विनअँप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विनअँप (Winamp) ही एक एमपी३ संगीताच्या निरनिराळ्या प्रकारच्या फाईल्स वाजवू शकणारी प्रणाली (प्रोग्राम) आहे. ही प्रणाली कुणालाही विनामूल्य स्वरूपात उपलब्ध आहे. याचा विकास नलसॉफ्ट (Nullsoft) नावाच्या कंपनीने बनवली आहे. आता ही कंपनी टाईम वॉर्नरच्या ताब्यात आहे.सगळ्यात पहिल्यांदा जस्टीन फ्रँकेल (Justin Frankel) ने इ.स. १९९७ साली ही प्रणाली वितरीत केली. ही प्रणाली इ.स. २००५ साली ५७ दशलक्ष लोक वापरत होते.

संगणकावरील मनोरंजनाचे प्राथमिक साधन म्हणून जगभरातील संगणकांवर सलग पंधरा वर्षे उपलब्ध असणारे हे साॅफ्टवेअर २० डिसेंबर, इ.स. २०१३नंतर कायमचे बंद करण्याचा निर्णय विनअँपने घेतला आहे. यानंतर याची कोणतीही आवृत्ती डाऊनलोड करता येणार नाही.

त्वचा[संपादन]

या प्रणालीची त्वचा बदलता येते. हा बदल करणे सोपे असते तसेच आंतरजाला वरही अनेक त्वचा उपलब्ध आहेत.

जोड प्रणाल्या (Plug-ins)[संपादन]

या प्रणालीवर अजून काही सुवीधा देवू शकतील अश्या अनेक जोड प्रणाल्याही विकसित झाल्या आहेत. जसे डायरेक्ट साऊंड (DirectSound), व्हिज्युअलायझेशन Visualization तसेच गजराचे घड्याळ, गाण्याची यादी इत्यादी.

बाह्य दुवे[संपादन]