"कोल्हाटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: ही महाराष्ट्रातील एक भटकी जमात आहे. कर्नाटकात आणि मध्य प्रदेशात... खूणपताका: वार्तांकनशैली ? |
(काही फरक नाही)
|
१७:३९, २१ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती
ही महाराष्ट्रातील एक भटकी जमात आहे. कर्नाटकात आणि मध्य प्रदेशातही त्यांची वस्ती आढळते, पण प्रदेशानुरूप त्यांच्यात भेद आहेत. महाराष्ट्रात यांना कबुतरी, खेळकरी, डोंबारी, दांडेवाले, बांसबेरिया वगैरे नावांनी ओळखतात. खंडोबा, मरीआई, म्हसोबा, बहिरोबा या त्यांच्या देवता आहेत.
कोल्हाटी लोकांमध्ये काठे, दांडेकर, दुर्वे, देवळकर, निकनाथ, पाटेकर, लाखे, सोनटक्के आदी आडनावे असतात.
कोल्हाटी जमात अनेक जमातींच्या मिश्रणाने बनलेली आहे. यांच्यात मुख्य पोटभेद नऊ आहेत; ते म्हणजे मराठा, गुजराथी, आरे, गोपाळगणी, डुकरे ऊर्फ पोटरे, पाल ऊर्फ काणे, वळे ऊर्फ वळियार, हरका व मुसलमान. यांतील गोपाळगणी स्त्रिया प्रामुख्याने वेश्याव्यवसाय करतात. इतर स्त्रिया चटया, फण्या, खेळणी, शिंगाच्या कलाकुसरीच्या वस्तू वगैरे करून तसेच गोंदवण्याचा धंदा करून आपली उपजीविका करतात. कोल्हाटी किंवा डोंबारी बहुधा रस्त्यावर कसरती करून दान मिळवतात. काही कोल्हाट्यांना त्यांच्या कसरती कामातील नैपुण्यामुळे पेशव्यांनी इनामी जमिनी दिल्या आहेत. नृत्य, गायन व तमाशा यांमध्ये कोल्हाटणी भाग घेतात. तमाशात जाणे आणि लावण्या म्हणणे हा त्यांचा परंपरागत व्यवसाय आहे.
पहा : भटके कलावंत आणि भिक्षेकरी