"घडशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ज्या ठिकाणी जुनी शंकराची मंदिरे आहेत त्या ठिकाणी सनई-चौघडा, ढोल, ...
(काही फरक नाही)

२३:३९, ३ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

ज्या ठिकाणी जुनी शंकराची मंदिरे आहेत त्या ठिकाणी सनई-चौघडा, ढोल, तुतारी, नगारा वाजविण्याचे काम घडशी समाजातील कलावंतांकडे असते. मात्र, महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये हेच काम न्हावी करतात.

आळंदी, कोल्हापूर, जेजुरी, ज्योतिबाचा डोंगर, पंढरपूर, मुंबई, शिखर शिंगणापूर, शिर्डी, इत्यादी ठिकाणी या समाजाची बरीच वस्ती आहे. घडशी समाजातील अनेकांचे आडनाव मोरे असते.

अनेक ठिकाणी मंदिराबाहेर हार-फुले विकण्याचे, डेकोरेशन करण्याचे आणि वाद्यदुरुस्तीचे काम घडशी समाजाचे तरुण करताना दिसतात.


पहा : गावकामगार