Jump to content

विमेन अँड सोसायटल रीफोर्म इन मॉडर्न इंडिया: अ रीडर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ओमेन अंड सोसाल रीफोर्म इन मोदेर्ण इंडिया: अ रीडर हे सुमित सरकार आणि तनिका सरकारनी संपादित केलेला आहे. सदर पुस्तक इंडियाना युनिवेरसीती प्रेस यांनी २००८ मध्ये प्रकाशित केले आहे. एका समीक्षकांच्या मते, भारतातील सामाजिक सुधारणांविषयी लिहिले गेलेल्या निबंध आणि लेख यांचे व्यापक संकलन सदर पुस्तकामध्ये केले आहे. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाच्या आधी स्त्री आणि पुरुष समाजसुधारकांनी लिहिलेले मूळ निबंध आणि त्याचबरोबर समकालीन अभ्यासक आणि तज्ञ यांनी लिहिलेल्या निबंधांचा समावेश आहे.

प्रस्तावना

[संपादन]

लेखक प्रस्तावनेची सुरुवातच मुळात अशी करतात की, कशाप्रकारे भारतातील समाज सुधारणेच्या इतिहासात काही विशिष्ट समाजसुधारकांचीच की ज्यांनी सामाजिक वाईट रीतींचा विनाश त्यातही विशेषतः स्त्रीया आणि कुटुंबातील नातेसंबंधाशी संबंधित रीतींचा विनाश केला त्यांचीच नोंद केली आहे. सुधारणांच्या चर्चांमध्ये उच्च जातीय स्त्रियांचे शिक्षण आणि विवाहविषयक व्यवहार हे मुद्दे केंद्रस्थानी राहिले. कनिष्ठ जातीय आणि मुस्लिम स्त्रियांच्या सुधारणांसाठी प्रयत्न केले गेले नाहीत. सर्व स्त्रियांच्या सुधारणा समान पद्धतीने झाल्या नाहीत.

हाच इतिहास वसाहतिक भारतातील सुधारणांचा उदय स्पष्ट करतो जसे की, वसाहतीक शिक्षण आणि नव्या धार्मिक चळवळी मानवतावादी मूल्यांचे पुनरुज्जीवन करतात. लेखकांच्या मते हे सुधारणांवरील चर्चांचा विस्तार होणे गरजेचे आहे.

१. सुधारणावाद्यांचे प्रदेश, वर्ग आणि जातीआधारित स्थान की जे त्यांच्या सामाजिक संबंधाना आकार देते.

२. सार्वजनिक विश्वाचा उदय आणि स्त्रियांच्या प्रश्नांवरील चर्चा.

ठळक मुद्दे

[संपादन]

त्यांच्या मते बदलते लिंगभाव प्रमाण आणि व्यवहार यांच्या संदर्भामध्ये सामाजिक सुधारणा समजून घेणे गरजेचे आहे. हे लिंगभाव प्रमाण आणि व्यवहार प्रादेशिक आणि भौतिक विशेषतांमधून आणि त्या काळातील छपाई तंत्राचा जो विकास झाला त्यातून आकाराला आले ह्या गोष्टींचा तपशील या खंडातील निबंधांमध्ये जे ऐतिहासिक माहितीविषयीचे उतारे आहेत त्यातून मिळतो. त्यांनी 'मध्यम वर्ग' आणि 'चर्चा ' यांचे चिकित्सकरित्या विश्लेषण केले आहे.

बहुतांश सामाजिक सुधारणांवरील चर्चांमध्ये कशाप्रकारे पुरुष राष्ट्रवादी सुधारकांनी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राच्या सीमा पुनर्रचित केल्या यावर भर दिलेला दिसतो. त्या काळात अशा काही स्त्री समाज सुधारक होत्या ज्यांनी सामाजिक सुधारणामध्ये लक्षणीय कामगिरी करून सार्वजनिक क्षेत्र घडवले जसे की पंडिता रमाबाई; याविषयक खूप कमी अभ्यास आढळून येतात. लेखकांच्या मते, खूप कमी स्त्रिया होत्या पण त्यातही अशा काही स्त्रिया होत्या की ज्यांनी त्यांच्या कौटुंबिक क्षेत्रातून त्यांच्या जीवन जगताविषयक लिहून सार्वजनिक क्षेत्रांना आकार देण्यास सुरुवात केली होती. म्हणून त्यांनी रशसुंदरी देवी आणि ताराबाई शिंदे यांचे उदाहरण घेतले आहे.

पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये म्हटल्याप्रमाणे एकोणीसाव्या शतकातील सामाजिक सुधारणा या हिंदू सामाजिक सुधारणांविषयक होत्या आणि त्यांनी मुस्लिम व्यक्तिगत कायद्यामधील समस्या विचारात घेतल्या नाहीत. ज्या स्त्रिया पडद्यामध्ये होत्या त्यांना इस्लामिक अध्यापनामध्ये आणण्यासाठी त्यांच्याकरिता उत्तर भारतामध्ये उर्दू भाषेमध्ये शिक्षण खुले केले गेले होते याविषयी कोणत्याही प्रकारची उदाहरणे आढळत नाही.

या खंडातील निबंधामध्ये वेगवेगळया सुधारणांचा समावेश करण्यात आला आहे: सती, विधवा पुनर्विवाह, बंगालमधील विद्यासागर यांच्या सुधारणांवर सनातनी लोकांनी केलेला विरोध, हिंदू स्त्रियांच्या दैनंदिन जीवनावर झालेली प्रखर टिका. स्त्रियांच्या शिक्षणविषयक निबंध भारतातील संपूर्ण भागातील उच्च शिक्षित स्त्रियांविषयक मांडणी करते. इतर निबंध बंगाल ते पंजाब, तामिळनाडू आणि मणिपूर, शीख, ख्रिश्चन, मुस्लिम स्त्रिया तसेच आदिवासी स्त्रिया आणि मातृवांशिक समूह जसे की केरळ मधील नायर यांवर प्रकाश टाकते.

दोन्ही खंड कशाप्रकारे संघटीत केले गेले याविषयक थोड्या प्रमाणात मांडणी येते. दोन्ही खंडात ऐतिहासिक संशोधन विषयक निबंधांचा समावेश केला आहे. त्यातील १२ निबंध हे पहिल्या खंडात आहेत तर ११ निबंध दुसऱ्या खंडात आहेत. दुसऱ्या खंडातील शेवटच्या भागामध्ये सुधारणावादी काळामध्ये लिहिले गेलेल्या मूळ लेखनातील उतारे आहेत.

१. राममोहन रॉय

२. कैलाशबसिनी देवी

३. ताराबाई शिंदे

४. एम. जी. रानडे

५. बेगम रोकेया साखावत होस्सेन

भारतातील एकोणिसाव्या शतकातील स्त्री विषयक सुधारणा परोपकारी पुरुषांच्याच नेतृत्वाखाली झाल्या या कल्पनेला पुसण्यासाठी या दस्ताऐवजाचा समावेश या खंडामध्ये करण्यात आला आहे. परंतु सुधारणावादी काळातील काही बहुतांश स्त्रियांचे लिखाण प्रादेशिक भाषांमध्ये लिहिले गेले आहेत त्यामूळे संपादकांची निवड मर्यादित होते. पाच लिखाणांपैकी तीन स्त्रियांनी लिहिलेले आहेत.

सन २००८ मध्ये हे खंड प्रकाशित झाले त्यानंतर त्याच लेखकांनी २०१४ मध्ये 'Caste in Modern India' या पुस्तकाचे दोन खंड प्रकाशित केले.

प्रतिसाद

[संपादन]

Journal of Comparative Family Studies या जर्नलमध्ये सदर खंडाची समीक्षा केलेली आहे. त्यातील समीक्षकारांच्या मते, सदर खंड हा माहिती, चिकित्सक विश्लेषण आणि नवे ऐतिहासिक अंतरंग जे आधुनिकता आणि परंपरा विषयक आणि सर्वात महत्त्वाचे इतिहासाच्या अध्यापना विषयक मुलभूत प्रश्न उपस्थित करते.

Feminist Formations या जर्नल मध्ये समीक्षाकार मांडतात की, सरकार यांच्या या पुस्तकातून भारतातील वसाहोत्तर काळातील सामाजिक सुधारणाविषयी तंतोतंत माहिती मिळते. अनेक लेखकांनी वसाहतवाद आणि आधुनिकता यांवरील अभ्यासामध्ये सुधारणा घडवून सामाजिक सुधारणांवरील व्यापक चर्चांवर प्रकाश टाकते.

महत्त्वाच्या संकल्पना

[संपादन]

भारतात सामाजिक सुधारणा

लिंगभाव प्रमाण

लिंगभाव व्यवहार

सती

विधवा पुनर्विवाह

ऐतिहासिक संशोधन

संदर्भ सूची

[संपादन]

Ghosh Ratna, Journal of Comparative Family Studies, Vol. 41, No. 3 (MID-YEAR 2010), pp. 478–480

Warner Catherine and Priti Ramamurthy, Feminist Formations, pp 211–217

हे सुद्धा पहा

[संपादन]

रमा बिपिन मेधावी / पंडिता रमाबाई सरस्वती

पंडिता रमाबाई

ताराबाई शिंदे

ईश्वरचंद्र विद्यासागर