"मधुरिता सारंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: नृत्यश्री '''मधुरिता सारंग''' (१९५३-२००५) या महाराष्ट्रातील एक प्रथ... खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?) |
(काही फरक नाही)
|
१६:१९, १४ मार्च २०१३ ची आवृत्ती
नृत्यश्री मधुरिता सारंग (१९५३-२००५) या महाराष्ट्रातील एक प्रथितयश नृत्यांगना होत्या. त्यांनी पंडित शंकर प्रसाद, लच्छू महाराज, पंडित चौबे महाराज आणि बिरजूमहाराज या नृत्यकलेतील दिग्गजांकडून कथक नृत्याचे शिक्षण घेतले होते. त्या भरतनाट्यमही शिकल्या होत्या. मधुरिता सारंग यांचे मानवी भावनांचे दर्शन घडवणारे नृत्यकौशल्य, नाच बसवून घेण्याची हातोटी आणि नृत्यनाट्याच्या अद्भुत संकल्पना खरोखरच लाजवाब असत. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील जगप्रसिद्ध ॲलिस टुली हॉलमध्ये त्यांचा कथक नृत्याचा कार्यक्रम आणि त्याच वेळी झालेला शोभा गुर्टू यांचे गायन फार वाखाणले गेले होते.
मधुरिता सारंग यांच्या शिष्या अर्चना संजय यांनी २००४साली पुणे शहरात ’कथक साधना केंद्र’ नावाची एक कथक नृत्य शिकवणारी संस्था काढली होती. मधुरितांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्या स्मरणार्थ त्या संस्थेचे नाव ’मधुरिता सारंग स्कूल ऑफ कथक ॲन्ड परफॉर्मिंग आर्ट्स’असे बदलण्यात आले. त्या संस्थेच्या संचालिका आजही (इ.स.२०१३) अर्चना संजय आहेत.
या नृत्यसंस्थेतर्फे मधुरिता सारंग यांच्या जानेवारीतील स्मृतिदिनाच्या निमित्ताने दरवर्षी एका नृत्यकलाकाराला आणि एका दृश्यकला सादर करणाऱ्या कलावंताला मधुरिता सारंग स्मृति सन्मान पुरस्कार दिला जातो. ह्या पुरस्काराचा दर्जा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कारांच्या योग्यतेचा असतो. आत्तापर्यंत हे पुरस्कार राजेंद्र गंगाणी, पुरु दधीच (२०१०), मंजिरी देव, गीतांजली लाल (२०१२), कुमुदिनी लाखिया (२००९), शमा भाटे (२०१३), डॉ.सुचेता भिडे चापेकर या नृत्यगुरूंना, तसेच गायक अजय पोहनकर(२०१०), बासरीवादक रोणू मुजुमदार (२०१२), तबलावादक सुरेश तळवलकर (२००९) व सतारवादक मंजू मेहता (२०१३) यांना प्रदान केले गेले आहेत.
हा पुरस्कार वितरण सोहोळा पुण्यात होतो आणि त्या दिवशी होणाऱ्या नृत्याच्या आणि संगीताच्या कार्यक्रमाला श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना मुक्त व विनामूल्य प्रवेश असतो.