"मुस्लिम मराठी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १७: ओळ १७:
सोलापूरला पहिल्या अ.भा. मुस्लिम साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. औरंगाबादमध्ये भरलेले संमेलन आठवे आहे.
सोलापूरला पहिल्या अ.भा. मुस्लिम साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. औरंगाबादमध्ये भरलेले संमेलन आठवे आहे.


==आठवे अखिल भारतीय मुस्लिम साहित्य संमेलन==
==नंतरची अखिल भारतीय मुस्लिम साहित्य संमेलने==
२००९ [[औरंगाबाद]]
* २००९ [[औरंगाबाद]]
* १०वे, २० जानेवारी २०१३, संमेलनाध्यक्ष प्रा. जावेद पाशा


==यू.म.पठाण यांच्या २४-१-२०१० रोजीप्रसिद्ध झालेल्या एका लेखाचेअवतरण==
==यू.म.पठाण यांच्या २४-१-२०१० रोजीप्रसिद्ध झालेल्या एका लेखाचेअवतरण==

१४:३३, १४ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

मराठी साहित्यातील एकात्मता

"इ.स. १९९० हे वर्ष ज्ञानेश्वरी-सप्तशताब्दी वर्ष हो्ते व त्याच वर्षी संत वाङ्‌मयाचे अभ्यासक प्रा. यू.म.पठाण हे पुण्याला होणाऱ्या ६३ व्या, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या वेळी प्रा. फ.म. शहाजिंदे हा एकच मुस्लिम मतदार होता. अशा परिस्थितीत यू.म.पठाण भरघोस मतांनी निवडून आले. याचा अर्थच हा, की साहित्यप्रेमी जातीयवादी वा धर्मवादी विचार करीत नाहीत. साहित्य सेवेचीही योग्य ती बूज राखतात. एकात्मता ही सर्व मराठी माणसांच्या रक्तातच आहे.

उदयोन्मुख मुस्लिम मराठी साहित्यिक

नावारूपाला आलेल्या बरेच मुस्लिम मराठी साहित्यिक आहेत. पण, महाराष्ट्राच्या शहरांशहरांत, खेडापाड्यांत असे कितीतरी उदयोन्मुख मुस्लिम तरुण लेखन करू पाहतात आणि आपल्या लेखनाचे प्रकाशनही करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाव, संधी, प्रोत्साहन व प्रेरणा मिळत नाही. ही प्रेरणा मिळावी आणि त्यांनी अनुभवलेल्या जीवनातल्या चढ-उतारांचे यथार्थ वास्तव चित्रण आपल्या लेखनातून करावे, की त्यामुळे मराठी समाजातल्या एका महत्त्वाच्या घटकाचे अत्यंत खडतर जीवन व त्या संदर्भातील साहित्याचे दालन दुर्लक्षित व उपेक्षित न राहावे, हा अखिल भारतीय मुस्लिम मराठी संमेलनाचे आयोजन करण्यामागील एक महत्त्वाचा हेतू आहे.

संमेलनांचे अध्यक्षस्थान

अनेक चांगल्या साहित्यिकांनी मुस्लिम मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्षस्थान भूषविले आहे. प्रा. फ.म. शहाजिंदे, प्रा. फ.इ. बेन्नूर, डॉ. अजिज नदाफ, ए.के. शेख, बाबर खलिल मोमीन, डॉ. जुल्फी शेख, डॉ. शेख इक्बाल, वगैरे.

मराठी मुस्लिम साहित्यिक-विचारवंत

हमीद दलवाई, राजन खान, राझिया पटेल, मुमताज रहिमतपुरे, एहतेशाम देशमुख, इलाही जमादार, मुबारक शेख, हुसेन जमादार, अब्दुल कादर मुकादम, सय्यद अल्लाउद्दीन, अमर हबीब इ. अनेक मुस्लिम साहित्यिकांनी-विचारवंतांनी आपल्या प्रतिभेच्या बळावरच मराठी साहित्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.

पहिले अखिल भारतीय मुस्लिम साहित्य संमेलन

ज्या वर्षी यू.म.पठाण हे मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते, त्याच वर्षी म्हणजे इ.स.१९९०मध्ये सोलापूरला पहिल्या अ.भा. मुस्लिम साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. औरंगाबादमध्ये भरलेले संमेलन आठवे आहे.

नंतरची अखिल भारतीय मुस्लिम साहित्य संमेलने

  • २००९ औरंगाबाद
  • १०वे, २० जानेवारी २०१३, संमेलनाध्यक्ष प्रा. जावेद पाशा

यू.म.पठाण यांच्या २४-१-२०१० रोजीप्रसिद्ध झालेल्या एका लेखाचेअवतरण

मराठी मुस्लिम समाजाचे कितीसे प्रतिबिंब मराठी वाङ्मयात उमटले आहे? ज्यांनी मुस्लिम असण्याचे दु:ख भोगले आहे व जे अजूनही भोगतच आहेत, त्या मुस्लिम साहित्यिकांनाही व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. दलित साहित्याप्रमाणेच महाराष्ट्रीय जीवनाचे हे महत्त्वाचे दालन प्रकाशात येणे आवश्यक आहे. आजवर एका तरी अ.भा. मराठी साहित्य संमेलनात याविषयी कधी विचार झाला का? याची खंत कधी कुणाला वाटली का? ती का बरे वाटली नाही?

तरुण मुस्लिम लेखक-कवींना योग्य लेखन- मार्गदर्शन करायला हवे. त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. त्यांच्यासाठीही माध्यम उपलब्ध करून द्यायला हवे. नवलेखकांच्या शिबिरात त्यांनाही मार्गदर्शन करायला हवे. अल्पसंख्य दर्जा लाभलेल्या मुस्लिम संस्थांनी यासाठी पुढाकार घेऊन तरुणांना शैक्षणिक, आर्थिक व साहित्यिक क्षेत्रात संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. उर्दू माध्यमाच्या शाळांत आज मुस्लिम विद्यार्थीही मराठी भाषा शिकत असल्यानेच अ-मराठी बालभारतीची पाठ्यपुस्तके शासनाने म.रा. पाठ्यपुस्तक मंडळाद्वारे संपादित व प्रकाशित केली जातात. या क्रमिक पुस्तकांच्या संपादन समितीचा मी अनेक वर्षे अध्यक्ष होतो. व्यावहारिक मराठीवर या पुस्तकात अधिक भर द्यायला हवा. त्यासाठी या संपादन समित्यांवर एक-दोन उर्दूभाषक सदस्यही घ्यावेत. कारण मराठी शिकणाऱ्या उर्दूभाषक मुलांच्या अडचणी त्यांना नेमकेपणाने माहीत असतात. उर्दू माध्यमाच्याच नव्हे, तर इंग्रजीसारख्या अमराठी माध्यमातील मराठीच्या अध्यापनाचा स्तर मला अजूनही फार असमाधानकारक वाटतो. त्याचा मूलगामी विचार करून सत्वर कार्यवाही करायला हवी. उर्दू माध्यमांच्या शाळांत मराठी कार्यक्रम किती होतात? उर्दू सांस्कृतिक कार्यक्रमातही मराठी सांस्कृतिक कार्यक्रम किती होतात? त्यात मराठी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा होतात का? उर्दू माध्यमाच्या संस्थांतील नियतकालिकात मराठी विभाग असतो का? स्पोकन इंग्लिशसारखे ‘स्पोकन मराठी’ म्हणजे शुद्ध, चांगली, योग्य उच्चारांची, प्रवाही मराठी भाषा शिकविण्याचे वर्गही या संस्थांनी चालविण्यास हरकत नाही. मराठीतच नव्हे, तर उर्दूतही आत्मकथन करणारे लेख अल्पसंख्य दर्जा असलेल्या संस्थांच्या मासिकांत अजूनही प्रसिद्ध होत नाहीत; ते व्हावेत यासाठी मुस्लिम मुलांना प्रोत्साहन द्यायला हवे. उर्दू-मराठी व मराठी-उर्दू अनुवादासाठी राज्याची उर्दू अकादमी व साहित्य संस्कृती मंडळ यांनी कार्यशाळा आयोजित करायला हव्यात. उर्दू माध्यमाच्या डी.एड. व बी.एड.च्या अभ्यासक्रमात मराठी अध्यापन पद्धती हा विषय अनिवार्य तर करावाच; पण त्यासाठी काटेकोरपणे अर्हताप्राप्त प्राध्यापकच नेमावेत, अल्पसंख्य दर्जा असलेल्या उर्दू माध्यमाच्या महाविद्यालयांनी व पदव्युत्तर केंद्रांनी मुस्लिमांच्या समस्यांविषयी व मराठी अध्यापनाचा स्तर उंचावण्यासाठी संशोधन प्रकल्प घेऊन विधायक सूचनांच्या पुस्तिका प्रकाशित करून त्या प्रसारित कराव्यात. उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकांचे अध्यापन करण्यासाठी ज्या शिक्षक हस्तपुस्तिका प्रसिद्ध केल्या जातात त्यातील संपादन-मंडळावर एक उर्दू भाषक मराठी तज्ज्ञही असावा. राज्य शैक्षणिक प्रशिक्षण व संस्थेने यासाठी अशा शिक्षकांची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावीत. चांगली मराठी लिपी लिहिण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे व त्यांना व्यावहारिक मराठी भाषेचे शिक्षण देणं हेही मराठी भाषा शिकणार्‍या मुस्लिम विद्यार्थ्यांची फार मोठी गरज आहे, ती अल्पसंख्य दर्जा संस्थांनी लक्षात घ्यायला हवी. मुसलमान समाजाला मराठी शिकण्याची ऍलर्जी कशी असेल? उलट ती शिकण्यासाठी ते उत्सुकच असतात. महाविद्यालयात मराठी विषय घ्यायला टाळाटाळ करतात, हाही एक गैरसमज आहे. केवळ मराठवाड्याचाच विचार केला तरी यात फारसे तथ्य नाही हे लक्षात येईल. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आम्ही सारे मुसलमान मराठी साहित्यिक मर्‍हाटी संस्कृतीचेे व मराठी वाङ्मयाचे अविभाज्य घटक व वारसदार कसे आहोत, याचे आत्मभान महाराष्ट्रातील मुस्लिमच नव्हे, तर अन्य समाजालाही होईल, अशी माफक अपेक्षा केल्यास ते संयुक्तिकच ठरेल. इन्शा अल्ला, अन्य मराठी साहित्यिकांप्रमाणे महाराष्ट्रीय मुसलमान साहित्यिकही विविध लेखन प्रकारांतील यशाची शिखरे निश्चितपणे गाठतील.


[१]

संदर्भ

  1. ^ [Google's cache of http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=Editorial-16-1-12-07-2009-6180d&ndate=2009-07-12&editionname=editorial. डॉ. यू.म. पठाण] It is a snapshot of the page as it appeared on 24 Jan 2010 11:59:16 GMT.