विमेन्स स्टडीज ऑन द एज (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विमेन्स स्टडीज ऑन द एज[१] हे निबंधांचे संकलन असून हे जोन वोलेच स्कॉट यांनी संपादित केले आहे. २००८ साली ड्यूक युनिव्हर्सिटीने ते प्रकाशित केले आहे.

मध्यवर्ती विषय[संपादन]

पुस्तकाच्या प्रस्तावनेत स्कॉट विचारतात, ‘स्त्री अभ्यास हे कायदेशीर अभ्यासाचे क्षेत्र कसे होऊ शकते?’ विविध सामाजिक-राजकीय संदर्भ व वेगवेगळ्या राजकीय परिस्थितींमध्ये त्यांच्यासमोर उद्भवणाऱ्या समस्या पुढे आणत निबंधांच्या लेखिका वाचकांना स्त्रीवादाचा प्रवास दाखवतात.

योगदान[संपादन]

संकलित केलेले सर्व निबंध वेंडी ब्राऊन आणि रॉबिन वेगमन यांच्या सहित अन्य प्रसिद्ध स्त्रीवादी लेखक आणि अभ्यासक यांनी लिहिले आहेत.

संदर्भ सूची[संपादन]

  1. ^ ISBN-13: 978-0822342748