Jump to content

"ऊर्मिला पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १५: ओळ १५:
==मानसन्मान /पुरस्कार==
==मानसन्मान /पुरस्कार==


धुळे येथे झालेल्या ११व्या [[विद्रोही साहित्य संमेलन|विद्रोही साहित्य संमेलनाच्या]] त्या अध्यक्षा होत्या. हे संमेलन १३ व १४ जानेवारी २०१३ या दोन दिवसांत भरले होते.
* धुळे येथे झालेल्या ११व्या [[विद्रोही साहित्य संमेलन|विद्रोही साहित्य संमेलनाच्या]] त्या अध्यक्षा होत्या. हे संमेलन १३ व १४ जानेवारी २०१३ या दोन दिवसांत भरले होते.
* नाशिकच्या समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने रविवार दि. २४ फेब्रुवारी २०१३ रोजी सटाणा येथे कवी कैलास पगारे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या परिषदेत उर्मिला पवार यांना समाज प्रबोधन संस्थेचा राज्यस्तरीय 'प्रबोधनमित्र' पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१६:३९, ३ मार्च २०१३ ची आवृत्ती

ऊर्मिला पवार या एक मराठी लेखिका आहेत. त्यांचे मोळ गाव तळकोकणात आहे. त्यांचे एम.ए.चे शिक्षण झाल्यावर त्यांनी लिहायला सुरुवात केली. ’सहावं बोट’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९८८मध्ये प्रकाशित झाला.

एकांकिका, समीक्षा असे लेखनप्रकारही हाताळेल्या उर्मिला पवार यांच्या ' आयदान ' या आत्मकथनाने मराठी साहित्यातील आत्मकथेला ऐतिहासिक वळण मिळाले. आज दलित आत्मकथनांच्या प्रवासाची चर्चा 'बलुतं ते आयदान' अशीच केली जाते. ऊर्मिला पवार यांच्या कथा, आत्मकथनाचे इंग्रजी, स्वीडिश या भाषांमध्येही भाषांतर झाली आहेत.

उर्मिला पवार यांची पुस्तके

  • आम्हीही इतिहास घडवला : आंबेडकरी चलवळीत स्त्रियांचा सहभाग (सहलेखिका मीनाक्षी मून)
  • आयदान (आत्मचरित्र). या पुस्तकाचे हिंदी भाषांतर माधवी प्रसाद देशपांडे यांनी केले आहे.
  • उदान (पाली भाषेतल्या ’तिपीटिका सुत्तपीटक खुद्दकणिकाय उदान’ या मूळ ग्रंथावरून)
  • चौथी भिंत (कथासंग्रह)
  • दलित लेखिका आणि त्यांचे साहित्य (वैचारिक)
  • मॉरिशस-एक प्रवास (प्रवासवर्णन)
  • हातचा एक (कथासंग्रह)

मानसन्मान /पुरस्कार

  • धुळे येथे झालेल्या ११व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. हे संमेलन १३ व १४ जानेवारी २०१३ या दोन दिवसांत भरले होते.
  • नाशिकच्या समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने रविवार दि. २४ फेब्रुवारी २०१३ रोजी सटाणा येथे कवी कैलास पगारे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या परिषदेत उर्मिला पवार यांना समाज प्रबोधन संस्थेचा राज्यस्तरीय 'प्रबोधनमित्र' पुरस्कार प्रदान करण्यात आला.