Jump to content

"पिंगळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
खूणपताका: वार्तांकनशैली ?
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २४: ओळ २४:
==प्रजनन==
==प्रजनन==
साधारणपणे [[नोव्हेंबर]] ते [[मार्च]]-[[एप्रिल महिना|एप्रिल]] हा काळ {{लेखनाव}} पक्ष्यांचा वीणीचा काळ असून त्यांचे घरटे झाडाच्या ढोलीत, जुन्या इमारतीच्या छिद्रात, कडे-कपारीत, छताजवळ मिळेल त्या साधनांनी बनविलेले असते. किंवा त्याचे वास्तव्य दुसऱ्या पक्ष्यांनी सोडून दिलेल्या तयार घरट्यात असते. मादी एकावेळी ३ ते ४ पांढुरक्या रंगाची अंडी देते. अंडी उबविण्यापासून पिलांच्या संगोपनापर्यंत सर्व कामे नर-मादी मिळून करतात.

==अन्य माहिती==

पिंगळा सूर्यास्ताच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळी दिसतो. म्हणून या वेळांना पिंगळावेळ असे म्हटले जाते. संस्कृत नाव कृकालिका म्हणजे पाली, सरडे खाणारा. (कृकल=सरडा)

==हेही पहा==
==हेही पहा==

१८:१२, ६ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

पिंगळा
शास्त्रीय नाव Athene brama (Temminck)
कुळ घूकाद्य (Strigidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश Spotted Owlet
संस्कृत पिंगला, कृकालिका
हिंदी खकूसट, खूसटिया

भारतीय घुबड जातीच्या पक्ष्यांपैकी आकाराने सगळ्यात लहान पिंगळा हा पक्षी आहे. तो मानवी वसाहतीजवळ राहणे पसंत करीत असल्याने सर्वत्र परिचित आहे.

वर्णन

पिंगळा पक्षी आकाराने साधारणपणे मैना पक्ष्याएवढा (२१ सें. मी.) असतो. याचा मुख्य रंग करडा-तपकिरी असून त्यावर पांढरे ठिपके असतात. या ठिपक्यांवरूनच याला ठिपकेवाले घुबड असेही म्हणतात. याचे डोके गोल-वाटोळे असते आणि मानेवर तुटक पांढर्‍या रेषा असतात. याची चोच बाकदार, शिकार पकडण्यासाठी आणि मांस फाडण्यासाठी उपयुक्त, तर डोळे पिवळे असतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात.

सर्व घुबडांप्रमाणेच पिंगळा सुद्धा आपली मान दोन्ही बाजूंनी १८० अंश फिरवू शकतो, यामुळे एकाच जागी बसला असतांनाही तो क्षणात त्याच्या मागे काय घडत आहे ते पाहू शकतो. अंधारात राहण्यासाठी कान आणि डोळे अनुकूल झाले असल्याने लहानात लहान आवाजाच्या दिशेनेही पिंगळा पक्षी रोखून पाहतो.

वास्तव्य

पिंगळा पक्षी भारतभर सर्वत्र तसेच बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार या देशात आढळतो. याच्या रंग आणि आकारावरून किमान तीन उपजाती आहेत. पिंगळा हा निशाचर पक्षी आहे. दिवसा जुन्या आमरायांमध्ये, झाडांच्या ढोलीत तसेच संधी असल्यास, जुन्या मोठाल्या घरातील छताच्या आश्रयाने राहणे पसंत करतो. घनदाट वृक्षांच्या परिसरात पिंगळा कमी आढळतो.

खाद्य

पिंगळा हा निशाचर पक्षी असल्याने तो रात्रीच्या वेळी बेडूक, लहान पक्षी, पाली, उंदीर, आणि लहान प्राण्यांची छोटी पिले यांची शिकार करतो.

प्रजनन

साधारणपणे नोव्हेंबर ते मार्च-एप्रिल हा काळ पिंगळा पक्ष्यांचा वीणीचा काळ असून त्यांचे घरटे झाडाच्या ढोलीत, जुन्या इमारतीच्या छिद्रात, कडे-कपारीत, छताजवळ मिळेल त्या साधनांनी बनविलेले असते. किंवा त्याचे वास्तव्य दुसऱ्या पक्ष्यांनी सोडून दिलेल्या तयार घरट्यात असते. मादी एकावेळी ३ ते ४ पांढुरक्या रंगाची अंडी देते. अंडी उबविण्यापासून पिलांच्या संगोपनापर्यंत सर्व कामे नर-मादी मिळून करतात.

अन्य माहिती

पिंगळा सूर्यास्ताच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळी दिसतो. म्हणून या वेळांना पिंगळावेळ असे म्हटले जाते. संस्कृत नाव कृकालिका म्हणजे पाली, सरडे खाणारा. (कृकल=सरडा)

हेही पहा

पांगुळ

चित्रदालन

गोवा येथील पिंगळा आणि भेरा पक्षी