"झाडीबोली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ६४: ओळ ६४:
* झाडीबोलीतील सर्वोत्कृष्ट कथांचा संग्रह 'जागली'( संपादक, राजन जयस्वाल-२००१)
* झाडीबोलीतील सर्वोत्कृष्ट कथांचा संग्रह 'जागली'( संपादक, राजन जयस्वाल-२००१)


==कादंबऱ्या==
==कादंबऱ्या/चरित्रे==


* भाराटी (घनश्याम डोंगरे)
* भाराटी (घनश्याम डोंगरे)
* बाप्तिस्मा ते धर्मांतर (आत्मकथन-इसादास भडके)
* बाप्तिस्मा ते धर्मांतर (आत्मकथन-इसादास भडके)
* झाडीचा झोलना (आत्मचरित्र, अंजनाबाई खुणे-२०१२)
* झाडीचा झोलना (आत्मचरित्र, अंजनाबाई खुणे-२०१२)

==अन्य साहित्य==

* झाडीबोली मराठी शब्दकोश (डॉ.हरिश्चंद्र बोरकर)
* झाडी बोली भाषा आणि अभ्यास (डॉ.हरिश्चंद्र बोरकर)


==पुरस्कार==
==पुरस्कार==

२३:२४, ६ जुलै २०१२ ची आवृत्ती

महाराष्ट्र­ाच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली 'झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात.

झाडीबोलीची वैशिष्ट्ये

  • झाडीबोलीत प्रमाण मराठीतील सर्व स्वर आहेत.
  • या बोलीत छ, श, ष, आणि स या चार व्यंजनांचे कार्य एकटे स हे व्यंजन पार पाडते.
  • न आणि ण ऐवजी फक्त न वापरला जातो.
  • उच्चाराच्या संदर्भात झाडीबोलीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या बोलीत च, ज आणि झ या व्यंजनांचा केवळ तालव्य उच्चार ऐकायला मिळतो. म्हणजे चमच्यातला च, जसामधला ज आणि झग्यातला झ नाही.
  • 'ळ' या व्यंजनचा उच्चार 'र' असा होतो. त्यामुळे काळा, कावळा, पोळा हे शब्द कारा, कावरा, पोरा असे कानावर पडतात.
  • या बोलीत केवळ पुल्लिंग आणि स्त्रीलिंग आहेत. प्रमाण मराठीतील नपुंसकलिंग या बोलीत आढळत नाही.
  • शिवाय अनेक शब्दांचे लिंग मराठीपेक्षा वेगळे आहे. उदाहरणार्थ या बोलीत नाटक हा शब्द स्त्रीलिंगी आहे, तर जागा पुल्लिंगी आहे.
  • मराठीप्रमाणेच या बोलीत उली हा प्रत्यय लघुत्ववाचक आहे. उदा० कोटा-कोटुली, मारा-मारुली, गाडा-गाडुली इत्यादी.
  • नामाच्या लिंगानुसार एकवचनात 'हा', 'ही', 'हे' आणि अनेकवचनात 'हे', 'ह्या', 'ही' अशी सर्वनामे प्रमाण मराठीत वापरली जातात. अशी वेगवेगळी सर्वनामे न वापरता झाडीबोली केवळ 'ह्या' हे एकच सर्वनाम वापरून आपला कारभार पार पाडते.
  • प्रथम पुरुषी एकवचनात मी केलू, मी धरलू अशी उकारांत क्रियापदे वापरण्याची या बोलीची लकब प्राचीन ओव्यांची आठवण करून देणारी आहे.
  • प्रथम पुरुषी अनेकवचनातील आमी केलून, आमी धरलून अशी वाक्यरचना होते.
  • करजो, देजो, पायजो ही आज्ञार्थी रूपे आहेत.
  • 'मी जावासीन ना तो मरावासीन'(मी गेलो आणि तेव्हाच तो मेला) ही सामान्य क्रियापदाची वेगळी रचना या बोलीत आढळते.

लोकसाहित्य

झाडीबोलीत लोकसाहित्याचे अपार भांडार आहे. क्रीडागीते, पाळणागीते, सासुरवाशिणीची गीते अनेक आहेत. धानाची रोवणी करताना बायकांच्या मुखातून रोवण्याची गाणी ऐकू येतात. महाशिवरात्रीला महादेवाच्या यात्रेला जाणाऱ्या भक्तांच्या मुखांतून महादेवाची गाणी उमटतात. पोळयाला अकरावर गायल्या जाणाऱ्या झडत्या आणि घोडा नाचताना गायले जाणारे बिरवे त्या त्या प्रसंगीच ऐकायला मिळतात.

झाडीबोलीमध्ये भिंगीसोंग आणि दंडीगान सादर करणारे भिंगी व दंडी कितीतरी वर्षांपासून झाडीपट्टीतील जनतेचे रंजन करीत आहेत. दंडार, खडीगंमत, गंगासागर, डाहाका आणि गोंधड हे लोकरंजनासोबत लोकप्रबोधनाचा वसा घेतलेले काव्यप्रकार आहेत.

नियतकालिके

झाडीबोलीचे स्वत:चे मासिक आहे. डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या संपादकत्वाखाली 'लाडाची बाई' हे बाल मासिक झाडीबोलीत (देवनागरी लिपीत) भाषेत जानेवारी २०१०पासून प्रकाशित होत आहे. हे झाडी भाषेतील पहिले आणि एकमेव मासिक आहे(इ.स.२०१२).

प्रकाशित साहित्य

झाडी बोलीत सर्व प्रथम लेखन प्रकाशित करण्याचा मान डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांच्याकडे जातो. 'पवनपर्व' या साकोली येथून दर रविवारी प्रकाशित होणाऱ्या ’रविवासरी’ नावाच्या साप्ताहिकात 'वद्राचा देव खाल्या आला' ही त्यांची झाडीबोलीतील कथा १६ मार्च १९८० च्या अंकात प्रकाशित झाली. ही झाडीबोलीतील पहिली प्रकाशित कथा होय. तसेच याच नियतकालिकात 'अडचा घुटाची भूक' ही त्यांची झाडीबोलीतील कविता २० मार्च १९८१ च्या अंकात प्रकाशित झाली. ही झाडीबोलीतील पहिली प्रकाशित कविता समजली जाते.

  • 'झाडीबोलीचे भाषावैज्ञानिक अध्ययन' ह्या विषयावर डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांनी पीएच.डी.चा प्रबंध लिहिला होता.

कविता संग्रह

  • सपनधून (कवी ना.गो. थुटे-१ जानेवारी २०००) हा झाडीबोलीतील पहिला प्रकाशित कवितासंग्रह.
  • अंजनाबाईची कविता (कवयित्री अंजनाबाई खुणे-९ जाने २०००)
  • आदवा (चारोळीसंग्रह-कवी राजन जयस्वाल -९ जानेवारी २०००)
  • हिरवा पदर (कवितासंग्रह कवी हिरामन लांजे(रमानंद)-२००२)
  • रूप झाडीचा (वा.चं. ठाकरे-२००२)
  • कानात सांग (डॉ. हरिश्चंद्र बोरकर-२००२)
  • माज्या मुलकाची कता (विठ्ठल लांजेवार-२००२)
  • झाडीपट्टीचा बारसा (रामचंद्र डोंगरवार-२००३)
  • झाडी भुलामाय (प्र.ग. तल्लारवार(प्रगत)-२००६)
  • आदवा(कवितासंग्रह कवी राजन जयस्वाल-२००४)
  • अंजनाबाईची गाणी(अंजनाबाई खुणे-२००५)
  • सोनुली (पांडुरंग भेलावे-२००६)
  • मातीत मिरली माती' (मुरलीधर खोटेले-२००७)
  • माजी मायबोली (बापुराव टोंगे-२००८)
  • झाडीची माती (मिलिंद रंगारी-२००८)
  • मोहतेल (प्रल्हाद मेश्राम)
  • रंगल्या तांदराचा सडा (मनराज पटेल)
  • घामाचा दाम (डोमा कापगते)
  • कविता झाडीची (झाडीबोलीतील २५ उत्कृष्ट कवितांचा संग्रह - संपादक डॉ. हरिश्चंद्र बोरकर, ना. गो. थुटे-२००२)इत्यादी.

कथासंग्रह

  • वास्तुक (घनश्याम डोंगरे.१९९८) झाडीबोलीतला पहिला कथासंग्रहनश्याम डोंगरे यांच्या नावावर असून
  • पोरका (मा.तु. खिरटकर-२००१
  • गंप्याची बंडी (दिवाकर मोरस्कर-२००१)
  • विश्वंभरा (सुमिता कोंडबत्तुनवार-२००२)
  • चटनीचा पेंड (वा.चं. ठाकरे-२००८)
  • कवितेत रंगल्या कता (बापुराव टोंगे-२००९)
  • झाडीबोलीतील सर्वोत्कृष्ट कथांचा संग्रह 'जागली'( संपादक, राजन जयस्वाल-२००१)

कादंबऱ्या/चरित्रे

  • भाराटी (घनश्याम डोंगरे)
  • बाप्तिस्मा ते धर्मांतर (आत्मकथन-इसादास भडके)
  • झाडीचा झोलना (आत्मचरित्र, अंजनाबाई खुणे-२०१२)

अन्य साहित्य

  • झाडीबोली मराठी शब्दकोश (डॉ.हरिश्चंद्र बोरकर)
  • झाडी बोली भाषा आणि अभ्यास (डॉ.हरिश्चंद्र बोरकर)

पुरस्कार

  • ’भाराटी' ला नाशिक येथील प्रतिष्ठेचा बंधुमाधव पुरस्कार मिळाला.
  • ”बाप्तिस्मा ते धर्मांतर’ला महाराष्ट्र­ शासनाच्या उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कारांसह अनेक पुरस्कार लाभलेले आहेत.
  • डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या 'झाडी बोली : भाषा आणि अभ्यास' आणि 'भाषिक भ्रमंती' या दोन ग्रंथांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे.


झाडीबोली साहित्य संमेलन

  • १९ जानेवारी १९९२ रोजी रेंगेपार (कोहळी) या गावी झाडीबोली साहित्य मंडळाच्या ध्वजाखाली पहिले झाडीबोली साहित्य संमेलन झाले. आजतागायत(इ.स.२०१२) शासकीय मदतीशिवाय या

मंडळाने अठरा साहित्य संमेलने घेतली आहेत.

  • इ.स. १९९५च्या सेंदूरवाफा येथील तिसऱ्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कै.प्रा.द.सा.बोरकर यांनी भूषविले होते.
  • झाडीबोली साहित्य मंडळाने मराठी बोली साहित्य संघ ही संस्था १५ ऑगस्ट २००३ रोजी स्थापली.

पहा : मराठी साहित्य संमेलने