Jump to content

पहिला विल्हेल्म (जर्मन सम्राट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विल्हेम पहिला या पानावरून पुनर्निर्देशित)
विल्हेल्म पहिला

कार्यकाळ
१८ जानेवारी १८७१ – ९ मार्च १८८८
मागील पदनिर्मिती
पुढील फ्रीडरिश तिसरा

कार्यकाळ
२ जानेवारी १८६१ – ९ मार्च १८८८
मागील फ्रीडरिश विल्हेल्म चौथा
पुढील फ्रीडरिश तिसरा

जन्म २२ मार्च, १७९७ (1797-03-22)
बर्लिन, प्रशिया
मृत्यू ९ मार्च, १८८८ (वय ९०)
बर्लिन
वडील फ्रीडरिश विल्हेल्म तिसरा
सही पहिला विल्हेल्म (जर्मन सम्राट)यांची सही

विल्हेल्म पहिला (जर्मन: Wilhelm Friedrich Ludwig; २२ मार्च १७९७ - ९ मार्च १८८८) हा प्रशियाचा राजाजर्मनीच्या एकत्रीकरणनंतर स्थापन झालेल्या जर्मन साम्राज्याचा पहिला सम्राट (Deutscher Kaiser) होता. १८७१ सालच्या फ्रान्स-प्रशिया युद्धामध्ये प्रशियाचा सपशेल विजय झाल्यानंतर १८ जानेवारी १८७१ रोजी फ्रान्समधील व्हर्सायच्या राजवाड्यात जर्मन साम्राज्याची निर्मिती झाली व विल्हेल्मला सम्राटाच्या गादीवर बसवण्यात आले.

पहिल्या विल्हेल्मने नियुक्त केलेला ओटो फॉन बिस्मार्क हा जर्मनीचा पहिला चान्सेलर जर्मन साम्राज्याला एक महासत्ता बनवण्यात कारणीभूत होता.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: