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान’ नावाचे एक फाउंडेशन स्थापन केले. पुढे या संस्थेचा आर्थिक भ्रष्टाचाराशी संबंध आहे हे समजल्यावर इंदिरा गांधींनी संस्थेच्या नावातला इंदिरा गांधी हा शब्द गाळायला लावला.

हे ’प्रतिभा प्रतिष्ठान’ प्रामुख्याने बांधकाम व्यावसायिकांना आणि सिमेंटचा काळा बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांना मुख्य मंत्री अंतुले यांनी वाटलेल्या सिमेंटच्या परवान्यांबद्दल मिळालेल्या लाचेच्या रकमेची व्यवस्था लावण्यासाठी होते, हे पुढे सिद्ध झाले. त्यामुळे अंतुले यांचे मुख्यमंत्रिपद गेले.

या ’प्रतिभा प्रतिष्ठान’चे पैसे मुदतीच्या ठेवींमध्ये गुंतवावे असा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश होता. तसे न करता अंतुले आणि त्यांचे जावई मुश्ताक अंतुले यांनी ’प्रतिभा प्रतिष्ठानच्या’ पैशांपैकी अलाहाबाद बँक आणि कॅनरा बँक यांत ठेवलेले सुमारे १९ कोटी रुपये एका चार्टर्ड अकाउंटन्टच्या मदतीने गायब केले. हे पैसे अंतुले १९९५साली केंद्र सरकारचे इ.स. १९९५मध्ये मंत्री झाल्यानंतर लगेच गायब करण्यात आले, हे विशेष. इतके झाल्यावर हे पैसे या बँकांनीच हडप केले असा आरोप ठेवून अंतुल्यांनी बँकांवर खटला भरला. मुंबई उच्च न्यायालयाने अर्थातच तो ’चोराच्या उलट्या बोंबा’ असा शेरा मारून फेटाळला.

असे असले तरी या ’प्रतिभा प्रतिष्ठान’ नंतर महाराष्ट्रा प्रतिष्ठाने स्थापन करण्याचे पेव फुटले. आज मितीला महाराष्ट्रात दोनशेच्या आसपास प्रतिष्ठाने असावीत. त्यांतील शैक्षणिक प्रतिष्ठाने ही राजकारणी शिक्षणसम्राटांनी स्थापन केलेली असल्याने त्यांचे संचालक मुख्यत्वे पैसा जमा करण्याचे काम करतात. अर्थात त्याबरोबर शिक्षणप्रसारही होतोच. असे असले तरी महाराष्ट्रातील अनेक प्रतिष्ठाने सभासदांच्या पैशावर समाजोपयोगी कामेच करतात. महाराष्ट्रात प्रतिष्ठानांचे पंजीकरण करणे सक्तीचे नसल्याने प्रतिष्ठानांची संपूर्ण यादी उपलब्ध नाही. तरीसुद्ध खाली काही उपलब्ध नावे दिली आहेत.

महाराष्ट्रातील प्रतिष्ठानांची (अपूर्ण) यादी

महाराष्ट्रातील प्रतिष्ठाने
  • अंकुर प्रतिष्ठान
  • अक्षय प्रतिष्ठान, दिल्ली(?)
  • अबोली प्रतिष्ठान, जळगाव
  • अभिजित प्रतिष्ठान, मुंबई
  • अमित प्रतिष्ठान
  • अर्थक्रांती प्रतिष्ठान
  • अस्तित्व प्रतिष्ठान, पुणे
  • आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान
  • आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान
  • आचार्य चाणक्य शिक्षा प्रतिष्ठान, जयपूर
  • आदर प्रतिष्ठान, पुणे
  • आदित्य प्रतिष्ठान
  • आधार प्रतिष्ठान, पुणे
  • आमद प्रतिष्ठान
  • आय‍आय‍टी प्रतिष्ठान
  • आय‍आय‍टियन्स प्रतिष्ठान
  • आयुर्वेद प्रतिष्ठान
  • इंदिरा गांधी प्रतिष्ठान, लखनौ(?)
  • ईसाहित्य प्रतिष्ठान
  • उत्कर्ष प्रतिष्ठान
  • काणेबुवा प्रतिष्ठान
  • कुसुमाग्रज प्रतिष्ठान
  • केदारेश्वर प्रतिष्ठान
  • केशव स्मृती प्रतिष्ठान
  • कोकण भूमी प्रतिष्ठान, ठाणे
  • खंडेराय प्रतिष्ठान, पुणे
  • गझल सागर प्रतिष्ठान
  • गुरुकुल प्रतिष्ठान, चाळीसगाव
  • गुरुकुल प्रतिष्ठान, रत्नागिरी
  • गोकुल प्रकल्प प्रतिष्ठान, पन्हाळे (तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी)
  • ग्राम गौरव प्रतिष्ठान, नायगाव (तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर)
  • ग्रामीण विकास प्रतिष्ठान, रायपूर
  • ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान, मुंबई
  • चौखंबा संस्कृत प्रतिष्ठान, बनारस(?)
  • जनहित प्रतिष्ठान, बारामती
  • जय बजरंग प्रतिष्ठान
  • जयहिंद प्रतिष्ठान
  • जलवर्धिनी प्रतिष्ठान, मुंबई
  • जिव्हेश्वर प्रतिष्ठान, पुणे
  • डी.वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान
  • तपोधाम प्रतिष्ठान, पुणे
  • त्र्मूर्ती पा्वन प्रतिष्ठान
  • दादा जगताप प्रतिष्ठान
  • दिग्विजय प्रतिष्ठान
  • धन्वंतरी वैद्यकीय प्रतिष्ठान, नांदेड
  • धुरंधर प्रतिष्ठान
  • नटरंग प्रतिष्ठान
  • नारायण गोविंद क्रीडा प्रतिष्ठान
  • नित्युंदन गोत्रीय भिडे प्रतिष्ठान
  • नेत्रसेव्बा प्रतिष्ठान, पुणे
  • नेरूर समृद्धी प्रतिष्ठान, मुंबई (नेरूर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे).
  • पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान
  • पी.के. साळवे कला प्रतिष्ठान
  • पुण सायकल प्रतिष्ठान
  • पूर्वा प्रतिष्ठान, अलाहाबाद
  • प्रगती प्रतिष्ठान, जव्हार (ठाणे)
  • प्रतिभा प्रतिष्ठान, दिल्ली
  • प्राच्यविद्या प्रतिष्ठान, जोधपूर
  • प्रेरणा प्रतिष्ठान
  • बी.आर. खेडकर प्रतिष्ठान
  • बेरू मतिमंद प्रतिष्ठान, बदलापूर (ठाणे)
  • बोहरा प्रतिष्ठान, उदयपूर
  • भगरे गुरुजी प्रतिष्ठान, मुंबई
  • भगवानबाबा प्रतिष्ठान
  • भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, पुणे
  • भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान
  • भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान, सोलापूर
  • भाऊसाहेब हिरे प्रतिष्ठान
  • भास्कर प्रतिष्ठान, पुणे
  • भास्कराचार्य प्रतिष्ठान
  • मंगेश प्रतिष्ठान
  • मधुकरजी पवळे प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड
  • मराठा प्रतिष्ठान
  • मराठे प्रतिष्ठान
  • महिला शक्ती प्रतिष्ठान, पुणे
  • महात्मा फुले समता प्रतिष्ठान, पुणे
  • महावीर प्रतिष्ठान
  • माउली प्रतिष्ठान
  • माउलीसेवा प्रतिष्ठान
  • मातोश्री प्रतिष्ठान, नांदेड
  • मानव प्रतिष्ठान
  • मृत्युंजय प्रतिष्ठान, पुणे
  • मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान, कराड
  • यशवंतराव प्रतिष्ठान
  • यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
  • युवक प्रतिष्ठान, मुंबई
  • युवा प्रतिष्ठान
  • रमणनाना प्रतिष्ठान, ताथवडे (पुणे)
  • रमाई महिला प्रतिष्ठान
  • राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड
  • राजमुद्रा प्रतिष्ठान
  • राजा श्री शिवराय प्रतिष्ठान
  • राजे प्रतिष्ठान
  • श्री राम प्रतिष्ठान, सेलू
  • रामकृष्ण मिशन सेवा प्रतिष्ठान
  • राष्ट्रीय नागर ब्राह्मण प्रतिष्ठान, गुजराथ
  • रुद्र प्रतिष्ठान, पुणे
  • रूपवेध प्रतिष्ठान
  • लातूर प्रतिष्ठान, लातूर
  • लोकमंगल प्रतिष्ठान
  • लोकविश्वास प्रतिष्ठान, गोवा
  • वर्धमान प्रतिष्ठान, पुणे
  • वल्लभभाई प्रतिष्ठान
  • वसंतदादा पाटील प्रतिष्ठान
  • वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान
  • वसुंधरा कृषी विकास प्रतिष्ठान, पुणे
  • वाय बी चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
  • विकास सहयोग प्रतिष्ठान
  • विद्या प्रतिष्ठान, बारामती
  • विद्यापती प्रतिष्ठान, पुणे
  • विद्या विकास प्रतिष्ठान, सोलापूर
  • विवेकानंद प्रतिष्ठान, जळगाव
  • विवेकानंद केंद्र प्रतिष्ठान, कन्याकुमारी
  • शंकर महाराज प्रतिष्ठान
  • शंकरराव जाधव प्रतिष्ठान
  • शबरी कृषी प्रतिष्ठान, सोलापूर
  • शंभू प्रतिष्ठान, काळेवाडी (पुणे)
  • शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान
  • शिव प्रतिष्ठान
  • शिवगणेश आयुर्वेदिक प्रतिष्ठान, सासाराम
  • शिवगर्जना प्रतिष्ठान
  • शिवप्रताप प्रतिष्ठान
  • शिवमणी प्रतिष्ठान
  • शिवराज प्रतिष्ठान
  • शिवराय प्रतिष्ठान, पुणे
  • शिवसमर्थ प्रतिष्ठान
  • शिवाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान, पुणे
  • शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान, डोंबिवली (ठाणे जिल्हा)
  • शुभलहरी प्रतिष्ठान, ठाण
  • श्री प्रतिष्ठान
  • श्रीयश प्रतिष्ठान
  • श्रीयश प्रतिष्ठान, सतरा तांडा (औरंगाबाद जिल्हा)
  • श्रीराम प्रतिष्ठान, सेलू
  • संकल्प प्रतिष्ठान, ठाणे
  • संगीत सेवा प्रतिष्ठान
  • संघर्ष प्रतिष्ठान
  • संजीव चिमलगी प्रतिष्ठान, विले पार्ले, मुंबई
  • समन्वय प्रतिष्ठान
  • समर्थ प्रतिष्ठान
  • सर्वोदय प्रतिष्ठान
  • संस्कृती प्रतिष्ठान
  • संस्कृती युवा प्रतिष्ठान
  • सह्याद्री प्रतिष्ठान, पुणे
  • साई प्रतिष्ठान (वडगाव शेरी)
  • साई महिला प्रतिष्ठान (सोलापूर)
  • सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान, उज्जैन
  • साम्राज्य प्रतिष्ठान, पुणे
  • सिद्धयोग प्रतिष्ठान, दिल्ली
  • सुस्वराज्य प्रतिष्ठान
  • सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, वर्धा
  • स्वराज्य प्रतिष्ठान
  • स्वरानंद प्रतिष्ठान
  • स्वरूपयोग प्रतिष्ठान
  • स्वस्थियोग प्रतिष्ठान, मिरज
  • स्वामी ब्र्ह्मानंद प्रतिष्ठान
  • स्वामी शिवानंद संगीत प्रतिष्ठान, पुणे
  • हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान, पिंपरी (पुणे)
  • हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान, अहमदनगर
  • ज्ञानदा प्रतिष्ठान
  • ज्ञानसाधना प्रतिष्ठान, परभणी